माळशिरस तालुका वकिल संघटनेत सचिव पदी ॲड. सुमित सावंत यांची बिनविरोध निवड

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

माळशिरस (प्रतिनिधी) : माळशिरस तालुका वकिल संघटनेच्या सन 2025-26 या निवडणुकीत सचिव पदासाठी ॲड. सुमित सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे. विशेष म्हणजे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सहसचिव, खजिनदार या पदांवर निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना सचिव पदासाठी फक्त ॲड. सावंत यांचाच अर्ज दाखल झाल्याने, आज दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी छाननीनंतर त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.उर्वरित सर्व पदांसाठी 14 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडणार आहे.ॲड. सुमित सावंत हे माळशिरस तालुक्यात नामवंत वकिल म्हणून परिचित असून त्यांनी अनेक सामाजिक संस्था तसेच विविध राजकीय पक्षांचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम केले आहे. ते भारत सरकारचे नोटरी म्हणूनही कार्यरत आहेत.सचिव पदी बिनविरोध झालेल्या निवडीबद्दल तालुक्यातील वकिल बांधवांसह विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

You may have missed