एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या इशाराचा धसका घेत सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये बोनस
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

MUMBAI, INDIA – OCTOBER 21: Passengers board state transport bus after strike was called off at Mumbai Central Bus Depo, on October 21, 2017 in Mumbai, India. The Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) called off their five-day strike on Saturday after a late-night meeting of their core committee. (Photo by Anshuman Poyrekar/Hindustan Times via Getty Images)
परिवहन महामंडळ तथा एसटीच्या सुमारे ८५ हजार कर्मचारी आणि अधिका-यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार दि. १३ ऑक्टोबर रोजी जाहीर केला. तसेच कर्मचा-यांच्या वेतन वाढीचा फरक देण्यासाठी महामंडळाला सरकारकडून ६५ कोटी रुपये देण्याचे आणि पात्र कर्मचा-यांना दिवाळी अग्रौग म्हणून १२ हजार ५०० रुपये देण्यात येणार असल्याचेही शिंदे यांनी घोषित केले.उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याएसटीचे सर्व कर्मचारी आणि अधिका-यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये देण्यासाठी सरकारने सुमारे ५१ कोटी रुपये अनुदान देण्याचे मान्य केले आहे. तसेच सन २०२०-२४ दरम्यानच्या वेतन वाढतील फरकाची रक्कम कर्मचा-यांना दरमहा वेतनासोबत देण्यात येणार असून यासाठी सरकारने ६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, याशिवाय जे पात्र कर्मचारी सण अग्रीम घेण्यास इच्छुक आहेत त्यांना देखील पूर्वीप्रमाणे १२ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनाकडे ५४ कोटी रुपयांची मागणी एसटी महामंडळाने केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिली.उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह येथे एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक पार पडली. यावेळी शिंदे म्हणाले, राज्यात अतिवृष्टीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही एसटी कर्मचा-यांची दिवाळी गोड झाली पाहिजे म्हणून सरकारने आज हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर एसटीला आर्थिकदृष्टया समृद्धकरणे गरजेचे आहे. एसटी महामंडळाचे उत्पत्र वाढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी खासगी शासकीय सहभागी तत्वावर एसटीच्या जागांचा विकास करण्यात येणार आहे.या बैठकीला उपमुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव नवीन सोना, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश