प्रमोद शिंदे

सरसेनापती संताजी घोरपडे यांचे स्मारक व शिल्पसृष्टी करणेसाठी10 कोटी निधीची तरतूद करण्याची आमदार उत्तमराव जानकर यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी


पुरोगामी महाराष्ट्र नियोजन नेटवर्क प्रमोद शिंदे –
माळशिरस तालुक्यातील सरसेनापती संताजी घोरपडे यांचे स्मारक व शिल्पसृष्टी करणेसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी आमदार उत्तमराव जानकर यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे केली आहे अशी मागणी केली.असून उप मुख्यमंत्री.एकनाथ शिंदे यांनी त्यावर पर्यटन मंत्री यांना तपासून अ प्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत
याबाबत नामदार एकनाथराव शिंदे त्यांच्याकडे केलेल्या मागणीत आमदार उत्तमराव जानकर यांनी म्हटले आहे की मौजे कण्हेर-इस्लामपूर संगमावरती ता. माळशिरस येथे छत्रपती शिवाजी महारांजाच्या स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी जिर्ण आवस्थेत आहे. छत्रपती संभाजी राजे यांचे नंतरच्या काळामध्ये स्वराज्य संपवणेकरीता औरंगजेबाच्या रुपाने महाराष्ट्रावर फार मोठे संकट आले असताना शुरवीर सरसेनापती संताजी-धनाजी या जोडीने ते संकट परतवून लावण्याचा महान पराक्रम केलेला आहे. सरसेनापती संताजी घोरपडे यांचे शौर्य इत्तके की त्यांनी औरंगजेबाच्या चार लाख सैन्यामध्ये घुसून थेट औरंगजेबाच्या छावणीच्या तंबूचे कळस कापून आणले या घटनेमुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये एक आशेचा किरण निर्माण झाला. जनतेच्या मनामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. या पडत्या काळामध्ये स्वराज्य म्हणजेच महाराष्ट्र वाचविण्याचे महाणकार्य त्यांचे हातून झालेले आहे.
माळशिरस तालुक्यातील शंभु महादेवांच्या डोंगर रांगेमध्ये तळ पडला होता. अशा वेळी स्वराज्य निष्ठावान स्वामी भक्त सरसेनापती संताजी घोरपडे यांना दगाफटका होऊन मौजे कण्हेर-इस्लामपूर संगमावरती ता. माळशिरस जि.सोलापूर येथील ओढयाकाठी त्यांना दि.१८ जुन १६९७ रोजी विरमरण आले आज त्या ठिकाणी त्यांची समाधी जिर्ण आवस्थेत आहे.
सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या कार्याचा सन्मान व्हावा गौरव व्हावा म्हणुन त्यांच्या कार्याला साजेसे असे भव्य स्मारक व भव्य शिल्पसृष्टी मौजे कण्हेर-इस्लामपूर संगमावरती ता. माळशिरस जि. सोलापूर येथे व्हावी अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे. त्यासाठी १० कोटी रुपये निधी उपलब्ध करून द्यावा

प्रमोद डूड्डू यांच्याकडून वाढदिवसाचा अनाठाई खर्च टाळून वारकरी शिक्षण संस्थेस पंधरा हजार रुपयांची मदत

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –
नातेपुते (प्रतिनिधी)


पिरळे येथील युवा उद्योजक प्रमोदशेठ विजयकुमार डुडू उर्फबाबू काका यांच्या 53 व्या वाढदिवस निमित्त तसेच आषाढी वारी पालखी निमित्त वाढदिवसाचा अनाठाई खर्च टाळून ज्ञानमंदिर वारकरी शिक्षण संस्था दहिगाव या ठिकाणी वारकरी संस्थेतील विद्यार्थ्यांना खाऊ साठी व संस्थेच्या बांधकामासाठी 15000 रुपयांची मदत प्रमोद काका डूड्डू यांच्याकडून देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या समवेत उत्साहामध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी संस्थेतील मंदिरात संत ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल रुक्मणी, संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून हरिपाठ तसेच आरती घेण्यात आली व विद्यार्थ्यांसोबत महाप्रसादाचा आनंद घेतला.यावेळी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त पारायण धनंजय महाराज कदम यांच्याकडे पंधरा हजार एक रुपया देण्यात आले तसेच संस्थेच्या धनंजय महाराज कदम व त्यांच्या पत्नी रोहिणी ताई कदम यांच्या वतीने प्रमोद काका डूड्डू यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पिरळे गावचे माजी सरपंच संदीप तात्या नरोळे,महादेवजी शिंदे, पत्रकार प्रमोद शिंदे, गणेश दडस, प्राचार्य दीपक शिंदे, बाळासाहेब शिंदे, दादासाहेब ठवरे, अनिल तोडकर, मनोज काका डूड्डू ,जनार्धन शिंदे, दत्तात्रेय लवटे, पांढरे सर, तसेच इतर कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमोद शेठ डूड्डू हे नेहमीच धार्मिक व सामाजिक कार्यात तन-मन धनाने सक्रिय असतात.

