गुरववाडीच्या लक्ष्मी पुजारी आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित
अक्कलकोटतालुक्यातील गुरववाडीच्या कार्यक्षम सरपंच लक्ष्मी माळप्पा पुजारी यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे असा पुरस्कार प्राप्त झालेल्या त्या सोलापूर जिल्ह्यातील एकमेव सरपंच आहेत.स्वराज्य सरपंच सेवा संघ, म हाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा २०२५ मध्ये त्यांना हा बहुमान देऊन गौरवण्यात आले. अहिल्यानगर येथील माऊली संकुल सभागृहात दि. ३० ऑक्टोबर रोजी हा सोहळा पार पडला. सोहळ्यात राज्यातील विविध जिल्हे व तालुक्यांनधील ४५ सरपंचांना गावपातळीवर उत्कृष्ट कार्यच सेवा संघ महाराष्ट्र्केल्याबद्दल गौरविण्यात आले. त्यात गुरववाडीच्या सरपंच लक्ष्मी माळप्पा पुजारी यांना गेल्या पाच वर्षात त्यांनी गावच्या चौफेर विकासासाठी केलेले काम पाहून या बहुमानाने सन्मानित करण्यात आले. लक्ष्मी माळप्पा पुजारी व गावचे विकासरत्न, माजी सरपंच माळप्पा पुजारी या दांपत्याचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.सोहळ्याला स्वराज्य सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष रोहित पवार,सचिव बाबासाहेब पावसे, संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक यादवराव पावशे, जिल्हा संपर्कप्रमुख अमोल शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते. सोहळ्याच्या आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य स्वराज्य सरपंच सेवा संघाचे कार्यकर्ते व स्थानिक पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला राज्यभरातून अनेक नेतेमंडळी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
