पीएफमधून १०० टक्के पैसे काढण्यास मान्यता
https://youtu.be/KSiRNnyeP6w?si=cCrDDsXDExeQN7L7
दिवाळीपूर्वी सरकारने देशातील कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची सर्वोच्च संस्था असलेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने सोमवारी भविष्य निर्वाह निधी अंशतः काढण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांसाठी अंशतः पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि उदार झाली असून, सदस्य आता त्यांच्या पात्र शिल्लक रकमेपैकी १००% पर्यंत पैसे काढू शकतील. केंद्रीय कामगार मंत्रीपीएफमधून १०० टक्के पैसे…मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे झालेल्या २३८व्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्यमंत्री शोभा करंदलाजे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर कामगार मंत्रालयाने सांगितले की, ‘सदस्यांचे जीवनमान अधिक सोपे करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.’
