बाळूमामाचं चांगभलं,चा जयघोष करत आजी-माजी आमदार यांच्या उपस्थितीत कृष्णात ढोणे महाराज यांच्या हस्ते शेंडगे कापड दुकानाचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न.
नातेपुते येथे कपड्यासाठी प्रसिद्ध असणारे शेंडगे कापड दुकान,टेक्सटाईल मार्केट या भव्य दोन मजली कापड दुकान शोरूमचे उद्घाटन
बाळूमामा भक्त श्री विठ्ठल बिरदेव व श्री सिद्धनाथ भाकणूक कथाकार मानकरी कृष्णात ढोणे महाराज यांच्या हस्ते व आमदार उत्तमराव जानकर, माजी आमदार रामहरी रुपनवर,माजी आमदार रामभाऊ सातपुते, व प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते हा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाला. यावेळी कृष्णात ढोणे महाराज बोलताना म्हणाले की शेंडगे बंधू हे अतिशय प्रामाणिक असे बाळूमामाचे भक्त आहेत त्यांच्यावर बाळूमामा चा कृपा आशीर्वाद राहणार आहे. परंतु आपल्याला विनंती आहे नडलेला ग्राहक तुमच्याकडे आला तर त्याला मदत करा त्याच्या रूपाने तुमच्याकडे देव सुद्धा येऊ शकतो.असं केल्यास आजूबाजूच्या पंचवीस गावात आपली दुकान होतील.तसेच माजी आमदार रामहरी रुपनवर बोलताना म्हणाले की शेंडगे यांचं भव्य दिव्य कापड दुकान असून अतिशय कष्टाने व मेहनतीने दुकान उभ केला आहे.तसेच उत्तमराव जानकर यांनी शेंडगे यांची यशोगाथा सांगत शुभेच्छा दिल्या.तसेच रामभाऊ सातपुते व ह भ प अमोल सूळ बोलताना म्हणाले की सुरेश शेंडगे व शंकर शेंडगे या दोघांनीही कधी ही प्रामाणिकपणा सोडला नाही प्रामाणिक व नम्रतेच्या जोरावर यश संपादन केले आहे. तसेच सर्वांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी सरपंच बी वाय राऊत, एपीआय महारुद्र परजणे साहेब,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, धैर्यशील भाऊ देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य,माऊली पाटील, उपसभापती,किशोर सुळ,बाळासाहेब सरगर, माजी उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, मधुकर पाटील, बाळू महाराज नरोटे, ऋतुजा ताई मोरे, संदीप ठोंबरे, सतीश सपकाळ, बाहुबली शेठ चंकेश्वराअतुल शेठ बावकर, बाळूमामा संस्थानातील महाराज व महंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजक सुरेश शेठशेंडगे व शंकरशेठ शेंडगे व शेंडगे परिवार यांनी सर्वांचा सन्मान केला.









