महागाईत आणखी घट होण्याचे संकेत
वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) कपातीचा दृश्य परिणाम ऑक्टोबर महिन्यातील वस्तूंच्या किमतीवर दिसेल.त्यामुळे किरकोळ महागाई निर्देशांक अर्धा टक्क्याच्या खाली येईल, असा अंदाज युनियन बँक ऑफ इंडियाच्या ताज्याअहवालात वर्तविण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात खाद्यान्नाच्या किमतीत चांगली घट पाहायला मिळत आहे. आजच्या तारखेअखेरीस महागाई निर्देशांक अर्धा टक्क्याच्या खाली आहे.येत्या हिवाळी हंगामात खाद्यान्नाच्या किमती उणे पातळीवर जातील, असेअहवालात म्हटले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये महागाई निर्देशांक ३.१ वरून २.६ टक्क्यांवर येईल. सप्टेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा किमती खाली आल्या आहेत. ग्राहक खाद्यान्न किंमत निर्देशांक उणे २.२८ टक्क्यांवर आला आहे. जून २०२५ पासून खाद्यान्न महागाई निर्देशांक उणे पातळीवर आहे.