जगातील सगळ्यात मोठं शिक्षण म्हणजे आई आणि बाप -वसंत हंकारे
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – प्रमोद शिंदे-
जगातील सगळ्यात पहिलं मोठं शिक्षण आणि विद्यापीठ म्हणजे आई आणि बाप आई आणि बाप हेच आपले पहिले गुरू आहेत.अशा प्रकारचे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी सोलापूर जिल्हा परिषदचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त वसंत हंकारे यांचा व्याख्यान व गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप तसेच विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन कै.नानासाहेब देशमुख, शंकररावजी मोहिते- पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन बाबाराजे देशमुख, वसंत हंकारे व इतर मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी प्रास्ताविकात माजी उपनगराध्यक्ष मालोजीराजे बोलताना म्हणाले की मला गुरु शोधण्यासाठी बाहेर जायची गरज लागली नाही दादांच्या रूपाने मला घरामध्येच गुरु मिळाला. दादांकडून मला खूप काही शिकायला मिळाले. रॉयल जीवन कसं जगायचं दादांनी शिकवलं. दादांसोबत राजकारणापलीकडे अनेक लोकांनी नातं जोडला आहे. पंचभक्कम केला तर आपल्या इतर ठिकाणी बर करत नाहीत अशी शिकवण दादांनी दिली. दादांनी शेतीवर खूप प्रेम केले आहे. तसेच बाबाराजे देशमुख यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त न समजलेले आईबाप याविषयी व्याख्यान देताना वसंत हंकारे यांनी अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थी व उपस्थित त्यांना व्याख्याने द्वारे भावनिक केले.आई आणि बाप या विषयी अनेक दाखले देत आई वडिलांचे जीवनातील महत्त्व सांगितली.ते म्हणाले की जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा एकदा आई ,बाप गेले की भिंतीवरचा बाप आणि आई परत येत नाहीत. लाखो करोडो रुपयांचा परत उपयोग नसतो. तुमचा एकच देव असायला पाहिजे आई आणि बाप. मुलींनी आपल्या डोळ्यातील अश्रूंना ताकद बनवले पाहिजे, मुलांनी बापासाठी व्यसन न करण्याची शपथ घ्यावी डोळ्यातील अश्रूंना परिवर्तनात बदलले पाहिजे. अशाप्रकारे हंकारे यांनी न समजलेले आई आणि बाप याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बाबाराजे उर्फ शहाजीराजे देशमुख,माजी वैद्यकीय अधिकारी एमपी मोरे, मचाले सर ,मा.सरपंच बी.वाय राऊत, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे, ए.पी.आय महारुद्र परजणे,धैर्यशील भाऊ देशमुख, बाहुबली शेठ चनकेश्वरा,नगराध्यक्ष अनिता लांडगे, उपनगराध्यक्ष अतुल पाटील, माऊली पाटील, शक्ती पलंगे, एडवोकेट शिवाजीराव पिसाळ, महेश शेटे, अडवोकेट रणवीर देशमुख ,संतोष काळे, मा सरपंच संदीप नरोळे, महादजी शिंदे, डॉ. विठ्ठल कवितके, डॉ.नरेंद्र कवितके,तसेच नगरपंचायत चे सर्व नगरसेवक, कार्यकर्ते पालक शिक्षक स्टाफ व विद्यार्थी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