संत रविदास महाराजांच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश पिरळे ग्रामस्थांकडून पालखीचे स्वागत

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –
परखड व विद्रोही समाजसेवक संत म्हणून रविदास महाराज त्यांच्या विचारांकडे पाहिले जाते. याच संत रविदास महाराज यांच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी येथे पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात काल दुपारी 2:00 प्रवेश झाला, पालखीचे स्वागत श्री. पंडितराव भोसले साहेब(सेवानिवृत्त जिल्हा जल संधारण अधिकारी) तसेच पिरळे गावचे माजी सरपंच संदीप तात्या नरोळे दलित पॅंथर जिल्हा अध्यक्ष साहेब शिंदे, महादेव शिंदे, बाळासाहेब शिंदे प्रमोद शिंदे, महादेव होळकर, दत्तात्रेय लवटे व मान्यवरांनी यांनी वारकरी व पालखीचे स्वागत केले. स्वागत प्रसंगी पालखी सोहळ्याचे संस्थापक तथा पालखी सोहळा प्रमुख राजेश घोडके यांचा सत्कार केला.
सदरची पालखी निगडी पुणे येथून 18 जूनला प्रस्थान होऊन पुणे,कात्रज, शिरवळ, विरधरण, लोणंद, फलटण, निंबलक मार्गे आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला.
पालखी सोबत रथ, समानासाठी ट्रक, जेवणाचे व निवाऱ्याची साधने, वारकरी आहेत,संदीप नरोळे दादासाहेब शिंदे यांच्याकडून. वारकरी बांधवांसाठी बिस्किट, केळी अल्प उपहार व चहापाणी पाण्याची सोय करण्यात आली.

प्रमोद शिंदे यांच्या प्रयत्नाने पिरळे येथे पंधरा वर्षानंतर एसटी बस सुरू झाल्याने गावकऱ्यांच्या वतीने आनंद उत्सव साजरा

