प्रमोद शिंदे

एसटी ड्रायव्हरच्या हुशारीने प्रवाशाचे प्राण वाचलेशिंगणापूर घाटात एसटी ब्रेक फेल झाल्याने दरीत जाता जाता वाचली

एसटी ड्रायव्हरच्या हुशारीने प्रवाशाचे प्राण वाचलेशिंगणापूर घाटात एसटी ब्रेक फेल झाल्याने दरीत जाता जाता वाचली

नातेपुते प्रतिनिधी:-नातेपुते येथील शिंगणापूर जवळील भवानी घाटात नातेपुते दहिवडी एसटी घेऊन जात असताना अचानक शिंगणापूर घाटाकडे जाणाऱ्या शेवटच्या वळणावर एसटी चे ब्रेक फेल झाल्याने गाडी दरी त जाते असे दिसत असताना एसटी ड्रायव्हर उमाजी खरात यांच्या चालाखीने वेळ प्रसंग बघून गाडीला रिव्हर्स मारून गाडी  पाठीमागे हळूहळू घेऊन पाठीमागे धडकवली त्यामुळे   दरीत जाणारी गाडी वाचून किरकोळ अपघात होऊन नऊ जण जखमी झाले आहेतयाबाबत सविस्तर माहिती अशी की नातेपुते येथून दहिवडीकडे जाणारीगाडी नंबर एम एच 0 7 सी 91 79 ही गाडी नातेपुते शिंगणापूर कडे निघाले असता घाटाच्या शेवटच्या वळणावर अचानकपणे गाडीचे ब्रेक फेल झाल्याने गाडी घाटातील दरी च्या दिशेने जाऊ लागल्याचे पाहून एसटी ड्रायव्हर उमाजी खरात यांनी हुशारीने गाडीचा रिव्हर्स मारून गाडी पाठीमागे नेऊन डोंगरावर आदळी त्यामुळे गाडीचे नुकसान झाले व प्रवाशांना नऊ प्रवासी हे जखमी झाले परंतु जर गाडी दरीत कोसळली असती तर फार मोठा अपघात झाला असता या गाडीमध्ये प्रवासी मोहन आबा तुपे राहणार शिंगणापूर, भगवान अण्णा तुपे शिंगणापूर, सुभाष कृष्णाजी चितळीकर राहणार चीतळी, सुमन विठ्ठल राऊत नातेपुते, ज्योती प्रकाश बनसोडे राहणार सदाशिवनगर, सिंधू मोहन तुपे राहणार शिंगणापूर, प्रेरणा अण्णा कुंभार राहणार फोंडशिरस ,प्रतिक्षा अजय तुपे राहणार शिंगणापूर संजीवनी राजू राजाळे राहणार विटा हे प्रवासी जखमी झालेले आहेतयाबाबत प्रवासी संजीवनी राजगिरे म्हणाल्या की एसटी ड्रायव्हर यांनी ज्या हुशारीने सर्व प्रवाशाचे प्राण वाचवले त्याबद्दल खरं त्यांना धन्यवाद दिले पाहिजे कारण गाडी ब्रेक फेल झाल्यानंतर जरीच्या दिशेने जाऊ लागल्यानंतर सगळ्याचा काळजाचा ठोका चुकला होता परंतु ड्रायव्हर उमाजी खरात हुशारीने गाडीला रिव्हर्स घेऊन पाठीमागे डोंगरावर गाडी थोडीशी आदळी व सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले असे सांगितले

एन डी एम जे च्या वतीने भारतीय दूतावास जयपाल देठे (IFS) व नूतन अधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

