नातेपुते पोलीस स्टेशनच्या वतीने मंगळवारी महारक्तदान शिबिराचे आयोजन
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- प्रमोद शिंदे
नातेपुते पोलीस स्टेशनच्या वतीने मंगळवार दिनांक 18 मार्च 2025 रोजी नातेपुते पोलीस ठाणे येथे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांच्या नेतृत्वात व सर्व पोलीस स्टाफ होमगार्ड यांच्यावतीने महारक्तदान शिबिर आयोजित केले आहे. सध्या रक्त पेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवड जाणवत असून सर्वसामान्य लोकांना वेळेवरती रक्त उपलब्ध व्हावं यासाठी नातेपुते पोलीस स्टेशनच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या रक्तदान शिबिरासाठी परिसरातील युवक व नागरिकांना रक्तदानासाठी नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे व पीएसआय विक्रांत दिघे यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याचा विशेष सन्मान नातेपुते पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येणार आहे. परिसरातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदानास उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर रक्तदानासाठी ऑनलाईन नोंदणी साठी लिंक दिली असून संबंधितांनी नाव नोंदणी करण्याचे आव्हान देखील करण्यात आले आहे. सदर रक्तदान हे ज्ञानदीप रक्तपेढी यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.हे शिबिर सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजे पर्यंत नातेपुते पोलीस ठाणे तेथे आयोजित केली आहे.