राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होणार पंजाबराव डख
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने विराम घेतल्याने शेतकरी वर्गाला थोडासा दिलासा मिळाला होता. या काळात अनेकांनी आपल्या पिकांची काळजी घेण्यासाठी आणि कापणीची तयारी करण्यासाठी वेळ मिळवला होता. मात्र, हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या ताज्या अंदाजानुसार ही शांतता अल्पकालीन ठरणार असून ४ ऑक्टोबरपासून राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस कोसळणार आहे. या अचानक बदलामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा वाढ झाली असून त्यांना आपल्या पिकांच्या सुरक्षिततेबाबत नवीन आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.

