Blog

“मी आंबेडकरवादी” सामाजिक संघटनेचा विद्यमान आमदार दत्तामामा भरणे यांना बिनशर्त पाठिंबा.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-प्रमोद शिंदे
“मी आंबेडकरवादी” सामाजिक संघटनेने या विधानसभेच्या निवडणुकीत विद्यमान आमदार दत्तामामा भरणे यांना बिनशर्त पाठिंबा रविवार दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी भरणेवाडी येथील आमदारांच्या निवासस्थानी दिला. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे , संघटनेचे सचिव अनिल केंगार, राजशिष्टाचार समितीचे आप्पासो कदम, नागेश भोसले,मिलिंद भोसले, तालुका अध्यक्ष सतीश वाघमारे, समाधान भोसले, अशोक मिसाळ , बबलू वंचाळे हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
इंदापुर तालुक्याच्या ८० गावात संघटनेचे जाळे असुन संघटनेला मानणारे कार्यकर्ते आहेत. संघटनेकडे निर्णायक मते असुन त्याचा फायदा दत्तात्रय भरणे यांना होणार आहे.
विद्यमान आमदारांनी तालुक्यात अनेक गावांमध्ये बुध्दविहार बांधण्यासाठी निधी, बुध्दविहार सुशोभीकरणासाठी निधी, अनेक दलित वस्त्यांमध्ये सामाजिक सभागृहांना निधी, अभ्यासिकांसाठी निधी,दलित वस्त्यांमध्ये अंतर्गत रस्त्यांसाठी निधी,बंदिस्त गटार योजनांसाठी निधी,बौद्ध विहारांच्या स्वागत कमानीसाठी निधी ,प्रकाश व्यवस्थेसाठी निधी,लासुर्णे येथे भव्य संविधान भवन बांधण्यासाठी भरघोस ३ कोटींचा निधी दिला आहे. म्हणूनच संघटनेने बिनशर्त पाठिंबा दिला असून संघटनेचे प्रमुख पदाधिकारी सर्व इंदापूर तालुक्यात गावभेट दौरा करणार असुन जास्तीत जास्त मतदान दत्तात्रय भरणे यांना देण्यासाठी मतदारांना विनंती करणार आहेत.

https://youtu.be/1S4DW_PuWmQ?si=F1YPJzXkFUR2fe1L
🎊🎉💥यंदाच्या दिवाळीची खरेदी फक्त यश लाइफस्टाइल मध्येच करा
कारण इथे आमच्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन येत आहोत . दिवाळी साठी खास दिवाळी बंपर प्राईस,🎁🛍️ आमच्याकडे साड्या,शूटिंग ,शर्टिंग,रेडीमेड जीन्स, पॅन्ट, शर्ट टी-शर्ट मध्ये कपड्यांच्या भरपूर वरायटीज.सर्व वयोगटातील जेंट्स आणि लेडीज साठी कपड्याचे भव्य दोन मजली दालन.तर चला मग आजच यश लाइफस्टाइल मध्ये दिवाळीची खरेदी करू. आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी खास दिवाळी ऑफर. 2500 रुपयाच्या पुढील प्रत्येक खरेदीवर खास आकर्षक हमखास भेटवस्तू सोबत एक लकी ड्रॉ कुपन , त्यामध्ये हिरो स्प्लेंडर – १, हिरो डेस्टिनी, – १, वरफुल फ्रिज – १,मोबाईल – 3,LED-32″- 3,कूलर-5
नियम व अटी लागू
आमचा पत्ता-
भगवान महावीर पथ
नातेपुते, ता माळशिरस,जि. सोलापूर
मो.८४३२१७१००८ ९४२३३२८८१३🎉🎊 आपल्या परिसरातील बातम्यां आणि जाहिराती संपर्क-9975903040

दहिगाव हायस्कूलचे लिपिक धनाजी फुले सर यांना आदर्श लिपिक पुरस्कार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