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क-
सामाजिक कार्यकर्ते एन डी एम जे राज्य प्रसिद्धीप्रमुख, पुरोगामी महाराष्ट्र न्यूज संपादक, जिल्हा दक्षता नियंत्रण समिती व उपविभागीय दक्षता नियंत्रण समिती सदस्य पत्रकार प्रमोद शिंदे यांच्या प्रयत्नाने तब्बल पंधरा वर्षानंतर पिरळे ता.माळशिरस येथे एस टी बस सुरू झाल्याने पिरळे येथील नागरिकांनी आनंद उत्सव साजरा केला.
अनेक वर्षापासून बंद असलेली नातेपुते- पिरळे- बांगार्डे मुक्कामी एस.टी बस पत्रकार प्रमोद शिंदे यांच्या प्रयत्नाने सुरू झाली.सकाळी पावणे सात वाजता बांगार्डे- पिरळे- नातेपुते एस.टी बसचे आगमन होताच पिरळे येथे नागरिकांनी हलगी फटाके वाजवत जल्लोष करत एसटीचे चे स्वागत केले.ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते एस.टी बस चे उद्घाटन करण्यात आले. पिरळे गावचे माजी सरपंच उद्योजक संदीप नरोळे यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा देत गावातील २५ प्रवाशांचे स्वतः बसचे तिकीट काढून नातेपुते येथे हॉटेलमध्ये जेवण,चहा,नाश्त्याची सोय केली २५ प्रवाशांनी पहिल्याच दिवशी बस प्रवासाचा आनंद घेतला.नातेपुते एस.टी स्टँडवर प्रसिद्ध उद्योजक प्रमोद शेठ डूड्डू यांनी प्रत्येक नागरिकांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचा सत्कार करत एस.टी स्टँड मधील प्रवाशांना पेढे वाटले. ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच अमोल शिंदे यांनी ग्रामस्थांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला तसेच वाहक विजय एकतपुरे,चालक अशोक साळुंखे व पत्रकार प्रमोद शिंदे यांचा फेटा बांधून सत्कार केला.हॉटेलचे मालक मामासाहेब लवटे यांनी सर्व प्रवाशांना मोफत चहा दिला तसेच येणाऱ्या प्रत्येक एस.टी कंडक्टर व ड्रायव्हर यांना मोफत चहा नाश्त्याची सोय कायमस्वरूपी केली आहे. अजिंक्य हेअर स्टाईल चे मालक अजिंक्य भारत खंडागळे यांनी चालक व वाहक यांची कायमस्वरूपी मोफत कटिंग दाढी करून देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी ,उत्तम कदम सर, प्रमोद शिंदे यांनी प्रवाशांना शुभेच्छा दिल्या व नातेपुते- वालचंदनगर बस पिरळे मार्गे जाण्याची मागणी केली आहे जेणेकरून विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला व ज्येष्ठ नागरिकांची सोय होईल.याप्रसंगी सरपंच अमोल शिंदे, ज्ञानदेव शिंदे, संदीप नरोळे,तानाजी दडस, नारायण वाघमोडे, महादेव होळकर, भारत पवार, दत्तात्रेय लवटे, दादासाहेब ठवरे, गोरख साळवे, सचिन किर्दक,बाळासाहेब शिंदे,कांतीलाल माने, सुदाम बुधावले, बाबासाहेब खंडागळे, हनुमंत बुधावले, सचिन खिलारे, महादेव रणदिवे, गणपत बुधावले,अनिल वाघमोडे,धनंजय साळवे, संग्राम खिलारे, शंकर साळवे,महादेव बल्लाळ,चव्हाण सिस्टर,अनिल खिलारे, महादेव किर्दक, सुभाष किर्दक, हरिभाऊ लवटे, रघुनाथ दडस, श्रीराम खंडागळे,प्रती कांबळे ,पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. एसटी सुरू होण्या संदर्भात अकलूज आगार प्रमुख प्रमोद शिंदे व नातेपुते कंट्रोलर राजेंद्र पवार यांनी विशेष सहकार्य केले.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा – 2025 अनुषंगाने पोलीस विभागाकडून मार्ग पाहणी व बंदोबस्त आढावा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी  सातारा जिल्हा बरड येथे दिनांक 29/06/2025 रोजी मुक्काम करून दिनांक 30/06/2025 रोजी सकाळी 09.30 वाजताचे दरम्यान सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते त्यावेळी मोठ्या उत्साहामध्ये सोलापूर  जिल्ह्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतील भाविक भक्तांचे मोठ्या संख्येने प्रशासन व जनतेच्या वतीने स्वागत केले जाते सातारा जिल्ह्यातून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये प्रवेश करताना नातेपुते पोलीस ठाण्याचे हद्दीत पालखीतील भाविक भक्तांना कुठलाही त्रास होऊ नये, पालखीतील प्रसादाची वाहने सुरळीत वेळेत पालखीतळावर पोहोच व्हावीत, वाहतूक नियमन, भाविक भक्ताची सुरक्षा व कायदा सुव्यवस्था,अनुषंगाने सोलापूर ग्रामीण पोलीस मार्फत 1600 पोलीस बंदोबस्त लावला जातो त्यामध्ये 150 पोलीस अधिकारी, 1050 पोलिस अंमलदार, 400 होमगार्ड असे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावला जातो.श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा = 2025 अनुषंगाने , भाविक भक्तांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी आज नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली अकलूज विभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर साहेब, नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री महारुद्र परजणे, पोलीस उपनिरीक्षक श्री किशोर तनपुरे, पोलीस हवालदार अशोक खाडे, युवराज कणसे, महेश जाधव, संतोष वारे यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्ग पाहणी, वॉटर फिलिंग पॉईंट, पालखी विसावा, पालखी क्रॉसिंग पॉइंट, बंदोबस्त बाबत आढावा घेऊन भाविक भक्ताची गैरसोय होणारा नाही विनाअडथळा व अपघात मुक्त वारी करण्याचे नियोजन केलेले आहे.

