Blog

प्राथमिक आरोग्य फोंडशिरस येथे स्वास्थ नारी सशक्त नारी कार्यक्रम उत्साहात संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

प्राथमिक आरोग्य फोंडशिरस येथे स्वस्त नारी सशक्त नारी कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ.कुरळे मॅडम यांच्या मार्गदर्शनात व आरोग्य सहाय्यका विजया चव्हाण यांच्या नेतृत्वात विविध कार्यक्रमाचे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख माझी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एम पी मोरे, तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिंदे मॅडम, माझे आरोग्य सहाय्यका एच.डी पाटील सिस्टर व फोंडशिरस व पंचक्रोशीतील पदाधिकारी हे होते. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी डॉक्टर एम पी मोरे बोलताना म्हणाले की, फोंडशिरस पी एस सी मध्ये हा नाविनपूर्ण कार्यक्रम होत आहे तो कौतुकास्पद आहे, या कार्यक्रमात तालुका वैद्यकीय अधिकारी मॅडम सुद्धा गरोदर माता म्हणून उपस्थित आहेत, या कार्यक्रमाला खूप महत्त्व असून या कार्यक्रमात महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते त्यांना सशक्त केले जाते तसेच पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या,यावेळी तालुका आरोग्य अधिकारी शिंदे मॅडम कुरळे मॅडम आरोग्य सहाय्यक चव्हाण सिस्टर, मधुकर पाटील यांनी सर्व गरोदर हाताना शुभेच्छा दिल्या. यावेळी गरोदर मातांसाठी डोहाळ जेवणाचा कार्यक्रम, झोका,विविध खेळ,तसेच सकस आहार यामध्ये विविध प्रकारचे खाण्याचे प्रकार गरोदर माता यांना देण्यात आले. तसेच लेझीम खेळत सर्व मतांचे स्वागत करण्यात आले. यावेळी गरोदर माता तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा केंद्राचे सर्व कर्मचारी आशाताई व गटप्रवर्तक कुंभार मॅडम यांनी परिश्रम घेतले.

तरंगफळ येथे दोन नवीन अंगणवाडी मंजूर करा ग्रामपंचायत सदस्य गोरख जानकर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

माळशिरस प्रकल्प आधिकारी आस्मा आतार सी डी पी ओ मॅडम व पर्यविक्षिका लोहकर मॅडम यांनी तरंगफळ येथे भेट दिली.यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिव्यांग संघटनेचे नेते गोरख जानकर बोलत होते. तरंगफळ वार्ड क्रमांक तीन मध्ये तरंगे खोरेवस्ती तसेच जानकर वस्ती मायाका मंदिर या ठिकाणी लहान मुलांची गैरसोय होत असून त्या ठिकाणी दोन नवीन अंगणवाडी प्रस्ताव देऊन मंजुरी घ्यावी अशी मागणी जानकर यांनी केली तसेच आगतराववस्ती व वगरेवस्ती जागेची आडचण होती.ती दुर झाली इतर अंगणवाडी विषयी समाधानकारक चर्चा झाली. ग्रामपंचायत मध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामविकास अधिकारी संतोष पानसरे सरपंच नारायण तात्या तरंगे माजी सरपंच बीज उत्पादक संस्थेचे व्हाईस चेअरमन सुजित तरंगे माजी उपसरपंच शशिकांत साळवे आभिजित तरंगे लाला महानवर व आगंणवाडी सेविका जे बी साळवे व मदतनिस बी बी साळवे यांचे सह अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामस्थ उपस्थीत होते.

चिंचोली एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

: चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला आज (दि.३) सायंकाळी भीषण आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले आहेत. कल्पेश सोडा यांच्या मालकीची ही केमिकल कंपनी असून आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.अतिशय भीषण आग असून अग्निशमन दलाचे चार ते पाच बंब आगीवर नियंत्रण मिळविण्याचा आटोकाठ प्रयत्न करत आहे. आगीच्या धुराचे लोट बाहेर पडत आहेत. कंपनीतील सर्व कामगारांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले आहे. कंपनीचा आजूबाजूचा संपूर्ण परिसर पोलिसांनी खाली केला आहे. नेम की कशामुळे लागली ते समजू शकले नाही. प्रसंगावधान ओळखून आणि आग पसरत चालल्याचे पाहून सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आले. आगीच्या ज्वाळा व धुराचे लोळ पाहून बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी ही माहिती कळताच सहकार्यांसह त्यांनी कंपनी गाठली. अत्यंत ज्वलनशील केमिकल असल्याने पोलीस निरीक्षक शेडगे व अन्य सहकार्यांनी कंपनीपासूनचा एक किलोमीटर परिसर रिकामा केला आहे. अंतर्गत वापरात असणारी गॅस पाइपलाइन बंद केली आहे. तसेच कंपनीचा विद्युत पुरवठाही बंद केला आहे.कंपनीच्या आजूबाजूचे रस्ते बंदकेमिकल कंपनीला लागलेल्या आगीचे स्वरूप अत्यंत भयानक असे होते. आगीमुळे निर्माण झालेले धुराचे लोट सोलापुरातून दिसून येत होते. यावरूनच आगीचे रौद्ररूप लक्षात येते. आजूबाजूच्या कंपन्यांना धोका होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेण्यात आली होती तसेच कंपनीच्या परिसरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची पूरग्रस्त केवड व वाकाव गावांना ट्रॅक्टरद्वारे भेट; शेतकऱ्यांना दिला धीर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