दहिगाव हायस्कूलचे लिपिक धनाजी फुले सर यांना आदर्श लिपिक पुरस्कारनातेपुते ( -दहिगाव हायस्कूल दहिगाव चे लिपिक धनाजी भानदास फुले यांनासोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटनेकडून जिल्हा स्तरीय आदर्श लिपिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाळेच्य्या प्रत्येक उपक्रमांत पडद्यामागील कलाकार म्हणून त्यांनी केलेली प्रमाणिक कामगिरी या मुळेच त्यांना आदर्श लिपिक म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार महामंडळाचे माजी अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य तथा नियोजन समिती सदस्य सुभाष माने, राजेंद्र आहिरे शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे, रावसाहेब मिरगणे शिक्षण उपनिरीक्षक, सचिन जगताप शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि. प. सोलापूर,  सुलभा वठारे शिक्षणाधिकारी (योजना) सोलापूर, मुख्याध्यापक संघटनेचे नियंत्रक समितीचे अध्यक्ष सुभाषराव माने सर, अनिल माने अध्यक्ष शिक्षकेतर महामंडळ, शिवाजी खांडेकर कार्यवाह शिक्षकेतर महामंडळ व श्री गोवर्धन पांडूळे पुणे विभागीय कार्यवाह इत्यादी प्रमुख पाहूणे उपस्थित होते.सदर कार्यक्रम शनिवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ रोजी  मुळे हॉल हरिभाई देवकरण प्रशाला सोलापूर येथे संपन्न झाला.यावेळी मुख्याध्यापक चव्हाण सर व स्टाफ उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष रविकांत सुर्वे तर आभार सचिव मुस्ताक शेख यांनी व्यक्त केले.

*आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क-9975903040*

माळशिरस तालुक्यात येळीव येथे औद्योगिक वसाहतीला मंजुरी आमदार रणजितसिंह व धैर्यशील खासदार मोहिते पाटील द्वयांच्या म प्रयत्नांना यश

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

प्रतिनिधी सहकाराच्या माध्यमातून प्रगतीपथावर असलेल्या म ाळशिरस तालुक्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी मिनी औद्योगिक वसाहत व्हावी यासाठी आ रणजितसिंह मोहिते पाटील व खा धैर्यशील मोहिते पाटील यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती त्याला यश आले असून माळशिरस तालुक्यातील येळीव येथे औद्योगिक वसाहतीला मंजुरी दिल्याचे पत्र प्राप्त झाले आहे.

आ मोहिते पाटील व खा धैर्यशील म ोहिते पाटील यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची मुंबई मंत्रालयात भेट घेवून मागणीचे पत्र दिले होते. या पत्रात माळशिरस तालुक्यात सुमारे ४ लाख ८५ हजार लोकसंख्या असून सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या मोठी आहे. या तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी ाळशिरस तालुक्याच्या मध्यभागी माळशिरस पुरंदावडे, येळीव व सदाशिवनगर

जवळ शेती महामंडळाची सुमारे २१० एकर सलग जमीन आहे या जमिनीवर मिनी औद्योगिक वसाहत उभा राहिल्यास शासनाला जमीन विकत घ्यावी लागणार नाही तसेच येथे औद्योगिक वसाहत उभा राहिल्यास माळशिरस तालुक्यासह लगतच्या फलटण व माण तालुक्यातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल ही जागा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर असल्याने दळणवळणासाठीही उद्योजकांना फायदेशीर आहे त्यामुळे येथे मिनी औद्योगिक वसाहतीला मंजूरी मिळावी अशी मागणी दि ११ जुलै रोजी केली होती.

या मागणीचा विचार करुन शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार मंत्रालयाचे अप्पर सचिव किरण जाधव यांनी म हाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्व मारे मा. प्रधान सचिव (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखाली दि. ११ ऑक्टोंबर २०२४ रोजी झालेल्या १६६ व्या उच्चाधिकार

समितीसमोर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या बैठकीत उच्चाधिकार समितीने माळशिरस औद्योगिक क्षेत्र मौजे माळशिरस येथे २९.१८ हे. आर क्षेत्र व मौजे येळीव येथील ३०.२९.८१ है. आर असे एकूण ५९.४७.८१ हे. आर क्षेत्रास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अधिनियम, १९६१ अन्वये कलम २ खंड (ग) च्या तरतूदी लागू करणेबाबत दि. १४ ऑक्टोंबर रोजीच्या पत्राद्वारे कळविले आहे या प्रकरणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने इतिवृत्त अंतिम होण्याची वाट न पाहता पुढील आवश्यक कार्यवाही सत्वर करावी अशी सूचना केली आहे माळशिरस तालुक्यातील येळीव येथील शेती महामंडळाच्या जागेत औड्योगिक वसाहत होण्यास मंजुरी मि ळाल्याने माळशिरस तालुक्यासह लगतच्या तालुक्यातील युवकांमध्ये आनंदाचे वा- तावरण पसरले आहे.