एन डी एम जे च्या वतीने भारतीय दूतावास जयपाल देठे (IFS) व नूतन अधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदेदूतावास ओमन देशाचे दुतीय सचिव इंडियन फॉरेन सर्व्हिस(IFS) तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर विशाल लोंढे यांच्यासह नूतन प्रशासकीय अधिकाऱ्यांचा नातेपुते येथे एन डी एम जे संघटनेच्या वतीने भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला.
सुट्टी निमित्त ओमान येथून मायदेशी भारतात आलेल्या नातेपुते माळशिरस तालुक्यातील पहिले आय एफ एस भारतीय दूतावास ओमान देशाचे द्वितीय सचिव जयपाल देठे साहेब यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन एन डी एम जे राज्य सचिव वैभव गीते यांच्यावतीने करण्यात आले होते. तसेच सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी विशाल लोंढे कोल्हापुर जिल्ह्यातील जातीय अत्याचारात खून झालेल्या सर्व खून प्रकरणात 5000 रुपये पेंशन मंजूर केल्याने केल्याबद्दल व नूतन प्रशासकीय सेवेत विराजमान झालेले नायब तहसीलदार प्रतीक आढाव,सिद्धार्थ गायकवाड, वस्तू विक्री कर निरीक्षक शरद आढाव विशेष सरकारी वकील बापूसाहेब शीलवंत,कृषी अधिकारी कोमल झेंडे,सहाय्यक अभियंता ऐश्वर्या भोसले,भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू किरण नवगिरे, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे पंढरपूर तालुकाप्रमुख बनसोडे,बी ए एम एस डॉ. किरण चंदिशि, नातेपुते येथील वडार समाजातील पहिले एलएलबी वकील ऍड विजय काळे,तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भारतीय दूतावास ओमान देशाचे द्वितीय सचिव मा.जयपाल देठे, एन.डी. एम.जे राज्य महासचिव ऍड डॉ.केवलजी ऊके,Adv. बी.जी.बनसोडे, विकास दादा धाईंजे,वैभव गीते उद्योजक विनोदजी जाधव,दलित पॅथर चे नेते सु.ग.साबळे यांच्या हस्ते भारतीय संविधान देऊन सन्मान करण्यात आला.तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांना पुरोगामी महाराष्ट्र च्या वतीने छत्रपती शाहू महाराज आदर्श अधिकारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमादरम्यान सर्व मान्यवर व अधिकाऱ्यांच्या वतीने आतापर्यंत 64 कुटुंबाचे पुनर्वसन केल्याबद्दल वैभव गीते यांचा सहकुटुंब विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक विजय सरतापे यांच्या भीम गीतांनी करण्यात आली व कार्यक्रमाचे सांगता सुप्रसिद्ध विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांच्या कविताने करण्यात आले.या कार्यक्रमास एन.डी.एम जे चे शिवराम कांबळे,पंचशीलाताई कुंभारकर,बंदिश सोनवणे,शशी खंडागळे,विशाल साळवे,प्रमोद शिंदे रोहित एक मल्ली पंकजकाटे,यताळ खरबडे संघर्ष सोरटे संजय झेंडे बाबासाहेब सोनवणे सुनील भोसले नाना गायकवाड गणेश गायकवाड सचिन झेंडे मुंबई पुणे पंढरपूर सोलापूर बारामती इंदापूर फलटण नातेपुते व पंचक्रोशीतून कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिरळे येथील पवार वस्ती ते वाघ वस्ती रस्त्यावर सतीश तात्या ढेकळे यांच्यावतीने मुरमीकरण

