नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस ठाणे जिल्हा समितीच्या वतीने कल्याण पूर्व परिसरातील गरीब कुटूंबांना अन्नदान..

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ( प्रमोद शिंदे )देशभर कोविड १९ या महामारिने थैमान घातलाय. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिनांक २३ मार्च पासून १४ एप्रिल २०२० पर्यन्त संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केला आहे. या लॉकडाउनची सर्वात जास्त झळ ही रस्त्यावर राहणारे गोरगरीब तसेच रोजंदारीने काम करणाऱ्या लोकांना सोसावी लागत असून त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे.

शासनाच्या मोफत धान्य वाटप योजनेचा फज्जा उडाला आहे आणि अनेक योजना या अद्याप कागदावरच आहेत. अशा वेळेस मदतीचा एक हात पुढे करत नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस संघटनेच्या ठाणे जिल्हा समितीच्या वतीने आज दिनांक ६ एप्रिल २०२० रोजी संध्याकाळी आनंदवाडी, मिलिंद नगर, एफ कॅबिन रोड, कल्याण पूर्व या परिसरातील अपंग, बेरोजगार, रिक्षा चालक, गॅस डिलेवरी, व घर काम करणाऱ्या जवळपास २०० गरीब कुटूंबांना अन्नदान केले. संघटनेचे राज्य महासचिव अॅड.डॉ.केवलजी उके यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर गरजूंना विविधप्रकारे मदत केली जात आहे आणि आजच्या अन्नदानाप्रसंगी ते स्वता जातीने उपस्थित होते.

अश्या गोर-गरिबांना मदत करण्याकरीता बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र एंड गोवा चे सदस्य एड.गजानन चव्हान यांनी पुढाकार घेवुन आर्थिक मदत केली आहे. तसेच मानुसकिची जान असणारे ऑल.इडिया एस.सी.एस.टी.कल्याण (ओ.एच.इ.) शाखेचे अध्यक्ष सुनिल ठेंगे याच्या सारखे अनेक लोक पुढे येत आहेत. आर्थिकदृष्टया सक्षम असणाऱ्या लोकांनी पुढे येवून आणखी दान करावे जेने करून अश्या असंख्य कुटुंबाची मदत करता येइल असे अव्हाहन आजचे भोजन दानाचे मुख्य संयोजक तथा एन.डी.एम.जे.संघटनेचे ठाणे जिल्हा सचिव विनोद रोकडे यांनी केले.

यावेळी एन.डी.एम.जे. संघटनेचे जिल्हा संघटक संदेशजी भालेराव व कल्याण तालुका संघटक जितेंद्र बुकाने, प्राध्यापक संतोष बनसोडे सर तसेच अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष अमित साळवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थितीत होते. अशाप्रकारे स्वतःचा जीव धोक्यात घालून एनडीएमजेची टीम संपूर्ण महाराष्ट्रभर कोरोना ग्रस्तांसाठी काम करत असल्याने जनतेतून कौतुक होत आहे.

अन्नदान करताना एन डी एम जे राज्य महासचिव डॉक्टर एडवोकेट केवल उके
अन्नदान करताना एन डी एम जे कल्याण टीम
विशेष सहकार्य मार्गदर्शन बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र एंड गोवा चे सदस्य एड.गजानन चव्हाण साहेब
परिश्रम घेताना बंटी साळवे
अन्नदान करताना विनोद रोकडे