लढवय्या दादाभाऊ अभंग यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क ही प्रशासकीय व न्यायालय लढाई मागील पंधरा वर्षे लढत असलेले व विविध वृत्तपत्रातून स्तंभलेखन करून जनजागृती आणि सामाजिक प्रबोधन करणारे दादाभाऊ अभंग यांना महाराष्ट्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार पुरस्कार जाहीर केला आहे. दादाभाऊ अभंग हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्तंभलेखक व राजकीय विश्लेषक असून त्यांनी महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रातून प्रचंड असे लेखन करून सर्वसामान्य माणसांना न्याय देण्यासाठी व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात सरकार पातळीवर वाचा फोडण्याचे काम केले आहे. शेतकरी, कामगार , मजूर, महिला, अपंग व इतर सामाजिक घटकांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी सतत वृत्तपत्रातून लेखन केले आहे. ते महापुरुषांच्या विचारधारेवर चालणारे एक स्वाभिमानी आणि विचारवंत म्हणून त्यांची महाराष्ट्रामध्ये ओळख असून ते प्रसिद्ध स्तंभलेखक राजकीय विश्लेषक व निर्भीड व्याख्याते आहेत. मागील पंधरा वर्षापासून भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण प्रशासकीय व न न्यायालयीन लढा लढत असून महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार घोषित केला असून हा पुरस्कार येत्या १० जून रोजी यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉइंट मुंबई, येथे सकाळी १०.०० वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार घोषित झाल्यानंतर त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल दादाभाऊ अभंग यांनीसांगितले की या पुरस्कारासाठी मला अनेकांनी सहकार्य केले त्यांचे मी आभार मानतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा हा पुरस्कार मला मिळाला त्याचा मला खूप आनंद आहे आणि मी हा पुरस्कारर भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ रोजी लढलेल्या सर्व शूरवीर सैनिकांना, माझे आई वडील तसेच माझ्यावर प्रेम करणारे मला नेहमी साथ देणारे आणि माझ्या सोबत असणारे सर्व सहकाऱ्यांना मी हा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार अर्पण करत आहे..

शांतिदूत फ्रेंड्स सर्कल, आंबेगांव येथे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा मोठ्या थाटात उत्सव साजरा…

प्रतिनिधि.संदेश भालेराव [मुरबाड ठाणे जिल्हा]
दि. १२\०५\२०२५ रोजी शांतिदूत फ्रेंड्स सर्कल, आंबेगांव, भारतीय बौद्ध महासभा, महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत सिध्दार्थगौतम बुद्ध यांचीवैशाखी पौर्णिमा अर्थात २५६९वी जयंतीआणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली….
सर्व प्रथम
तथागत सिद्धर्थगौतम
बुद्ध छत्रपती शिवाजीमहाराज विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करून अभिवादन करण्यात आलेभगवान गौतम बुद्ध यांची२५६९वी जंयती आयोजित स्थळी महिलांनी सामुहिकरित्या पंचशिल त्रिशरण बुध्द वंदना
करण्यात आली होती.
सकाळी १०.०० वा. धम्म देसना भन्ते -राहुल बोधी यांचे बुद्धांच्या जीवनावर प्रवचन झाले.
दुपारी ३.००वा.
भव्य मिरवणूक काढण्यात आली
सायं. ६.०० वा. जाहीर सभा संम्पन्न झाली
रात्री ८.०० वा.
स्नेह भोजन झाले
रात्री ९.३० वा. । बुद्ध भीम प्रबोधन पर गीतांचा कार्यंक्रम झाला.
. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सन्माननीय आयु. भूपेंद्रजी अनंता भालेराव सर यांनी भूषविले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आयु. भाऊसाहेब रातांबे (अध्यक्ष, भीमाई स्मारक समिती )आयु. उल्हासभाऊ बांगर (माजी जिल्हा परिषदसदस्य,ठाणे), आयु. बाळा शेठ घरत (कोशाध्यक्ष, भाजपा), मुरबाड तालुका )आयु. सचिन चौधरी. आयुनी. स्वराताई चौधरी (माजी सभापती, पंचायत समिती मुरबाड.) आयु. दिनेश उघडे (अध्यक्ष मुरबाड तालुका RPI(A) आयुनी. वैशालीताई उघडे (सदस्या, जिल्हा परिषद ठाणे)आयुनी. योगिताताई खंडागळे (अध्यक्षा भारतीय बौद्ध महासभा, महिला ) आयुनी. ज्योतीताई अहिरे सरचिटणीस, भारतीय बौद्ध महासभा, मुरबाड तालुका (महिला) मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी डॉ. बाबासाहेबांचे विचार पुढील पिढीसाठी कसे उपयुक्त आहेत, हे प्रतिपादित केले. आयु. भूपेंद्रजी भालेराव सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान याचे महत्व पटवून देत असतांना स्वतंत्र, समता, बंधुता या मूल्यांवर भर दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. संतोषजी भालेराव सर तसेच आभार प्रदर्शन आयु. नरेशजी जाधव यांनी केले.
ह्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजक शांतीदुत फ्रेन्ड सर्कल मधील सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांसह सदस्य,
ग्रामस्थ मंडळ आंबेगांव,भास्करजी भालेराव,कृष्णाजी खंडागळे,सुरेशजी भालेराव,आनंताजी भालेराव,रमेशजी खंडागळे , जगदीशजी भालेराव. गणेशजी भालेराव किरणजी भालेराव, बाळाशेठ घरत, सतीश गायकवाड, संतोष बंडू घरत, कैलास एगडे भाऊसाहेब, अरुण घरत, नंदू कंथोरे, धनाजी घरत, भगवान घरत, एकनाथ घरत शरद एगडे यांचे विशेष सहकार्य लाभले

