माळशिरस येथे शिवप्रसाद फाउंडेशन श्री सदगुरु शंकर महाराज अन्नछत्र समिती ट्रस्ट, पुणे व सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिर व मोफत चष्मे वाटप

दि. 30 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत
कार्यक्रमाचे स्थळ : श्रीनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, माळशिरस शिक्षक कॉलनी म्हसवड रोड माळशिरस ता.माळशिरस जि.सोलापूरशिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष मा.श्री. शरद (बापु) मोरे तसेच मा.जि.प.सदस्या सौ.ऋतुजाताई शरद मोरे व मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.
यावेळी माळशिरस ग्रामस्थ तसेच मान्यवर यांच्या वतीने बापूसाहेब व ऋतुजाताई यांचा सत्कार करण्यात आला1) मोफत हृदयरोग तपासणी( ईसीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी)2) मोफत यूरोलॉजी तपासणी ( लघवीचे आजार, किडनी, मूत्राशयाचे आजार, प्रोस्टेट)3) मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप( तिरळेपणा, बुबुळ, प्रत्यारोपण, पापणी पडलेले-रेटीना)4) मोफत कॅन्सर तपासणी
5) मोफत रक्त तपासणी
6) मेंदूचे आजार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया
7) मनका व मज्जातंतू यासंबंधी मोफत शस्त्रक्रिया
8) अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया
9) मोफत कान, नाक, घसा शस्त्रक्रिया, अव्हॅक्युलर नेक्रोसिस, किडनी स्टोन शस्त्रक्रिया, सर्व प्रकारच्या हार्निया शस्त्रक्रिया, आतड्याला पिळ पडणे
अन्ननलिकेच्या शस्त्रक्रिया, त्वचा व गुप्तरोग, मोफत फिजिओथेरपी, अस्थिरोग आजार व उपचार, मोफत दंत तपासणी व उपचार, मोफत पेसमेकर शस्त्रक्रिया, मोफत वॉल
रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया, मोफत डिवाईस क्लोजर, लहान बाळाच्या हृदयास छिद्र असणे, माफक दरात शस्त्रक्रिया, बालरोग, स्त्रीरोग, मधुमेह, उच्चदाब, मोफत हिप रिप्लेसमेंटरील आजारांच्या तपासण्या तसेच नोंदणी मोफत करण्यात आली, यावेळी या शिबिराचा 430 नागरिकांनी लाभ घेतला.
मोठ्या प्रमाणात मोफत चष्मे वाटप करण्यात आले.सेवासदन मल्टी स्पेशालिस्ट यांच्यातर्फे सौ.लताताई मोरे यांनी कामकाज पाहिले तसेच ऑपरेशनची तपासणी केली.
मा.श्री.शरद (बापु) मोरे, सौ.ऋतुजाताई शरद मोरे,
डॉ.लताताई मोरे, मा.श्री.विजय देशमुख (नगराध्यक्ष), मा.श्री.रावसाहेब देशमुख (नगरसेवक), मा.श्री.वैभव जानकर (नगरसेवक), मा.श्री.हसन मुलाणी (उद्योजक), मा.श्री.अनिरुद्ध शिंगाडे (उद्योजक) मा.श्री.बळीराम गेजगे (सा. कार्यकर्ते) मा.श्री.नानासाहेब हांडे (सा. कार्यकर्ते), मा.श्री.गुजरे सर, श्री.सुशांत पाटील, सेवासदन हॉस्पिटल डॉक्टर व कर्मचारी, शिवप्रसाद फॉउंडेशनचे कर्मचारी.

You may have missed