 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते प्रतिनिधी-

पिरळे येथील पवार वस्ती ते वाघ वस्ती तसेच वाणी मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सतीश तात्या ढेकळे यांच्या वतीने स्वखर्चातून मुरमीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांची गैरसोय पाहता त्या लोकांना चांगल्या रस्त्याने जाता यावं म्हणून सतीश तात्या ढेकळे यांनी खर्चातून रस्त्यांवरती मुरमीकरण करण्याचा निर्णय घेतला. या रस्त्याने जाण्यासाठी लोकांची गैरसोय होत असल्याबाबत संदीप वाघ सर व उद्योजक संदीप तात्या नरोळे यांनी सांगितले असता भावी पंचायत समिती सदस्य उमेदवार म्हणून सध्या त्यांच्याकडे पाहिले जाते सतीश तात्या ढेकळे यांनी आपल्या गणामध्ये विकास कामांचा स्वखर्चातून सपाटा लावला आहे त्याचबरोबर त्यांनी अनेक ठिकाणी बोरवेल व रस्त्याची कामे केली आहेत.त्या धर्तीवर पिरळे येथे स्वतः त्यांनी विकास कामांचा सपाटा लावला आहे. रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन   उद्योजक सतीश तात्या ढेकळे उद्योजक संदीप तात्या नरोळे एकशिव गावचे मा सरपंच शहाजी दादा धायगुडे संदीप वाघ सर पत्रकार प्रमोद शिंदे दत्तात्रेय लवटे पाटील मा सरपंच शांती निकेतन साळवे,शंकर जानकर दशरथ जाधव व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले

पिरळे येथे सतीश तात्या ढेकळे चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

पिरळे येथे सतीश तात्या ढेकळे चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
 पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क प्रमोद शिंदे-पिरळे येथे सतीश तात्या ढेकळे चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक सतीश तात्या ढेकळे उद्योजक संदीप तात्या नरोळे तसेच मान्यवरांच्या यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी निकेतन साळवे,शंकर जानकर,संदीप वाघसर पत्रकार प्रमोद शिंदे व पंचक्रोशीतील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.क्रिकेट प्रेमींना प्रोत्साहन म्हणून या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय तृतीय असे 21000 रुपये बक्षीस व तिन्ही चषक उद्योजक सतीश तात्या ढेकळे यांच्या वतीने देण्यात आले  तसेच आकाश खिलारे,समाधान खिलारे,अनिल दडस,गणेश माने,उमेश जाधव ,निकम बंधू विष्णू नारायण क्रिकेट क्लब पिरळे मधील सर्व खेळाडूंनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.मान्यवरांनी खेळाडूंना या स्पर्धेसाठी व  दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

पिरळे येथील माजी पोलीस शिंदे साहेब यांनी गरिबांची दिवाळी केली गोड

पिरळे येथील माजी पोलीस शिंदे साहेब यांनी गरिबांची दिवाळी केली गोड

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ( प्रमोद शिंदे)-नातेपुते प्रतिनिधी पिरळे येथील माझी सरपंच, माझी मुंबई पोलीस शिंदे साहेब व सामाजिक कार्यकर्ते सुनील माने यांनी पिरळे येथील गरीब कुटुंबांना दिवाळीसाठी डाळ तेल,साबण साखर अशा सर्व वस्तूचे जवळपास 100 कुटुंबांना किट दिवाळीसाठी प्रत्येकाच्या घरी जाऊन दिले व त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे. सतत गावामध्ये त्यांच्याकडून अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात त्यामुळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे किटचे वाटप करताना ज्ञानादेव शिंदे साहेब,वस्ताद सुनील माने,पप्पू बुधावले,सुदाम बुधावले,आकाश खिलारे व कार्यकर्ते उपस्थित होते.

उमरखेड शहरामध्ये अवैध जुगारू मटका सुरु प्रशासन मुग गिलुन गप्प


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
उमरखेड (दि. 23 ऑक्टोंबर) उमरखेड तालुक्यात व शहरामध्ये जुगार व मटका खुलेआम सुरू झाला आहे मागील दोन महिन्यामध्ये सामाजिक संघटनेच्या वतीने अवैध धंदे बंद करा..! अशा प्रकारचे निवेदन देऊन अमरण उपोषणाला श्याम धुळे जिल्हा कार्याध्यक्ष यवतमाळ सिद्धार्थ दिवेकर शहराध्यक्ष उमरखेड हे बसले होते.

अमरण उपोषण मंडपामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने पीएसआय अमोल राठोड साहेब यांनी भेट देऊन व उमरखेड शहरांमध्ये सुरू असलेले अवैध धंदे जुगार व मटका त्वरित बंद करण्यात येईल या प्रकारचे लेखी आश्वासन देऊन मटका व जुगार बंद केला होता.