शिवशक्ती प्रतिष्ठान व साॅईल टच अँग्रो यांच्या वतीने शिंगणापूर यात्रेतील पोलीस बांधवांना मोफत पाणी बॉटलचे वाटप


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
सालाबाद प्रमाणे याही वर्षी शंभू महादेव शिखर शिंगणापूर यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे या शिखर शिंगणापूर यात्रेसाठी प्रशासनाने जोरदार तयार केले आहे तसेच या यात्रेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला जातो. शिंगणापूर यात्रेनिमित्त शिखर शिंगणापूर पोलीस स्टेशन यांच्या कडे बंदोबस्त साठी येणाऱ्या अतिरिक्त पोलिस स्टाफ यांना पिण्याची पाण्याची सोय संत तेली भुतोजी महाराज नाना महाराज खळदकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सुभाष आढाव यांच्या सहकार्याने श्री शिवशक्ती प्रतिष्ठान दहीगाव व साॅईल टच अॅग्रो बारामती यांच्या कडून बिसलरी पाण्याचे दीडशे बॉक्स देऊन पिण्याच्या पाण्याची सोय केली.यावेळी शिंगणापूर पोलीस स्टेशन चे हवालदार लोखंडे साहेब व सोनवलकर साहेब
,शिवशक्ती प्रतिष्ठान चे संचालक धनाजी ढगे व साॅईल टच अॅग्रो चे संचालक तात्यासाहेब राणे,दहिगाव गावचे युवा नेते बाळासाहेब कदम, शिवशक्ती चे अध्यक्ष राम जाधव खजिनदार गणेश गोडसे, धनाजी चिकणे, सचिन काटकर, राहुल काटकर, प्रणव खराडे , नामदेव चव्हाण श्रिमंत नरळे दत्ता नाकुरे पांडु साहेब साॅईल टच अॅग्रो चे मॅनेजर शिंगटे तसेच प्रतिष्ठानच इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिरळेचा गणेश नरळे झाला गावातील पहिला पी.एस.आय