कॅनल मध्ये मास फेकणाऱ्या वर कारवाई न केल्यास पाटबंधारे अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फसणार-अनुप शहा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमुख शिंदे


फलटण तालुक्यातील चौधरवाडी गावाच्या हद्दीमधील गो हत्या करून गोमास कॅनॉल मध्ये फेकून देण्यात आले आहे यामुळे फलटण शहर व परिसरातील शाकाहारी समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे याबाबत तातडीने पाटबंधारे खात्याने भूमिका न घेतल्यास व सदरचे कृत्य कोणी केले याचा छडा न लावल्यास भारतीय जनता पार्टी फलटण शहरच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शहराध्यक्ष अनुपशहा यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे बाबत अधिक माहिती अशी की फलटण हे मानभाव व जैन समाजाची दक्षिणकाशी म्हणून प्रसिद्ध आहे संतांची भूमी म्हणून सुद्धा फलटणचा उल्लेख होतो परमपूज्य गोविंद महाराज उपळेकर सद्गुरु हरिभाऊ महाराज यांच्या समाधी ही फलटणमध्ये आहेत हे सर्व समाज शाकाहारी असल्याने ते आपल्या धर्माच्या परंपरेनुसार त्याचं पालन करत असतात व नगरपालिका नीरा उजवा कॅनल मधून येणाऱ्या पाण्यातून शहराला पाणीपुरवठा करत असते मात्र हा कॅनॉल तरडगाव साखरवाडी चौधरवाडी या मार्गे फलटण शहरातून पुढे पंढरपूर माळशिरस कडे जातो या कॅनॉलमध्ये काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक जातीय सलोखा बिघडवण्यासाठी गोहत्या करून या गोमातेचे मांस या कॅनल मध्ये टाकल्याने जैन समाज व मानभाव पंथीय समाज तसेच मारवाडी समाज यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे हे गोमास टाकलेल्या ठिकाणाहून आलेले पाणी नगरपरिषदेने शहराला वितरित करून ते पाणी अजाणते पणे शाकाहारी समाजाच्या लोकांना प्यावं लागले आहे त्यामुळे हा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून प्रशासनाने तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे तसेच पाटबंधारे विभागाने याबाबत कारवाईची भूमिका न घेतल्यास अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासून त्याची प्रतिकात्मक गाढवावरून भेंड काढण्यात येणार आहे असा इशारा फलटण शहर भाजपा अध्यक्ष अनुप शहा यांनी पत्रकामध्ये दिला आहे.

नातेपुते कंगन फॅशन शोरूम चे उद्घाटन

 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

नातेपुते तालुका माळशिरस येथे विजय दशमी दसरा निमित्त कंगन फॅशन कपड्याचे शोरूम चे उद्घाटन मा.आमदार रामहरी रूपनवर मा.जि प उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख मा सरपंच बी.वाय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी बोलताना बाबाराजे देशमुख म्हणाले की. सुलतान सय्यद यांनी अतिशय परिश्रम करून हा उद्योग व्यवसाय उभारला आहे. सुरुवातीच्या काळात हमाली मोलमजुरी तसेच बाजारात कॉट वरती मुंबईवरून आणून कपडे विकण्याचे काम केलं आहे.कष्ट मेहनत जिद्द चिकाटी प्रामाणिकपणा च्या जोरावर हळूहळू व्यवसायाची प्रगती करत आज त्यांची भव्यदिव्य चार दुकाने झाले आहेत. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, माऊली पाटील,नगराध्यक्ष अनिता लांडगे,उपनगराध्यक्ष अतुल पाटील,मालोजीराजे देशमुख, उद्योजक शरद मोरे,अविनाश दोशी,विशाल साळवे, साळवे,राजकुमार पांढरे,सचिन पांढरे, तसेच परिसरातील मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक बशीर काजी व,सूत्रसंचालन औदुंबर बुधावले पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन सुलतान सय्यद,समीर सय्यद,जमीर सय्यद यांनी केले. 