जाऊन पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी शेती पिकांचे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहिले तसेच पुराच्या पाण्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधून नद्यांचे नवीन प्रवाह तयार झाल्याची प्रत्यक्ष परिस्थिती दिसून आली, अनेक शेतकऱ्यांचे पिकासह माती खरडून गेल्याचे दिसून आले, असे सर्व शेतकऱ्यांचे दुःख पाहून त्यांनी त्यांना धीर दिला. सर्व प्रशासन आपल्या सोचत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी घरांचे नुकसान, जनावरांचे नुकसान याची माहिती घेतली. तसेच प्रशासनाकडून मिळणाऱ्या मदतीबाबत नागरिकांची विचारपूस केली असता, नागरिकांनी प्रशासनाकडून तांदूळ, गह, जेवण तसेच
जनावरांना चारा व पिण्याचे पाणी ही आवश्यक मदत मिळत असल्याचे सम ाधान व्यक्त केले.
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले की, शेती पिकाच्या नुकसानीबाबत पंचनाम्यांची कार्यवाही लवकरच पूर्ण करून त्याचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. माढा तालुका प्रशासनाने घरामध्ये पाणी शिरलेल्या सर्व कुटुंबांच्या खात्यावर प्रत्येकी ₹१०,००० मदत रक्कम जमा केली आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुलदीप जंगम, माढा उपविभागीय अधिकारी श्रीमती जयश्री आव्हाड, तहसीलदार श्री. संजय भोसले तसेच तालुकास्तरीय सर्व यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
शिव निर्णय / सोलापूर, माढा तालुक्यातील केवड व वाकाव ही अतिवृष्टी व पुराने बाधित गावं असून, पुराचे पाणी ओसरल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज या गावांना प्रत्यक्ष
भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. या गावांना जोडणारे रस्ते चिखलमय झा लेले असून त्या ठिकाणी नियमित वाहने जाऊ शकत नसल्याने त्यांनी ट्रॅक्टर मधून गावांमध्ये तसेच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत

गौतमी पाटील ला अटक होणार ? पोलिसांकडून नोटीस

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

 महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ अपघात झाला होता. गौतमीच्या कारने रस्त्यावर असलेल्या एका रिक्षाला धडक दिली होती. या अपघातात रिक्षाचालकासह 2 प्रवाशांना दुखापत झाली होती. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी गौतमी पाटीलच्या चालकाला अटक केली. दरम्यान, या अपघात प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी पोलिसांनी गौतमी पाटीलला नोटीस बजावली आहे. या अपघात प्रकरणात चौकशी करण्यासाठी हजर राहण्याचे आदेश गौतमीला बजावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. सामाजी विठ्ठल मरगळे असं जखमी झालेल्या रिक्षाचालकाचं नाव आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार,  या अपघातात जो रिक्षाचालक जखमी झाला होता, त्याच्या मुलीने माध्यमांशी बोलताना मोठा खुलासा केला आहे. मुलीनं म्हटलं आहे की,  फिर्यादी बदलण्यात आला आहे. जो आरोपी अटक केला आहे, तो मुख्य आरोपी नाही.आम्हाला फक्त एक सीसीटीव्ही दाखवला. पण त्यात स्पष्ट काही दिसत नाहीय. गौतमी पाटील कारमध्ये उपस्थित होत्या. त्या सेलिब्रिटी आहेत म्हणून हे प्रकरण दाबण्याचा प्रकार चालू आहे का? दोनदा नोटीस पाठवून पण गौतमी पाटील का आल्या नाहीत? इतकं कमकुवत आहे का आपल पोलीस प्रशासन? पंचनामा न करता गाडी तिकडून कशी काय हलवली? असे प्रश्न या मुलीनं उपस्थित केले आहेत.  पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशन समोर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गौतमी पाटील विरोधात आंदोलन केलं आहे.  गौतमी पाटीलचे राज्यातील शो बंद करण्यासाठी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. गौतमी पाटीलच्या कारला पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात मंगळवारी पहाटे घडला होता.त्यावेळी गौतमी पाटील कारमध्ये नव्हती. गौतमीच्या चालकाने एका हॉटेलसमोर असलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली होती. त्यामुळे रिक्षाचं मोठं नुकसान झालं होतं. या अपघातात जे दोन प्रवासी जखमी झाले होते, त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्या दिवशी काय घडलं होतं? गौतमी पाटीलच्या कारला अपघात झाल्याची बातमी समोर येताच परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पण अपघातावेळी गौतमी पाटील कारमध्ये नसल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. सिंहगड पोलिसांकडून या अपघात प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान, अपघात नेमका कशामुळे घडला होता, याचाही तपास पोलीस करत आहेत. अपघातानंतर कारचालक फरार झाला होता, पण सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी 30 वर्षीय कारचालकाला अटक केली.
 