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

प्रयत्नाने वाळूचे कण रगडता तेलही गळे या म्हणी प्रमाणे सात ते आठ वर्ष पूर्ण घरादाराचा त्याग करून शंभर टक्के समर्पण वृत्तीने अभ्यास करून पिरळे ता.माळशिरस जिल्हा सोलापूर येथील चि. गणेश चंद्रकांत नरळे याची एमपीएससी परीक्षेतून  पीएसआय पदी निवड झाली. गावकऱ्यांनी कौतुकाने त्याची उघड्या जीपमधून व घोड्यावरून फटाक्यांची आतिषबाजी करत गुलाल डीजे हलगी लावून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली. गणेश हा पिरळे गावातील पहिलाच पीएसआय म्हणून त्याने बहुमान मिळवला पिरळे गावे 5000ते 6000 लोकसंख्येचे गाव असून उद्योजकांचे गाव म्हणून गावाची ओळख आहे. गावातील तरुण विविध क्षेत्रात उद्योग व्यवसाय करतात त्यात प्रामुख्याने बेल्ट चप्पल टाय मोठा साबण कारखाना तसेच वेगवेगळे दूध,शेती ,व्यवसाय छोटे-मोठे दूध प्लांट आहेत. अलीकडच्या काळात स्पर्धा परीक्षा मध्ये भाग घेऊन  मानाच्या आणि मोक्याच्या जागा मिळवण्याचा बहुमान देखील गावातील तरुण करत आहेत त्यातीलच एक गणेश चंद्रकांत नरळे शिक्षण बीई मेकॅनिकल.गणेशाचे प्राथमिक शिक्षण इयत्ता पहिली ते सातवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरळे येथे झाले.लहान वयात शिक्षणाची गोडी होती अत्यंत हुशार आणि चाणाक्ष गणेश यांनी इयत्ता चौथी आणि सातवी स्कॉलरशिप परिक्षेमध्ये मेरिट लिस्ट मध्ये येऊन स्कॉलरशिप मिळवलेली होती. माध्यमिक शिक्षण इयत्ता आठवी चे शिक्षण श्री वर्धमान विद्यालय वालचंदनगर येथे झाले. नववी ते बारावी चे शिक्षण बा. ज. दाते प्रशाला नातेपुते या ठिकाणी झाले .बारावी नंतर पुढे बी .ई.मेकॅनिकल इंजीनियरिंग चे  शिक्षण पुणे इथे घेतले. घरची अतिशय बिकट आणि हालाखीची परिस्थिती होती  बी इ मेकॅनिकलचे शिक्षण चालू असताना बहिण पोलीस मध्ये भरती झाली त्यानंतर गणेशने सर्विस न करता एमपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला त्याच दरम्यान एमपीएससीचा अभ्यास चालू असताना अचानक त्यांच्या वडिलांचे निधन झाले या धक्क्यातून सावरून गणेश यांनी एमपीएससीचा जोराने अभ्यास चालू ठेवला त्यानंतरच्या काळामध्ये कोरोना ने  दोन वर्ष अभ्यास करूनही दोन वर्ष थांबावे लागले वाट पाहावी लागली परंतु त्यानंतर ही खचून न जाता अभ्यासाची पूर्ण कसोटी लावून त्यांनी राज्यसेवेच्या परीक्षा दिल्या पीएसआय चा पहिला प्रयत्न दोन मार्कांनी हुकला परंतु खचून न जाता पुन्हा प्रयत्न चालू केला त्यामध्ये 23 9 2024 रोजी त्यांनी ग्राम महसूल अधिकारी तलाठी ही परीक्षा उत्तीर्ण होऊन तरडगाव तालुका फलटण जिल्हा सातारा येथे काम करत होते परंतु मनामध्ये पुढे अजून काहीतरी मोठा अधिकारी होण्याची इच्छा होती त्यामुळे त्यांनी अभ्यास चालू ठेवला आणि अखेर 2025 मध्ये पीएसआय परीक्षा उत्तीर्ण होऊन PSI पदी निवड. पत्रकार प्रमोद शिंदे यांच्या कुटुंबीयांकडून त्यांचा सत्कार करण्यात तसेच पिरळे गावातील ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्याकडून गणेशचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

नातेपुते पोलीस स्टेशनच्या वतीने मंगळवारी महारक्तदान शिबिराचे आयोजन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- प्रमोद शिंदे

  नातेपुते पोलीस स्टेशनच्या वतीने मंगळवार दिनांक 18 मार्च 2025 रोजी नातेपुते पोलीस ठाणे येथे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांच्या नेतृत्वात व सर्व पोलीस स्टाफ होमगार्ड यांच्यावतीने महारक्तदान शिबिर आयोजित केले आहे. सध्या रक्त पेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवड जाणवत असून सर्वसामान्य लोकांना वेळेवरती रक्त उपलब्ध व्हावं यासाठी नातेपुते पोलीस स्टेशनच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या रक्तदान शिबिरासाठी परिसरातील युवक व नागरिकांना रक्तदानासाठी नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे व पीएसआय विक्रांत दिघे यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याचा विशेष सन्मान नातेपुते पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येणार आहे.  परिसरातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदानास उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर रक्तदानासाठी ऑनलाईन नोंदणी साठी लिंक दिली असून संबंधितांनी नाव नोंदणी  करण्याचे आव्हान देखील करण्यात आले आहे. सदर रक्तदान हे ज्ञानदीप रक्तपेढी यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.हे शिबिर सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजे पर्यंत नातेपुते पोलीस ठाणे तेथे आयोजित केली आहे.

You may have missed