प्रमोद शिंदे

विधानसभा निवडणुकीत पैशांचा महापूर ! जप्त केलेला आकडा पाहून थक्क व्हाल

तसेच या कारवाईत प्रामुख्याने राज्य पोलीस विभागाने सुमारे ७५ कोटी रूपये, इन्कम टॅक्स विभागाने सुमारे ६० कोटी रूपये, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुमारे ११ कोटी रूपये यांचा प्रामुख्याने सम वेिश आहे. मतदारांना आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास आयोगाच्या ‘सी-व्हिजील’ पवर तक्रार येते. या तक्रारींची माहिती सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिली जात असल्याने आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे असं निवडणूक , खेड शिवापूरमध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम मुंबई अहमदाबाद मार्गावरील उधवा येथील चेक पोस्टवर कोटी २५ लाख रुपयांची रोकड: राज्यात सगळीकडे निवडणुकीचंवारं वाहत आहे. यातच राज्यात निवडणुकीसाठी पैशांचा महापूर आल्याचं चित्र प्रशासकीय कारवाईतून दिसून येते. राज्यात १५ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचं बिगुल वाजताच आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर प्रशासनाने कठोरपणे नाकाबंदी, तपासणी करून बेकायदेशीर कृत्यावर कारवाई करणे सुरू केले.निवडणुकीची आचारसंहिता लागताच राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे ही कारवाई करण्यात येत आहे. त्यात बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत १५ ते ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत एकूण १८७ कोटी ८८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या राज्यातील विविध अंमलबजावणी यंत्रणांनी ही कामगिरी केली आहे. विविध ठिकाणी पोलीस विभाग आणि इतर यंत्रणांनी उभारलेले तपासणी नाके योग्य पद्धतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे असं निवडणूक आयोगाने म्हटलं.करता आयोगाने सांगितले. पालघर ४ पोलिसांनी केली जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रशासित प्रदेशातील सिलवासा येथे एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ही रोकड नेण्यात येत होती असं सांगण्यात आले. बँकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं पोलिसांनी ऐकले परंतु ही रोकड म हाराष्ट्र राज्याच्या बॉर्डरवर आली कशी? असा प्रश्न पालघर पोलिसांनी उपस्थित केला आहे. सध्या या रोख रकमेची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राज्यात विविध ठिकाणी रोकड, दारू जप्त करण्यात येत आहे. याआधी पुणे बंगळुरू हायवेवर खेड शिवापूर टोल नाक्याजवळ खासगी कार पोलिसांनी अडवली.

सौंदणेच्या तरूणाचा माढ्यात मर्डर

माढ्यात सशयावरून झालेल्या मारहाणीत मोहोळ तालुक्यातील सौंदणे येथील संतोष दगडू भानवसे या तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून पाच जणांवर माढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी बापूराव दगडू भानवसे रा.सौंदणे ता मोहोळ यांनी माढा पोलिसात फिर्याद दाखल केली असून संतोष दगडू भानवसे मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास माढ्यातील एका महिलेच्या घरीभेटण्यासाठी गेला होता. त्याठिकाणी सोमनाथ उत्तम इतापे, सागर उत्तम इतापे, अतूल बाबुराव घाडगे, रत्नदिप महादेव शेळके, अक्षय शंकर वाळूजकर यांचे सोबत वाद झाल्याने मयत संतोष यास सोमनाथ इतापे, सागर इतापे, अतूल घाडगे, रत्नदिप शेळके, व अक्षय वाळूजकरयांनी प्लास्टिक पाइप, कमरेचा बेल्ट, व गॅसचा नळीने मारहाण केल्याने व डोक्यास मार लागल्याने उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाला म्हटले आहे. याम धील संशयित आरोपींना माढा पोलिसांनी ताब्यात घेतले असून आज बुधवारी माढा न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.मयत संतोष दगडू भानवसे असल्याचे फिर्यादीतया घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक नेताजी बंडगर करत आहेत.

९,७०,२५,११९ महाराष्ट्रातील नोंदणीकृत मतदारांची संख्या; निवडणूक आयोगाची माहिती

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज

नेटवर्कविधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी राज्यातील २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी निवडणूक आयोगाने अद्ययावत मतदार यादी जारी केली आहे. त्यानुसार, राज्यात ९ कोटी ७० लाखांपेक्षाही जास्त नोंदणीकृत मतदार आहेत.निवडणक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार आहेत. त्यापैकी ५ कोटी २२ हजार ७३९ पुरुष, तर ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला मतदार आहेत. याशिवाय ६ हजार १०१ तृतीयपंथी म तदार आहेत. महाराष्ट्रात १८ ते १९ वर्ष वयोगटातील एकूण२२ लाख २२ हजार ४०७ मतदार आहेत. याचा अर्थ जवळपास २२ लाख मतदार हे पहिल्यांदा मतदान करणार आ- हेत. आयोगाच्या माहितीनुसार, राज्यात सर्वाधिक मतदार ३०ते ३९ वर्ष वयोगटातील आ हेत. त्यांची संख्या २ कोटी १८ लाख १५ हजार २७८ इतकी आहे. याशिवाय ८५ ते १५० वर्ष वयोगटातील १२ लाख ४० हजार ९१९ मतदार आहेत. यापैकी १२० वर्षांपेक्षा जास्त वयाचे ११० मतदार आहेत. ज्यात ५६ पुरुष, तर ५४ महिला आहेत.निवडणूक आयोगाकडून विशेष उपक्रमप्रक्रियेतील नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी निवडणूक आयोग विशेष उपक्रम राबवले जात आहेत. तसेच नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून विविध उपक्रम घेतले जात आहे. दिव्यांग म तदारांसाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तर वयोवृद्ध नागरिकांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान केलं जाणार आहे.