करमाळ्यात महाविद्यालयाच्या प्राचार्याकडून महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग; गुन्हा दाखल

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

शहरातील एका महाविद्यालयामधील प्राचार्यान महिला कर्मचाऱ्याच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्यानंतर संस्थेच्या अध्यक्षांकडे तक्रार केल्याचा राग धरून, तसेच जातीय द्वेषातून पदोन्नती मिळण्यास अडथळे निर्माण केल्यावरुन, आणि रजेचा अर्ज घेऊन गेल्यानंतर वाईट नजरेने पाहिल्याच्या कारणावरून, सदर महिला कर्मचाऱ्यांनी करमाळा पोलिसांत फिर्याद दिली आहे. याबाबत ४७ वर्षीय पिडीतेने दि. २७/०९/२५ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २६/०५/२०२३ रोजी आरोपी लक्ष्मण बाबासाहेब पाटील याने प्राचार्य कक्षात बोलावुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल. असे कृत्य करुन तिचा विनयभंग केला होता. त्यामुळे तिने दि. ३०/०५/२०२३ रोजी सदर शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षाकडे तक्रार केली होती. यागोष्टीचा राग मनात ठेवुन आरोपी पाटील याने तिला नियमाप्रमाणे मिळणारे प्रमोशन डावलून, महाविद्यालयाकडे आवश्यक असणारा प्रस्ताव पाठविण्यास टाळाटाळ केली. व तिच्याविरुद्ध विद्यापिठाकडे खोट्या तक्रारी करुन जातीय द्वेष भावनेतुन तिची चौकशी लावली. तसेच दिनांक २२/०९/२०२५ रोजी सकाळी ११/०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला कर्मचारी रजेचा अर्ज घेऊन गेली असता, आरोपी पाटील याने तिच्याकडे वाईट नजरेने बघुन तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले. सदर पिडितेच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी आरोपी लक्ष्मण बाबासाहेब पाटील याच्यावर, विनयभंगासह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमाच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा व्हि. एस. या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

जि.प.आणि पं.स. निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

राज्यात 32 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या ३३६ पंच ायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.

संबंधित जिल्हाधिकारी १० ऑक्टोबर २०२५ रोजी वृत्तपत्रात आरक्षण सोडतीसंद

र्भातील सूचना प्रसिद्ध करतील. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. त्यावर १४ ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून ३ नोव्हेंबर २०२५ रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाईल.

विजयादशमी निमित्त सोलापूर येथे रावण दहन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
 

विजयाद शमीनिमित्त दिलीपरावजी माने विचार वतीने

भारतीय विद्यापीठ ते के. एल.ई. मैदान, डी मार्टपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. आकर्षक विद्युत सजलेल्या शोभायात्रेला या नागरिकांचा मोठा प्रतिसाद मि ळाला.शोभायात्रेचा समारोप के. एल.ई. मैदान येथे झाला.याठिकाणी ‘रावण दहन’ हा भव्य सोहळा पार पडला. विजयादशम मंच ीच्या शुभमुहूर्तावर झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.रावण दहन सोहळ्याद्वारे सम रोषणाईने ाजातील वाईट प्रवृत्तींचे निर्मूलन करून सत्य, धर्म आणि न्याय यांचा संदेश देण्यात आला. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे परिसरात सणासुदीचे व उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले.

