बारामती हिंदुस्तान कॅटल फीड च्या वतीने समता माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींना स्कूल बॅग वाटप
पुरोगाम महाराष्ट्रा न्युज नेटवर्क प्रमोद शिंदे
बारामती हिंदुस्तान कॅटल फीड लिमिटेड कंपनी तसेच श्री विष्णू नारायण दूध संकलन केंद्र चे चेअरमन संदीप तात्या नरोळे यांच्या सौजन्याने समता माध्यमिक विद्यालय श्री भिवाई देवी जुनियर कॉलेज पिरळे येथील 175 मुलींना स्कूल बॅग व सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले व समता माध्यमिक विद्यालय संस्थापक अध्यक्ष कै. मानसिंगराव (आबासाहेब) शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी हिंदुस्तान फीडस् चे तांत्रिक विस्तार अधिकारी श्री अक्षय गावडे व मार्केटिंग ऑफिसर श्री मयूर शेळके माजी सरपंच संदीप तात्या नरोळे,पत्रकार प्रमोद शिंदे,प्राचार्य दीपक शिंदे, यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच यावेळी संस्थेचे चेअरमन महादेव शिंदे,दत्तात्रय लवटे पाटील, मुख्याध्यापक गायकवाड सर शिक्षक स्टाफ व विद्यार्थी,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







