कोरोना पार्श्वभूमी अनुषंगाने पुरोगामी महाराष्ट्र व एन.डी.एम.जे च्या वतीने पिरळे येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (नातेपुते) राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आव्हानास प्रतिसाद देत नेशनल दलीत मोमेंत फोर जस्टाइस (एन.डी.एम.जे) महासचिव डॉ.केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली,पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल, महाराष्ट्र पत्रकार संघ माळशिरस तालुका,व पिरळे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने पिरळे ता माळशिरस येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरणा वायरस प्रादुर्भावामुळे रक्तपेढीत रक्त तुटवडा निर्माण होत असले कारणाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्यामध्ये दररोज अनेक हॉस्पिटलमध्ये विविध आजारांवर रुग्ण उपचार घेत असतात त्यासाठी दररोज चार ते पाच हजार रक्ताच्या पिशव्यांची अत्यंत गरज भासते परंतु कोरणा व्हायरसमुळे, शाळा महाविद्यालय यांना सुट्टी आहे. या मुळे विविध कार्यक्रम थांबवण्यात आले आहेत व पुरेशी रक्तदान शिबिर होत नाहीत.म्हणून रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई भासू लागली आहे व रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.भविष्यात रक्त तुटवड्याचे संकट अचानक येऊ नये म्हणून या शिबिराचे आयोजन केले आहे. पत्रकार प्रमोद शिंदे यांनी रक्तदात्यांना रक्तदानासाठी आव्हान केले होते यावर दोन महिलांसह 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. हे शिबिर सर्व नियमांचे पालन करून सोशल डिस्टन्स ठेवून घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र फोंडशिरस येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. किर्ती सिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच शिवाजी लवटे, माजी पोलीस अधिकारी ज्ञानदेव शिंदे, संदीप शेठ नरोळे, महादेव शिंदे , पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे कार्यकारी संपादक प्रशांत खरात, सुदाम बुधावले ,व अक्षय ब्लड बँक ,डॉ.वाघमोडे ,डॉ.मोरे व कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात युवक व ग्रामस्थ उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी पिरळे येथील युवकांनी परिश्रम घेतले. तसेच हरिदास लवटे, भारत राहुडकर, ज्ञानदेव शिंदे ,आकाश खिलारे ,मोहन शिंदे ,प्रकाश ठवरे, सुवर्णा राहुडकर ,अनिकेत लवटे ,नाथा साळवे, उदय डूडू ,दशरथ खिल्लारे ,रोहित डूडू ,संदीप नरोळे, संतोष जाधव ,राहुल खिलारे, हनुमंत बुधावले, प्रशांत खिलारे ,सचिन खिल्लारे, अमीर मुलानी ,परशुराम लांडगे ,विठ्ठल खंडागळे, दशरथ लवटे, दुर्योधन खिलारे, रुपेश साळवे, गजानन पोटे ,योगेश खिलारे ,संतोष साळवे ,सागर खिलारे ,मयुर साळवे ,अविनाश तोडकर, सुनील साळवे, बाळा बुधावले, विजय खंडागळे ,अधिक्राव यमगर, राजाराम शिंदे ,अनिल खिलारे ,संजय नरोळे, सलीम मुलानी ,उमेश जाधव, अमोल निकम, वैभव खिलारे ,चेतन खिलारे ,विशाल खिलारे ,रामचन्द्र राहुडकर, रमेश पांडेचेरी, शिवाजी कांबळे ,सुनील शिंदे, महादेव राहुडकर, ओमकार किर्दक ,सूरज किर्दक ,शैलेश नरोळे ,अक्षय साळवे ,पन्नालाल पैलवान, जनार्दन शिंदे ,अनिल तोडकर ,सुनील दळवी, करीम मुलानी, या रक्तदात्यांनी सामाजिक भान ठेवून देशहितासाठी रक्तदान केले या सर्व रक्ता त्याचे पंचक्रोशीत सोशल मीडियातून कौतुक होत असून यांचा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे असे बोलले जात आहे.