परंतु येत्या दिवाळीच्या सणांमध्ये खुलेआम मटका व जुगाराला सुरुवात झाली आहे. यावर प्रशासन गप्प बसले आहे.
खुल्या मटका व जुगारामुळे अनेक संसारामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये वाद निर्माण होत आहे. नवतरुण या जुगार व मटक्या पाई त्यांचे जिवन उद्धवस्त होत आहे.त्यामुळे दिवाळी सण साजरा करण्याऐवजी संसाराचा दिवाळाच साजरा
करावा लागत आहे.

पण यावर पोलिस प्रशासनाने सुरू केलेला खुलेआम मटका व जुगार त्वरित बंद करण्यात यावा.

अशी मागणी यावेळीं भिम टायगर सेनेचे शहराध्यक्ष सिद्धार्थ दिवेकर व जिल्हा कार्याध्यक्ष श्याम धुळे यांनी केली आहे. अन्यथा संस्थापक मा.दादासाहेब शेळके (राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना) यांच्या नेतत्वात”तीव्र आंदोलन” छेडल्याशिवाय शांत बसणार नाही.

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत युद्ध कला मार्शल आर्टच्या खेळाडूंचे यश

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे /प्रतिनिधी: शितोकॉन कराटे असोसिएशन इंडिया आयोजित महात्मा फुले सांस्कृतिक भवन पुणे वानवडी येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत युद्धकला मार्शल आर्टच्या खेळाडूनी सर्वोत्तम कामगिरी करत पदकांची कमाई केली आहे. या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत कुमीते क्रीडा प्रकारामध्ये आदित्य लिगाडे – रौप्य पदक , काता क्रीडा प्रकारामध्ये कांस्य पदक, अरिम बोहरा – कांस्य पदक, ईशान लिगाडे -कांस्य पदक, आर्णा अनन्या प्रधान – कांस्य पदक अशी सर्वोत्तम कामगिरी करत पदकांची कमाई केली आहे.

सध्याच्या काळात स्व -संरक्षण ही काळाची गरज बनली आहे. आपल्यावर होणाऱ्या आक्रमणावर प्रतिउत्तर देता आले पाहिजे. यासाठी कराटे हा सर्वोत्तम उपाय आहे. यासाठी मोठ्या संख्येने मुली, महिला, मुले मार्शल आर्ट तथा कराटे प्रशिक्षण घेत असतात. युद्ध कला मार्शल आर्ट अकॅडमी ही प्रशिक्षण संस्था अल्पावधीमध्ये नावा-रूपाला आल्याचे पहावयास दिसते. या अकॅडमीच्या माध्यमातून मोठ्या संख्येने मुले,मुली प्रशिक्षण घेऊन बाहेर पडत असतात.
हडपसर, भोसरी, सदुंबरे या पुणे परिसरातील युद्धकला मार्शल आर्ट अकॅडमीच्या खेळाडूंनी सर्वाधिक पदके पटकविल्याबद्दल अकॅडमीला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी या राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये मिळाली आहे. या खेळाडूंना अविनाश माने सर, संकेत कंद सर, रोहित भालेराव सर यांनी प्रशिक्षण दिले आहे.

कमी पटाच्या शाळा बंद करू नयेत म्हणून प्रा.सुनील साळवे सर यांचे शरद पवार यांना भेटून निवेदन

कमी पटाच्या शाळा बंद करू नयेत म्हणून प्रा.सुनील साळवे सर यांचे शरद पवार यांना भेटून निवेदन 