ॲट्रॉसिटीॲक्ट च्या अंमलबजावणीसाठी एकही बैठक न घेणारे पहिले मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे होय…. वैभव गिते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

राज्यात मातंग,बौद्ध,चर्मकार,होलार या समाजासह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती दलित आदिवासींवरील अन्याय अत्याचारांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली. यातील प्रमुख कारण म्हणजे ॲट्रॉसिटी ॲक्टच्या नियमांप्रमाणे मुख्यमंत्री हे राज्यस्तरीय उच्च अधिकारी दक्षता व नियंत्रण समितीचे अध्यक्ष असतात एका वर्षातून दोन वेळा बैठका घेणे कायदेशीर बंधनकारक आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 30 जून 2022 रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून ॲट्रॉसिटी ॲक्ट च्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय उच्च अधिकार दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना करण्यासाठी विलंब तर केलाच शेवटी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे राज्य सचिव वैभवजी गिते यांच्या मंत्रालयीन पाठपुराव्यामुळे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक 24 जुलै 2023 रोजी शासन निर्णय काढून या समितीची पुनर्रचना केली. या समितीमध्ये मुख्यमंत्री अध्यक्ष तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री गृह,अजित पवार उपमुख्यमंत्री वित्त,शिवाय चार लोकसभा सदस्य यामध्ये डॉ.हिना विजयकुमार गावीत, राजेंद्र गावित, सदाशिव लोखंडे, अशोक नेते, हे सदस्य आहेत. तसेच 12 विधानसभा सदस्य डॉ.बालाजी कीनिकर, मंगेश कुडाळकर, ज्ञानराज चौगुले,शांताराम मोरे, श्रीनिवास वनगा, श्रीमती लताबाई सोनवणे, प्राचार्य अशोक उईके, सुनील कांबळे, डॉ.देवराज होळी,श्रीमती नमिता मुंदडा, काशीराम पावरा, नामदेव ससाने, हे सदस्य आहेत.आणि मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव ग्रह, अपर मुख्य सचिव आदिवासी विकास विभाग, पोलीस महासंचालक, संचालक/उपसंचालक राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग, सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अशी एकूण 25 जण सदस्य आहेत. या समितीमध्ये मुख्यमंत्री अध्यक्ष तर सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हे निमंत्रक आहेत.
एवढी महत्त्वपूर्ण समितीची एकही बैठक झाली नाही. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली नाही तर या समितीतील लोकसभा सदस्य व विधानसभा सदस्यांनीही बैठक घेण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व मुख्यमंत्री महोदयांना केला नाही.

या समितीची कार्ये खालील प्रमाणे आहेत.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ (सुधारित अधिनिमय, २०१५) व सुधारित नियम, २०१६ ची अंमलबजावणी राज्यात योग्य रितीने व काटेकोरपणे होते किंवा कसे याचा आढावा घेणे तसेच या संदर्भातील प्रकरणांचा आढावा घेणे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ (सुधारित अधिनिमय, २०१५) व सुधारित नियम, २०१६ अंतर्गत अत्याचारग्रस्त अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना देण्यात येणारे आर्थिक सहाय्य/मदत नियमांनुसार देण्यात येते किंवा कसे, याबाबतच्या प्रकरणांचा आढावा घेणे.

अत्याचारग्रस्त अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व्यक्तींचे पुनर्वसन इ. नियमानुसार व तात्काळ करण्यात येत आहे किंवा कसे, या संदर्भातील प्रकरणांचा आढावा घेणे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ (सुधारित अधिनिमय, २०१५) व सुधारित नियम, २०१६ अंतर्गत पोलिसात दाखल करण्यात आलेले गुन्हे/न्यायालयात दाखल करण्यात आलेली प्रकरणे यांचा आढावा घेणे.

या अधिनियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी संबंधित संस्था/अधिकारी/ कार्यालयाकडून होते आहे किंवा कसे याचा आढावा घेणे.इत्यादी महत्त्वपूर्ण कामे या समितीची आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी एकही बैठक घेतली नाही. कोणत्याही जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक,पोलीस आयुक्त,जिल्हाधिकारी मंत्रालय स्तरावरील समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) यांचा आढावा घेतला नाही.
1)ॲट्रॉसिटी ॲक्ट चे खटले जलदगतीने ॲट्रॉसिटी कायद्यातील तरतुदीप्रमाणे दोन महिन्यात निकाली काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशिष्ट विशेष न्यायालयांची स्थापना केली नाही.

2) बौद्ध मातंग चर्मकार दलित आदिवासी यांच्या हत्या (खून) प्रकरणात पुनर्वसन करण्यासाठी आकस्मिकता योजना कंटीजंन्सी प्लॅन लागू केला नाही. हत्या प्रकरणात शासकीय नोकरी जमीन पेन्शन मिळण्यासाठी सुधारित शासन निर्णय काढला नाही.3) ॲट्रॉसिटी ॲक्ट चे खटले हाताळण्यासाठी नियुक्त विशेष सरकारी वकिलांना देण्यात येणाऱ्या परिणामकारक की व अपरिणामकारक याबाबतीत एकसूत्रीपणा आणला नाही.

4) अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी,अन्याय अत्याचार होऊच नयेत याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या नाहीत.

यामुळेच महाराष्ट्रात जातिवाद बोकाळला असुन अत्याचार करणाऱ्यांना कायद्याची भीती उरली नाही. राजरोसपणे बौद्धमातन चर्मकार अनुसूचित जाती जमाती दलित आदिवासींचे मुडदे पाडले जात आहेत. बालकांवर,महिलांवर अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे.

मुख्यमंत्री महोदयांनी दोन वर्ष व चार महिन्यांमध्ये किमान चार बैठका घेणे बंधनकारक होते परंतु त्यांनी एकही बैठक घेतली नाही.
तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट च्या नियमाप्रमाणे मंत्रालय स्तरावर प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती होण्यासाठी
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गीते यांनी पाठपुरावा केल्याने शासनाने 22 नोव्हेंबर 2022 रोजी प्रधान सचिव हर्षदीप कांबळे उद्योग व ऊर्जा विभाग यांची ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंमलबजावणी करिता मंत्रालय स्तरावर समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) म्हणून नियुक्ती केली समन्वय अधिकारी यांनी प्रत्येक तीमाहीस संबंधित सनदी अधिकाऱ्यांची बैठक घेणे बंधनकारक आहे.तरी देखील प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी अद्याप एकही बैठक घेतली नाही.

ॲट्रॉसिटीॲक्ट च्या अंमलबजावणीसाठी एकही बैठक न घेणारे पहिले मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे व ॲट्रॉसिटी ॲक्ट च्या अंमलबजावणीसाठी एकही बैठक न घेणारे पहिले समन्वय अधिकारी प्रधान सचिव हर्षदीप कांबळे आहेत.

नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय महारुद्र परजणे व पोलीस कर्मचारी यांना उत्कृष्ट गुन्हे सिद्धी पुरस्कार


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे तसेच पोलीस स्टेशन मधील काही पृष्ठ काम करणारे पोलीस कर्मचारी यांना
पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते उत्कृष्ट गुन्हे सिद्ध पुरस्कार देण्यात आला.
सोलापूर ग्रामीण तर्फे शिंगणापूर घाटातील हार्वेस्टिंग व मोटारसायकल अपघात झाला होता त्यावेळी घटनास्थली लवकर जाऊन मदत केल्याबद्दल मा पोलीस अधीक्षक सो अतुल कुळकर्णी सर,अप्पर अधीक्षक प्रीतम यावलकर यांचे हस्ते सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने पोकॉ अमोल देशमुख HC/211 राहुल रणनवरे, पोना 559 अमोल वाघमोडे पोना 562 राकेश लोहार यांना उत्कृष्ट गुन्हे सिद्धी पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वच पुरस्कारार्थी यांचे सोशल इंडियाच्या माध्यमातून कौतुक होत आहे.

