टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
: जेमिमाह रॉड्रिग्ज हीने केलेल्या चाबूक शतकाच्या जोरावर वूमन्स टीम इंडियाने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेतील फायनलमध्ये धडक दिली आहे. ऑस्ट्रेलियाने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारतासमोर ३३९ धावांचे डोंगराएवढे आव्हान ठेवले होते. त्यामुळे भारतीय संघ हे आव्हान पूर्ण करणार का? असा शंका उपस्थित केली जात होती. मात्र भारतीय महिला संघाने इतिहास घडवत कांगारुंचा विजयरथ यशस्वीपणे रोखला.