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे कमी पटाच्या शाळा बंद करू नयेत म्हणून नातेपुते येथील आंबेडकरी चळवळीचे विचारवंत प्राध्यापक सुनील साळवे व सहकाऱ्यांनी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांना बारामती येथील त्यांच्या निवासस्थानी भेटून त्यांना निवेदन दिले. महाराष्ट्र सरकारने 0ते20 पट असणाऱ्या जि. प. शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वंचित ठिकाणच्या कमी लोकसंख्या असलेल्या गाव,पाडा,वस्ती येथील महाराष्ट्रातील गोरगरिब, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे, भटक्या जाती-जमातीतील,आदीवासी समाजातील विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे त्यांचा सक्तीचा शैक्षणिक अधिकार हिरावून घेतला जाणार आहे. या निर्णयामुळे सबंध महाराष्ट्रातील विद्यार्थांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे.हे लक्षात घेऊन या निर्णयालाला कडाडून विरोध म्हणून. म्हणून 23-10-2022 रोजी लाखो विद्यार्थ्यांचा प्रश्न घेऊन शरदचंद्र जी पवार साहेब यांच्या घरी जाऊन भेट घेतली. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ताई चाकणकर यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळीप्राध्यापक सुनिल साळवे सर, सर्जेराव कांबळे, लखन सोरटे, सौरभ सोरटे, विशाल सोरटेआधी कार्यकर्ते उपस्थित होते.

राहुरी तालुक्यात प्रचंड धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान हाता तोडांशी आलेला घास हिरावला

नैसर्गिक आपत्तीने शेतकरी
पूर्णपणे हताश माजी राज्यमंञी प्राजक्त तनपुरे यांची पाहणी

राहुरी तालुका प्रतिनिधी

परतीच्या पावसाने राहुरी तालुक्यात प्रचंड धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होऊन हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते झाले अचानकपणे आलेल्या या नैसर्गिक आपत्तीने शेतकरी वर्ग पूर्णपणे हताश झाला या सर्व परिस्थितीची पाहणी करण्यासाठी माजी राज्यमंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आज शनिवारी दौरा केला या दौऱ्यात अत्यंत विदारक चित्र पहावे लागले गुहा तांभेरे चिंचविहिरे कनगर वडनेर गणेगाव म्हैसगाव कोळ्याची वाडी या भागात आमदार तनपुरे यांनी दौरा करून शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अत्यंत पोट तिडकीने आपल्या व्यथा मांडल्या त्या सर्व व्यथा ऐकून तनपुरे भावुक झाले जलयुक्त शिवारातील तलाव फुटल्याने मुख्य दळणवळणाचे रस्ते वाहून गेले ये जा करण्यासाठीचे सर्व रस्ते बंद पडले त्यामुळे दैनंदिन जीवनात मोठा अडथळा आला दूध संकलन केंद्रामध्ये दूध घालणेही मुश्किल बनले शेतातील सडून गेलेली पिके पाहून शेतकऱ्यांनी हंबरडा फोडला नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना धीर देतांना त्यांनी सांगितले की राज्य शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे कोणताही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित न राहता त्यास मदत कशी देता येईल यासाठी मंत्रालय दरबारी कोणताही कसूर ठेवणार नाही सोयाबीन कपाशी ऊस या पिकांचे पंचनामे झाले मात्र उशिराच्या झालेल्या पावसाने वाचलेली शेती पिकेही पूर्णपणे संकटात सापडली व नष्ट झाली त्या पिकांचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश त्यांनी दिले शासनाचा नियमात घास चारा पिके यांचा समावेश नाही असे त्यांना निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी या पिकांचेही पंचनामे करण्याच्या सूचना केल्या चाळीमध्ये साठवून ठेवलेल्या कांद्याचे प्रचंड प्रमाणात पावसाचे पाणी घुसल्याने कांदा सडून गेला या चाळींचेही पंचनामेचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या पावसाने बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे झाले होते परंतु नंतरच्या पावसाने थैमान घातल्याने गावागावातील सर्वच शेतकऱ्यांची पिके नष्ट झाली काही ठिकाणी जमिनी वाहून गेल्या तर जमीन खराडण्याच्या ही घटना घडल्या जलयुक्त शिवार योजनेतील तलाव फुटल्याने पूरस्थिती निर्माण झाली अनेकांच्या घरात पाणी घुसले काही घरांची पडझड झाली घरातील साहित्य वाहून गेले जनावरे वाहून गेली यासह अनेक घटना घडल्या विहीर बुजून जाण्याचे प्रकारही घडले प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांनी विमा उतरविलेला होता परंतु जाचक निकषामुळे नुकसान भरपाई अत्यंत तुटपुंजी मिळाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला तर अनुभव वाईट असल्याने आम्ही पिक विमा उतरविला नाही असे शेतकऱ्यांनी आमदार तनपुरे यांच्या निदर्शनास आणून दिले राज्य शासनाने जाहीर केलेल्या पंचनाम्यानुसार नुकसान भरपाई तरी मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील असा शब्द त्यांनी हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना दिला तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे नायब तहसीलदार संध्या दळवी गावातील कृषी सहाय्यक कामगार तलाठी या दौऱ्यात सहभागी झाले होते येणाऱ्या अडीअडचणींचा जागेवरच निपटारा करण्यात आला तहसीलदार एफ एम शेख यांनाही दूरध्वनी करून परिस्थितीची जागेवरच जाणीव करून दिली संबंधित गावातील सरपंच ग्रामसेवक व शेतकरी यांची एकत्रित बैठक घेऊन येणाऱ्या अडचणी सोडविल्या राहुरी तालुक्यात हजारो हेक्टर क्षेत्रावरील शेती पिके फळबागा पूर्णपणे उध्वस्त झाल्याने शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक अरिष्टात सापडला ऐन दिवाळी सणाच्या तोंडावरच मोठे आर्थिक संकट उभे राहिल्याने अनेक ठिकाणी सणही साजरा होण्यासाठी परिस्थिती राहिलेली नव्हती ग्रामीण भागातील व खेड्यापाड्यातील परिस्थिती अधिकच भीषण होती आमदार तनपुरे यांनी अतिवृष्टी नंतरचा केलेला दौरा शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरला असल्याचे गावागावातील नागरिकांनी सांगितले