भीषण अपघातानंतर नातेपुते पोलिसांनी शिंगणापूर पाटी येथे दिशादर्श फलक लावले.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

रविवारी पहाटेच्या सुमारास दिशादर्शक फलक न दिसल्याने रॉंग साईडने वाहने जाऊन भीषण अपघात झाला व त्या अपघातात पाच लोक मृत्युमुखी पडले दोन जन जखमी झाले व मृत चालकावर अपघाता संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. या अपघाताची नातेपुते पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी दखल घेऊन.तात्काळ शिंगणापूर पाटी पुणे-पंढरपूर पालखी महामार्ग येथे. मोठे दिशादर्शक फलक लावून.रॉंग साईडने येणाऱ्या वाहनांवरती कारवाई करण्यास सुरुवात केली. व त्या ठिकाणी स्वतः उभे राहून लोकांमध्ये जनजागृती केली. अपघात झाल्यानंतर वर्तमानपत्राद्वारे ठिकठिकाणी हे दिशादर्शक फलक लावण्याची मागणी करण्यात आली होती. याचीच दखल घेत एपीआय महारुद्र परजणे व पोलीस कर्मचारी यांनी फलक लावल्यामुळे परिसरातून पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले जात आहेत.

लोककलावंत शांताबाई गडपाईले यांना वालचंद नगर येथे आदरांजली अर्पण. 

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क


कशाला मी जाऊ कुणाच्या गटात,
सुखी आहे मी माझ्या भिमाच्या झोपडीत,
कशाला करु कुणाची हांजी हांजी,
स्वाभिमानी माणसं आहेत माझी”
असा आपल्या गायिकेच्या माध्यमातून संदेश देणाऱ्या लोककलावंत माई उर्फ शांताबाई राजाराम गडपायले यांचे वृद्धापकाळाने सप्टेंबर महिन्यात निधन झाले. त्यांचे पती महाकवी, गायक राजानंद गडपायले यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गौरविले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गौरवलेले एकमेव कवी, गायक म्हणून त्यांचे नाव अजरामर झाले. या दांपत्याने आंबेडकरवादी चळवळ गतिमान व मजबूत करण्याचे महान कार्य केले. पतीच्या पश्चात व मुलाच्या निधनानंतर ही गावोगावी जाऊन शांताबाई यांनी प्रबोधन केले. तिन पिढ्यांच्या लोकांसोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. व वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. घाटकोपर ला झालेले रमाबाई नगर मधील हत्याकांड व मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या लढाईत आपल्या शाहिरी च्या माध्यमातून चळवळीची ज्योत तेवत ठेवली. आंबेडकरवादी चळवळीतील या दांपत्याने योगदान अनन्यसाधारण आहे.
अशा माई उर्फ शांताबाई राजानंद गडपायले यांच्या निधनाबद्दल रविवार दि. ६ ऑक्टोंबर २०२४ रोजी इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथे महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन(ग्रामपंचायत हॉल) मध्ये “मी आंबेडकरवादी” सामाजिक संघटनेच्या वतीने अभिवादन सभा आयोजित केली होती. यावेळी आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते विकासदादा धाईंजे, “मी आंबेडकरवादी” सामाजिक संघटनेचे सुरजभैय्या वनसाळे,प्रा.डॉ.अरूण कांबळे, रिपाइं चे तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरवदे, पत्रकार प्रमोद शिंदे, विशेष सरकारी वकील ॲड. अमोल सोनवणे यांनी भाषणातुन त्यांचा जीवनपट उलगडून आदरांजली वाहिली तत्पूर्वी प्रास्ताविक, सूत्रसंचालन जेष्ठ पॅंथर सु.ग. साबळे यांनी केले.
यावेळी महाराष्ट्राचे लाडके गायक विजय सरतापे, शाहिद जितेंद्र धाईंजे, गायक राहुल क्षिरसागर, गायक बाळासाहेब सरवदे, गायक दिलीप भोसले यांनी गीतांच्या माध्यमातून काव्यरुपी पुष्पांजली वाहीली. यावेळी प्रा.सर्वगोड सर,”मी आंबेडकरवादी” सामाजिक संघटनेचे अनिल केंगार, सौरभ धनवडे, सोनु मोरे, अशोक मिसाळ,बौद्ध धम्म प्रसारक आनंद फरतडे, किशोर काळे तसेच अनेक लोककलावंत, भिमसैनिक उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरज वनसाळे, सु.ग. साबळे, विजय सरतापे, राहुल क्षिरसागर यांनी प्रयत्न केले.

