तरुणांनी आदर्श घ्यावा असे तरुणाईचे प्रेरणास्थान एडवोकेट राहुल , व आनेश वाघमोडे -पाटील बंधूंच्या कार्याची होतेय सर्वत्र चर्चा

माळशिरस तालुक्यातील तरुणाईसाठी प्रेरणास्थान ठरलेले उपमुख्यमी एकनाथ शिंदे यांचे पी.एस.ओ. अॅड. राहुल वाघमोडे पाटील, बंधू अनेश वाघमोडे-पाटील ही जोडी तालुक्याच्या प्रत्येक भागात चर्चेचा विषय ठरली -आहे.दोन्ही बंधूनी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, औद्योगिक व सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न सोडवून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या माध्यमातून माळशिरस तालुक्याच्या अनेक समस्या मार्गी लागल्या आहेत. तसेच नव्या योजनांना चालना मिळत आहे.तसेच माळशिरस शहरात संघर्ष करिअर अॅकॅडमीच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो तरुणांना महाराष्ट्र पोलीस, आर्मी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सेवक इत्यादी अनेक क्षेत्रात घडविण्याचे काम या २ बंधूच्या माध्यमातून झाले आहे. तसेच अॅड. राहुल वाघमोडे-पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणाईसाठीविविध शाळा, कॉलेज, तसेच स्पर्धा परीक्षा अॅकॅडमी, सामाजिक संस्थेमध्ये हजारो प्रेरणादायी व्याख्याने घेऊन तरुणाईचे भविष्य उज्वल करण्याचा सकारात्मक प्रयत्न केला.माळशिरस तालुक्याची माती व माणसांशी असलेले त्यांचे आत्मीय नातं, जनतेप्रती असलेली बांधिलकी आणि तरुणांसाठीअसलेली प्रेरणादायी भूमिका यामुळे वाघमोडे-पाटील बंधू तालुक्यातील तरुणाई, महिला, शेतकरी व कामगार वर्गाचे खरे आकर्षण बनले आहेत. अशाच प्रकारे माळशिरस तालुक्याचा विकास, तरुणांचे नेतृत्व, उज्वल भविष्यासाठी कार्यरत राहो अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.

You may have missed