मनोज जरांगें पाटील यांची प्रकृती बिघडली

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृतीबिघडली आहे. त्यांच्यावर अंतरवाली सराटीमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. प्रकृती बिघडल्यामुळे राहत्या घरीच जरांगे पाटील यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना बोलावण्यात आले. जरांगे पाटील यांना घरीच सलाईन लावण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार करणा- या डॉक्टरांनी सांगितले की, जरांगे पाटील यांना रात्रीपासून ताप येत होता. त्यांना तापासोबत अंगदुखी, अशक्तपणा, घशाचे इन्फेक्शन आणि कफ झाला आहे. ही सर्व व्हायरलची लक्षणे आहेत. त्यामुळे आज सकाळी त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. त्यांचे रक्त तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

माळशिरस विधानसभा फॉर्म छालनीत 35 अर्जापैकी 25 उमेदवार पात्र तर 4 उमेदवार अपात्र

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क-प्रमोद शिंदे

माळशिरस २५४ अनुसूचित जाती विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माळशिरस विधानसभेसाठी २९ उमेदवारांनी ३५ नामनिर्देशपत्र दाखल केलेली होती. त्यापैकी २५ उमेदवारांची नामनिर्देशनपत्र पात्र झालेली असून ४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्र अपात्र ठरलेली आहेत.

शरद गेना सावंत अपक्ष , अरुण मनोहर धाईंजे अपक्ष, सोमनाथ अरुण भोसले अपक्ष, मकरंद नागनाथ साठे अपक्ष, उत्तमराव शिवदास जानकर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, सुरज अशोक सरतापे बहुजन समाज पार्टी, प्रेमसिंह ज्ञानदेव कांबळे अपक्ष, मनोजकुमार उत्तम सुरवसे अपक्ष, नागेश आबा जाधव अपक्ष, राज यशवंतकुमार वंचित बहुजन आघाडी, सुधीर अर्जुन पोळ अपक्ष, कुमार आनंदा लोंढे अपक्ष, राम विठ्ठल सातपुते भारतीय जनता पार्टी, ज्ञानेश्वर मारुती काटे अपक्ष, अतुल श्रीमंत सरतापे अपक्ष, विकास संदिपान धाईंजे अपक्ष, दादा विश्वनाथ लोखंडे अपक्ष, साळवे नंदकुमार कृष्णाजी अपक्ष, प्रकाश वामन नवगिरे अपक्ष, अनिल तानाजी साठे अपक्ष, शैलेश जनार्दन कोथमिरे अपक्ष, प्रा. डॉ. धनंजय तुकाराम साठे अपक्ष, प्रा. डॉ. सुनील सुखदेव लोखंडे राष्ट्रीय समाज पक्ष, त्रिभुवन विनायक धाईंजे अपक्ष अशा २५ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र पात्र झालेले आहेत.

तर, अनिल गौतम नवगिरे, संस्कृती राम सातपुते, अडगळे लालासाहेब ज्ञानोबा, किशोर शिवाजी सुळ असे चार उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अपात्र ठरलेले आहेत.

अकलूज उपविभागीय कार्यालय अकलूज येथे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विजया पांगारकर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांना सहकार्य सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सुरेश शेजुळ हे काम पाहत आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अकलूज उपविभागीय पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज, माळशिरस, नातेपुते आणि वेळापूर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे.

माळशिरस तालुका संवेदनशील असल्याने एसआरपी तैनात करण्यात आलेली आहे. उमेदवारी अर्ज शांततेत दाखल झालेले होते. नामनिर्देशन पत्रांची छाननी देखील शांततेत पार पडलेली आहे. दि. ४/११/२०२४ तारखेला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची वेळ ३ वाजेपर्यंत आहे. त्यानंतर चिन्ह वाटप होऊन माळशिरस तालुक्यातील निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