नातेपुते नजीक कारुंडे पुलावर कार आणि टेम्पोच्या धडकेत पाच ठार दोन जखमी

नातेपुते प्रतिनिधी: (प्रमोद शिंदे)
कास पठार पाहण्यासाठी जात असताना नातेपुते नजीक कारुंडे पुलावर चुकीच्या मार्गाने जात असताना कार आणि टेम्पोच्या धडकेत पाच ठार तर दोन जन जखमी झाले आहेत.
हकीकत आशिकी. नातेपुते कडून फलटण मार्गे कास पठारला जात असताना. नवीन रस्त्याच्या कामामुळे रस्ता चालकाच्या लक्षात न आल्यामुळे तसेच रस्त्यालगत सुचक बोर्ड कमी प्रमाणात असल्यामुळे
चुकीच्या मार्गाने निघालेल्या कार आणि टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला व मायलेकासह पाचजण ठार झाले, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना पुणे-पंढरपूर या पालखी मार्गावरील नातेपुते जवळील कारुंडे (ता. माळशिरस) येथे रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.
या अपघातात राजेश अनिल शहा (वय ५५, रा. जंक्शन, ता. इदापूर), दुर्गेश शंकर घोरपडे (२८, लासुर्णे, ता. इदापूर), कोमल विशाल काळे (३२), शिवराज विशाल काळे (१०), आकाश दादा लोंढे (२५) हे जागीच ठार झाले, तर अश्विनी दुर्गेश घोरपडे (२४) व पल्लवी पाटील (३०, रा. वालचंद नगर) हे जखमी झाले आहेत.
सदर मिळालेल्या माहितीवरून लासुर्णे (ता. इंदापूर) येथील कॉन्ट्रॅक्टर राजेश शहा हे कारने (एच ४२ एक्यू ०५६४) आपल्या कामगारांना घेऊन सातारा येथील कास पठार पाहण्यासाठी निघाले होते. ते रस्ता लक्षात न आल्यामुळे नातेपुते येथून राँगसाइडने निघाले होते. नातेपुते नजीक कारुंडे, ता. माळशिरस येथील पुलापवर
एक्यू ३३९२) आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, टेम्पोखाली कार चक्काचूर झाली होती. घटनेची माहिती मिळताच नातेपुते पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महारुद्र पराजणे व पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याला सुरुवात केली. जखमींना तत्काळ ॲम्बुलन्स च्या साह्याने अकलूज येथे उपचारासाठी दाखल केले. याबाबत दुर्गेश मोतीराम घोरपडे (वय ३५) यांच्या फिर्यादीवरून मृत कारचालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुर्गेश घोरपडे यांचे चार महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. अपघातात त्यांचा मृत्यू झाला, तर दुर्गेश यांची पत्नी अश्विनी या गंभीर जखमी झाल्या आहेत. शिवाय कोमल काळे व त्यांचा दहा वर्षांचा मुलगा शिवराज काळे या मायलेकाचाही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होते आहे.

सदर अपघात हे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे होत असून पुणे पंढरपूर हा पालखी मार्ग महामार्ग असून या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची येजा होते. त्यामध्ये रस्त्याचे काम संत गतीने चालू असून ते पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आधी मधी रस्ता वळवण्यात आला आहे. व तेथे बोर्ड लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहन चालकाच्या लक्षामध्ये रस्ता वळवलेला येत नाही. तसेच नातेपुते शहरातून निघताना शिंगणापूर पाठीजवळ फलटण कडे जाण्याच्या मार्गासाठी मोठा बोर्ड असण्याची आवश्यकता आहे. परंतु त्या ठिकाणी मोठा बोर्ड नाही मोठा बोर्ड नसल्यामुळे. वाहने रॉंग साईडने जातात. व सतत या ठिकाणी अपघात होतात. याकडे बांधकाम विभाग तसेच प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याकारणाने मोठ्या प्रमाणात अपघात होऊन लोकांना प्राण गमवावे लागतात अशा प्रकारचे मत जनसामान्यातून येत आहे. तसेच महामार्गावरती लवकरात लवकर दिशादर्शक फलक लावण्याची मागणी करण्यात येत आहे.

You may have missed