बँक आणि एटीएम संदर्भात ग्राहकांना दिलासा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : करोना आणि देशभरातील लॉक डाऊनची स्थिती लक्षात घेता अर्थ मंत्रालयाने ATM आणि बँक खात्यातील किमान शिल्लकी संदर्भातील नियम शिथिल करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाइन व्यवहारांवरील शुल्क कमी करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली. 

करदात्यांना दिलासा! रिटर्न फायलिंगला मुदतवाढ

करोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. देशातील करोना रुग्णांची संख्या ५०० च्या वर गेली आहे. पुढील काही दिवस देशात संचार बंदीची स्थिती राहणार आहे. यात बँकिंग यंत्रणा अत्यावश्यक सेवा म्हणून सुरु ठेवण्यात आली आहे. मात्र ग्राहकांची गैरसोय होऊ नये, म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकिंग व्यवस्थेबाबत आज अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. 

शेअर कोसळला; इंड्सइंड बँकेचे गुंतवणूकदार पोळले

ग्राहकांसाठी किमान शिल्लकीची अट रद्द करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना बँक खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही. यापूर्वीच भारतीय स्टेट बँकेने खात्यातील किमान शिल्लकीची अट रद्द केली होती. आता सर्वच बँकांसाठी हा नियम लागू झाला आहे. 

त्याचबरोबर ग्राहकांना कोणत्याही बँकेच्या ATM मधून अतिरिक्त शुल्काशिवाय पैसे काढण्यास मुभा देण्यात आली आहे. यापूर्वी बँकेकडून ग्राहकांना ३ ते ५ ATM व्यवहार निःशुल्क देण्यात येत होते. इतर बँकेच्या ATM मधून पैसे काढण्यास ग्राहकांना शुल्क द्यावे लागत होते. मात्र आता करोना आणि देशभरातील लॉक डाऊनमुळे बँकिंग नियमावलीत सूट देण्यात आली आहे. यामुळे देशातील कोट्यावधी ग्राहकांना फायदा होणार आहे. 

You may have missed