2026 मध्ये सोन्याचा दर 162500 ते 182000 असेल? सोन्याच्या किंमतीबाबत बाबा वेंगाने केलेले भाकित जाणून धक्का बसेल
aba Vanga On Gold Price: दिवाळी मुहूर्तावर सोन्याच्या किमतीने सर्वांनाच धक्का दिला आहे. धनत्रयोदशीला सोन्याच्या करारात 2 टक्क्यांनी घसरण झाली. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,27,320 रुपयांवर पोहचली आहे.मजबूती आणि अमेरिका आणि चीनमधील व्यापारी तणाव कमी होणे. अशातच प्रसिद्ध भविष्यवेता बाबा वेंगाने सोन्याच्या दराबाबत केलेली भविष्यवाणी चर्चेत आली आहे. 2026 मध्ये सोन्याचा दर किती असेल? सोन्याच्या किंमीताबाबत बाबा वेंगाने केलेले भाकित जाणून धक्का बसेल.या वर्षी सोन्याच्या किमतीत लक्षणीय तेजी दिसून आली आहे. देशाच्या स्पॉट मार्केटमध्ये 70 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. जागतिक अनिश्चितता, मध्यवर्ती बँकांची खरेदी, अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा आणि ईटीएफमधील गुंतवणूक ही याची कारणे आहेत. परंतु वातावरण बदलत आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की यावर्षी सोन्याच्या किमतीत झालेली वाढ पारंपारिक कारणांमुळे नाही तर जागतिक वित्तीय व्यवस्थेतील मोठ्या बदलांमुळे झाल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.जागतिक राजकारण, अर्थशास्त्र आणि डॉलरच्या ताकदीवर सोन्याचे भाव अवलंबून होते. या वर्षी अनिश्चिततेमुळे ते वर गेले. तथापि, आता तणाव कमी झाल्यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव वाढला आहे. मध्यवर्ती बँका सतत सोने खरेदी करत आहेत, परंतु गुंतवणूकदार सावध आहेत. सोन्याने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, गुंतवणूकदार ते विकण्याचा विचार करत आहेत. सोन्याचे गुंतवणूकदार गोल्ड ईटीएफमधून पैसे काढत आहेत.2026 सोन्याचा दर काय असेल?2026 मध्ये दिवाळीत सोन्याचा भाव किती असेल अशी देखील चर्चा रंगली आहे. बाबा वेंगाच्या भाकितानुसार 2026 मध्ये दिवाळीत सोन्याचा भाव किती असेल, याबद्दल विचारण्यात आले तेव्हा ग्रोक यांना विचारण्यात आले की, सध्या सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,30,000 रुपयांवर पोहोचला आहे. बाबा वेंगाच्या भाकितानुसार, ग्रोक म्हणाले की, 2026 मध्ये जागतिक आर्थिक संकट (‘कॅश क्रश’) येण्याची शक्यता असल्याने चलन प्रणालीमध्ये व्यत्यय येऊ शकतो, बँकिंग संकट येऊ शकते आणि बाजारात तरलतेचा अभाव येऊ शकतो.अशा परिस्थितीत, सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढू शकते. खरं तर, लोक आर्थिक अस्थिरतेपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करतील. आर्थिक संकटाच्या काळात, अलिकडच्या वर्षांत सोन्याच्या किमती 2 0 ते 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत. सध्या, बाबा वेंगाच्या भाकितानुसार, जर 2026 मध्ये मंदी आली तर सोन्याच्या किमती 25 ते 40 टक्क्यांनी वाढू शकतात. याचा अर्थ असा की पुढील दिवाळीपर्यंत अर्थात ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026 पर्यंत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 162,500 ते 182,000 दरम्यान पोहोचू शकते. हा अंदाज जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि सोन्याच्या वाढत्या मागणीवर आधारित आहे.
