शिवामृत दूध संघास महानंदचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांची स्नेहभेट

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ( प्रमोद शिंदे )अकलुज दि १६

  • सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रिय समजल्या जाणाऱ्या शिवामृत दूध उत्पादक संघास महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित मुंबईचे नवनिर्वाचित चेअरमन रणजीतसिंह देशमुख सह पत्नी यांनी स्नेह भेट दिली. त्यावेळी
    सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते महासंघाचे चेअरमन रणजित देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. वाहिनी साहेब यांचा सत्कार संघाचे संचालीका सौ.मगर व सौ. पिसे यांनी केला
    त्यानंतर
    शिवामृत दूध संघाच्या प्रकल्पाची माहिती जाणून घेतली, तसेच महानंदा हि महाराष्ट्र ची शिखर संस्था असून महासंघा मार्फत शिवामृत सहकारी दूध संघाला मदत करण्याबाबत,महासंघा ला दूध पुरवठा करणे बाबत चर्चा झाली तसेच कमी काळात महासंघास मोठे निर्णय घेतले आहेत त्यामुळे महासंघाला तसेच सहकारी दूध संघा ना त्याचा मोट्या प्रमाणात फायदे होणार आहे. याची माहिती महासंघाचे चेअरमन रणजित देशमुख यांनी दिली.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
    संघाचे संचालक श्री हरिभाऊ मगर यांनी केले यावेळी संघाचे व्हा.चेअरमन मा. ढोपे तात्या जेष्ट संचालक भिलारे भाऊ,अवताडे तात्या, शिवामृत दूध संघाचे कार्यकारी संचालक रविराज इनामदार देशमुख, तसेच संघाचे संचालक संजय मोरे, नवनाथ निलटे,सचिन रणनवरे,दत्तात्रय भिलारे, भीमराव साळुंखे,हनुमंत शिंदे व खाते प्रमुख उपस्थिती होते.

You may have missed