सोलापूरात भाजपात दुफळी !बाहेरून येणाऱ्यांनी ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं : देशमुख
जिल्ह्यातील ४ माजीआमदार लवकरच भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत परंतु या पक्षप्रवेशामुळे स्थानिक भाजपात दुफळी माजली आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला भाजपा कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले. भाजपा नेते सुभाष देशमुख यांनी या पक्षप्रवेशावर भाष्य करत बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावे त्यानंतर पक्षाने त्यांना जबाबदारी द्यावीअसं विधान केले आहे.सुभाष देशमुख म्हणाले की, पक्षात येणाऱ्यांचे सर्वांचे स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात आणि देशात वाढली पाहिजे या भूमिकेचा मी आहे. परंतु हे करत असताना सर्वांनी एकमेकांना विश्वासात घेणे गरजेचे असते. स्थानिकांची काय भूमिका आहे हे विचारून घेतले पाहिजे. जे लोक नव्याने येत आहेत त्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचे काम करावे मग पक्षाने त्यांना भूमिका द्यावी
