महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सोलापूर जिल्हा कार्यकारणी जाहीर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे


महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची सोलापूर जिल्हाकार्यकारणी शनिवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये आठ जणांची निवड करण्यात आली.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार्क चौक येथील मराठी पत्रकार संघात हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी जिल्हाध्यक्ष अभिषेक आदेप्पा यांनी नूतन कार्यकारणीची घोषणा केली. सचिवपदी एनडीटीव्हीचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी सौरभ वाघमारे, चिटणीस दैनिक पुढारीचे प्रतिनिधी दीपक शिराळकर, सरचिटणीस बी. आर. न्यूज चॅनेलचे आदित्य केंगार, उपाध्यक्ष दैनिक विश्ववार्ताच्या श्रुती माने – गांधी, आणि पुढारी न्युज चैनलचे सोलापूर जिल्हाप्रतिनिधी अनिकेत गायकवाड, सहसचिव इन सोलापूर न्यूजचे प्रतिनिधी मनोज हुलसुरे, कार्यकारणी सदस्य दैनिक आरंभचे अर्जुन घोडके तर साहिल माने यांची सोशल मीडिया प्रमुख म्हणून निवडी करण्यात आली.यावेळी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास टीव्ही नाईन मराठीचे प्रतिनिधी सागर सुरवसे,  एबीपी माझाचे प्रतिनिधी अफताब शेख, व्हिडिओ जर्नालिस्ट विजय आवटे, लोकशाही न्यूज चॅनेलचे वसीम अत्तार, अय्युब कागदी, मुजम्मील शहानूरकर आदींची उपस्थिती होती.

You may have missed