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय राज्यातील दुकानं, राहणार हॉटेल्स २४ तास खुली


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

महाराष्ट्र सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला. राज्यातील सर्व दुकानं, हॉटेल्स आणि स्थापनं २४ तास उघडी ठेवता येणार. व्यबसाय, अर्थव्यवस्था आणि पर्यटनाला मिळणार चालना, महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतलाय. राज्या-तील सर्व दुकाने आता २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. राज्यातील सर्व दुकानं, हॉटेल्स आणि इतर अस्थापना २४ तास उघडी ठेवता येणार आहेत. मात्र काही दुकानांसाठी हा नियम लागू नसेल.
महापान गृहे, बार परमिट रूम, हुक्का पार्लर, देशी बार हे २४ तास सुरू राहणार नाहीत. तर इतर सर्व आस्थापना , खाद्यगृहे, आणि दुकाने आता २४ तास सुरू राहतील. महाराष्ट्र दुकाने दुकाने आणि आस्थापना अधिनियम २०१७हा अधिनियम सर्व दुकाने, निवासी हॉटेल, उपाहारगृहे, खाद्यगृहे, थिएटर्स, सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणुकीच्या इतर जागा येतील नोकरीला राहणारे. कर्मचाऱ्यांच्या इतर सेवांतील निवमन करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित किंवा बाबींकरीता तरतूद करण्यासाठी महाराष्ट्रात हा नियम लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकर्यांचे व सेवासंबंधी नियमन) अधिनियम, २०१७ च्या कलम २१(२) मध्ये दिवस अशी व्याख्या, मध्यरात्रीपासून सुरू होणारा २४ तासांचा कालावधी, अशी नमूद करण्यात आलीय, अधिनियमाच्या कलम १६ (१) (ख) मध्ये आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस धंदा करण्यास खुल्या ठेवता येणार आहेत. मात्र तरीही प्रत्येक
कर्मचाऱ्यास आठवड्यातून २४ तास सलग विश्रांती मिळेल, साप्ताहिक सुट्टी देण्यात येईल, अशी तरतूद कायद्यात करण्यात आलीय.
महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकर्यांचे व सेवासंबंधी नियमन) अधिनियम, २०१७ च्या कलम २१(२) मध्ये दिवस अशी व्याख्या, मध्यरात्रीपासून सुरू होणारा २४ तासांचा कालावधी, अशी नमूद करण्यात आलीय. अधिनियमाच्या कलम १६ (१) (ख) मध्ये आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस धंदा करण्यास खुल्या ठेवता येणार आहेत. मात्र तरीही प्रत्येक कर्मचाऱ्यास आठवड्यातून २४ तास सलग विश्रांती मिळेल, साप्ताहिक सुट्टी देण्यात येईल, अशी तरतूद कायद्यात करण्यात आलीय.
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेव-शर्तीचे चिनियम) अधिनियम, कलम ११ नुसार, राज्य सरकारला विविध क्षेत्रांसाठी किंवा आस्थापनांच्या
बेगवेगळ्या वर्गासाठी सुरू आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित करण्याचा अधिकार आहे. शासनाने १९ डिसेंबर २०१७ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुस-पर, परमिट रूम, बिअर बार, डान्सबार, हक्का पार्लर, डिस्कोथेक, तसेच वाईन आणि मद्य विक्री करणाऱ्या दुकाने यांच्याच वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. नंतर ३१ जुलै २०१९ रोजी थिएटर आणि सिनेमा गृहांना या यादीतून बगळण्यात आले.
राज्यात २४ तास काय सुरू?
सर्व दुकाने, निवासी हॉटले, उपाहारगृहे, खाद्यगृहे, थिएटर, सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणुकीच्या इतर जागा इतर आस्थापना काय बंद राहणार?
मद्यपान गृहे, बार परमिट रूम, हुक्का पार्लर, देशी बार स्थानिक प्रशासनाची अडचण
स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून अनेकदा मद्य विक्री न करणाऱ्या आस्थापनांवर २४ तास सुरू ठेवण्यास निर्बंध लावल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, मद्य विक्री आणि पुरवठा करणाऱ्या आस्थापनांना सोडून इतर सर्व आस्थापना कायद्यानुसार २४ तास सुरू ठेवता येतील. व्यापारी संघटनांचे स्वागत आणि अपेक्षित फायदे
व्यापारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, त्यामुळे राज्यातील रात्रीचे अर्थचक्र (छळसहीं एलेपेा) वेगवान होईल, रोजगारनिर्मिती वाढेल आणि पर्यटनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

१० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली १० टक्के दरवाढ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, एसटी महामंडळ दरवर्षी दिवाळी दरम्यानदहा टक्के भाडेवाढ करीत असते. यातून साधारणपणे महामंडळाला ३० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र, यंदा राज्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती लक्षात घेऊन अपवाद म्हणून महामंडळाने जाहीर केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द करण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.