नातेपुतेत ओमन देशाचे भारतीय दूतावास जयपाल देठे IRSयांच्यासह उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा एन डी एम जे च्या वतीने होणार जंगी सत्कार-वैभव गीते

नातेपुतेत ओमन देशाचे भारतीय दूतावास जयपाल देठे यांच्यासह उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा होणार जंगी सत्कार-वैभव गीते


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते (प्रतिनिधी) भारतीय दूतावास ओमान देशाचे राजदूत मा.जयपाल देठे IRS यांच्या सह व विशेष सरकारी वकील बापूसाहेब शिलवंत,नायब तहसीलदार प्रतीक आढाव,नायब तहसीलदार सिद्धार्थ गायकवाड व इतर मानाच्या आणि मोक्याच्या जागी नव्याने विराजमान झालेले अधिकारी यांच्या सन्मानाचा कार्यक्रम नातेपुते ता.माळशिरस जी.सोलापूर येथे दिनांक 28/10/2022 रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेत राजर्षी शाहू महाराज व्यायाम शाळा (नवीन पोस्ट ऑफिसच्या शेजारी) आयोजित केलेला आहे.दुपारी 3 ते 4 स्वरसम्राट विजय सरतापे यांच्या भिमगीतांचा कार्यक्रम4 ते 4.30 दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या कविता4.30 ते 6 सत्कार समारंभ, मान्यवारांचे मार्गदर्शन होणार आहे.बहुजन समाजातील पत्रकार,निवृत्त अधिकारी,कर्मचारी,वकील,प्राध्यापक,शिक्षक,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.तरी आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती अशा प्रकारचे जाहीर निमंत्रण
सचिवनॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस वैभव जी गीते यांनी सर्वांना दि ले ली आहे जस्टीस850394585784848494809766330011