महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने पिरळे येथे पिकावरील कीड रोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन (Hortsap) योजनेअंतर्गत डाळिंब पीक शेती शाळा, सन 2025-26वर्ग क्रमांक 2 आयोजित करण्यात आला.
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
दिनांक 06 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता मौजे पिरळे येथे (श्री. ब्रह्मदेव प्रकाश रुपनवर यांच्या प्रक्षेत्रावर, पिरळे)* या ठिकाणी *फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन (Hortsap) योजनेअंतर्गत डाळिंब पीक शेती शाळा, सन 2025-26* *वर्ग क्रमांक 2* आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना पिरळे गावचे सहाय्यक कृषी अधिकारी अमित गोरे यांनी केली, शेतीशाळेचा उद्देश, मागील शेती शाळेचा आढावा, चालू च्या शेतीशाळेचे नियोजन सांगण्यात आले. शेती शाळेसाठी निवडलेले शेतकऱ्यांचे पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले व व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला .सहाय्यक कृषी अधिकारी श्री हनुमंत खरात यांनी कृषी विभागाच्या फळबाग लागवड व विविध योजनांची माहिती दिली. सहाय्यक कृषी अधिकारी श्री लालासाहेब माने यांनी सी आर ए तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली व त्यामुळे होणारे फायदे सांगितले. यानंतर सहाय्यक कृषी अधिकारी श्री दत्तात्रय पांढरमिसे यांनी डाळिंब रोपवाटिकेतील रोपे निवड, घरच्या डाळिंबीवर गुटी निर्मिती तसेच निरोगी रोपे व तयार केलेल्या रोपवाटिकेतील रोग व्यवस्थापन याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. उप कृषी अधिकारी नातेपुते एक श्री गोरख पांढरे यांनी डाळिंब बागेतील रोग संस्कार, तेलकट डाग व रोग व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. मंडल कृषी अधिकारी श्री मंगेश बोरुडे यांनी पिन होल बोरर कीड व्यवस्थापन, निर्यातक्षम डाळिंब उत्पादन व शेत नोंदणी, डाळिंब जीआय मानांकन याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले. याच कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांकडून जी आय मानांकन अर्ज भरून घेण्यात आले. यानंतर उत्कृष्ट डाळिंब उत्पादक शेतकरी श्री ब्रह्मदेव प्रकाश रुपनवर यांनी प्रक्षेत्रामध्ये स्वतः करत असलेले नियोजन व त्यामुळे होणारे फायदे याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमावेळी पिरळे गावचे डाळिंब उत्पादक शेतकरी, बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, नातेपुते अधिनस्त मंडळ कृषी अधिकारी श्री मंगेश बोरुडे, उप कृषी अधिकारी श्री गोरख पांढरे, सहाय्यक कृषी अधिकारी श्री दत्तात्रय पांढरमिसे, श्री ढोबळे, श्री विश्वनाथ दुधाळ, श्री हनुमंत खरात, श्री लालासाहेब माने, श्री कांतीलाल शेंडगे, श्री गणेश जाधव उपस्थित होते. कार्यक्रमावेळी शेतकऱ्यांना चहा, नाष्टा देण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन पिरळे गावचे सहाय्यक कृषी अधिकारी श्री अमित गोरे यांनी केले व आभार प्रदर्शन डाळिंब उत्पादक शेतकरी श्री यशवंत प्रकाश रुपनवर यांनी केले.



