पुढील ४ दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा तडाखा! ‘या’ जिल्ह्यांमध्ये होणार अतिवृष्टी – यादी पाहून थक्क व्हाल!
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
महाराष्ट्रात पुढील काही दिवस हवामान थोडं बदलणार आहे. हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितले आहे की ८ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२५ या चार दिवसांत राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण काही भागांत हवामान कोरडे आणि उन्हाळे राहील.तज्ज्ञांच्या मते, या काळात हवेचा दाब १०१० हेप्टापास्कलपर्यंत वाढेल. जेव्हा हवेचा दाब जास्त असतो, तेव्हा पावसाची शक्यता कमी होते. त्यामुळे आकाशात ढग दिसले तरी पाऊस फारसा पडणार नाही. त्याचबरोबर सकाळच्या वेळी थोडी थंडी जाणवेल, कारण किमान तापमानात घट होऊ लागली आहे.राज्याच्या वेगवेगळ्या भागांनुसार पावसाचा अंदाज असा आहे –कोकण विभागात (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे-पालघर):
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० ते २५ मिलीमीटर पाऊस पडू शकतो.
रत्नागिरी आणि ठाणे-पालघर जिल्ह्यात ५ ते १५ मिलीमीटर,
तर रायगडमध्ये ५ ते १० मिलीमीटर पावसाची शक्यता आहे.दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रात (कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर):
या भागात ५ ते २० मिलीमीटर इतका हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
सोलापूर, पुणे आणि अहमदनगरमध्ये मात्र ३ ते १० मिलीमीटर इतका हलका पाऊस अपेक्षित आहे.उत्तर महाराष्ट्रात (नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव):
येथे पावसाचे प्रमाण कमी असेल.
नाशिक आणि धुळे येथे ५ ते १५ मिलीमीटर,
तर नंदुरबार आणि जळगाव येथे ३ ते १० मिलीमीटर पावसाचा अंदाज आहे.विदर्भ भागात (पूर्व, पश्चिम आणि मध्य विदर्भ):
इथे फारसा पाऊस होणार नाही.
पूर्व विदर्भात १ ते २ मिलीमीटर,
तर पश्चिम आणि मध्य विदर्भात फक्त १ मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे.एकूण अंदाज असा आहे की, पुढील चार दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर खूपच कमी राहील. काही ठिकाणी थोडा पाऊस होईल, पण बहुतांश भागांत हवामान ढगाळ पण कोरडे राहील. सकाळी थंड वारा आणि थोडी थंडावा जाणवणारे वातावरण असेल.

