नागपुरात ओबीसींचा आरक्षण बचावसाठी एल्गार
नागपूर : २ सप्टेंबर रोजी राज्य सरकारने
काढलेल्या जीआरनंतर ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातून आत्महत्यांचे सत्र निर्माण झाले आहे. या आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारने हा काळा जीआर या रद्द करावा, या मागणीसाठी शुक्रवारी नागपुरात ओबीसींचा आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विदर्भासह राज्यभरातून हजारो ओबीसी बांधव सहभागी झाले होते. ओबीसींच्या हक्काला धक्का लावाल तर परिणाम वाईट होतील, असा इशारा या मोर्चाद्वारे देण्यात आला. दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांच्या कट्टर समर्थकाने अकोला येथे ओबीसी आरक्षण बचावासाठी आत्म हत्या केल्याचे वृत्त आहे.ओबीसींचा मराठा आरक्षणाच्या संदर्भात २ सप्टेंबरला राज्य शासनाने काढलेल्या शासन निर्णयानुसार हैदराबाद संस्थानातील गॅझेटमध्ये ‘कुणबी’ अशी नोंद असलेल्या मराठा व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हीच वाव पारंपरिक ओबीसी समाजाच्या असंतोषाचे कारण ठरली आहे. ओबीसी नेत्यांचा ठाम आरोप आहे की, मराठा समाज सामाजिकदृष्टया मागास नाही आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात साम ावणे म्हणजे ओबीसींच्या आरक्षणावर अतिक्रमण आहे.