चोऱ्या दरोडे रोखण्यासाठी नागरिकांनीही दक्षता घ्यावी- ए.पी.आय परजणे

चोऱ्या, दरोडे रोखण्याचे काम पोलिसांचे असले, तरी एक सुजाण नागरिक म्हणून परिसरातील चोऱ्या दरोडे रोखण्यासाठी नागरिकांची महत्वाची आहे, असे आव ाहन नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी केले आहे. नागरिक व तरुणांना चोऱ्या, दरोडा पडण्याआधी कोणती काळजी घ्यावी, काय उपाययोजना कराव्यात. याचे मार्गदर्शन पोलिसांकडून देऊन तरुणांना ग्रामसुरक्षा दलात सहभागी होण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे. दिवाळीच्या सुट्टी असल्याने अनेक नागरिक घराला लॉक लावून कुटुंबासह परगावी फिरावयास जातात मात्र परगावी जात असताना आपल्या घरातील सोन्या चांदीचे दागिने, पैसा व मौल्यवान वस्तू घरातील कपाटात तसेच ठेवून जातात या संधीचा फायदा घेऊन घर फोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने पैसा व मौल्यवान वस्तू चोर चोरी करून घेऊन जातात. त्यामुळे आपले खूप मोठे नुकसान होते. चोरीहोऊ नये यासाठी नागरिकांनी बाहेरगावी जाताना सोन्या चांदीचे दागिने पैसा व मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे. पोलीस वाहन घेऊन पोलीस गस्तीचे प्रमाण वाढवले आहे. परंतु एकाच वेळी प्रत्येक वस्ती व वाडी ठिकाणी हे वाहन पोहचू शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगून काही संशयास्पद वाटल्यास आपत्कालीन नंबर ११२ यावरती तात्काळ पो- लीस ठाण्याशी संपर्क करून माहिती देऊ शकता. असे आ- वाहन नागरिकांना नातेपुते पो- लीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी केले आहे.

अंगावर खाज येण्याची मुख्य कारणे कोणती? – डॉ पल्लवी मेहर

आजकाल खतांशिवाय आणि जंतुनाशकाचा वापर केल्याविना कुठलेही पीक काढले जात नाही. तेव्हा घरी जेवणासाठी आणलेली भाजी, फळे चांगली गरम पाण्याने धुऊन घ्या व मगच वापरा.काही जणांना नेहमीचे जेवनामुळेही त्रास होऊ शकतो खाण्यात नेहमीचेच पदार्थ खाजेचे कारण ठरू शकतात.उदा. अंडे, दूध, पीठ, बेसन, डाळीचे विविध प्रकार, दही, लोणी असे कितीतरी पदार्थ आहेत जे सेवन केल्यावर अंगाला खाज सुटते आजकाल लोकांच्या, मुलांच्या खाण्यात प्रचंड बदल झाले आहेत. त्यात जास्त फास्ट फूड, कुरकुरे, चिप्स, अगदी पाच-पाच रुपयांची पाकिटे बाजारात विकली जात आहेत. फास्ट फूडमध्ये तर नाना तर्‍हेचे रंग मिसळले जातात. तंदुरीवर तर ब्रश घेऊन रंग लावला जातो. त्यांच्या खाण्यामध्ये ऍजिनोमोटो नावाचा पदार्थ वापरला जातो. अक्षरशः पोत्यांनी ही वस्तू हॉटेलांमध्ये पोचवली जाते. कुठलाही फास्ट फूडचा प्रकार सांगा, तो बनवण्यासाठी या ऍजिनोमोटोचा वापर केला जातो. कारण त्याने म्हणे पदार्थाला चव येते व हा पदार्थ शरीराला अत्यंत घातक आहे. हा सेवन केल्याने अंगाला खाज येते. पुरळ उठतात. तेव्हा फास्ट फूड खाणार्‍यांनो, सावधान!!! तुमच्या अंगाला खाज सुटू शकते.
आपण शरीरावर धारण केलेल्या वस्तूंमुळे, अंगाला लागलेल्या कोणत्याही गोष्टीमुळेसुद्धा अंगाला खाज सुटते. जसे -सिनथेटिक कपडे, कपाळावरील टिकली, साबण, नकली दागिने या सगळ्या गोष्टींनी अलेर्जी निर्माण होऊन त्या भागावर पुरळ व खाज निर्माण होते. काही जणांना काही गोळ्या-औषधे घेतल्यानंतर शरीरावर खाज येऊ शकते. आपल्याला कोणत्या गोळयामुळे त्रास झाला हे लक्षात ठेवून प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे कुठल्याही आजारानिमित्त जाल तेव्हा डॉक्टरांना ते सांगा.त्वचेचे विविध विकार आहेत ज्यामुळे अंगाला खाज सुटते- खरूज, नायटा, बुरशी, सोरिअसिस, पित्त, ऍलर्जी, लिकेन प्लेनस, डोक्यातील कोंडा, यासारखे असे अनेक त्वचाविकार आहेत ज्यामधे खाजेचा त्रास होतो. विविध प्रकारच्या रोगांमध्येही रुग्णाच्या अंगावर पुरळ उठून खाज येते.

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून मतदार जनजागृती

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्क्यात वाढ होण्याकरीता तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी शहरातील बारामती बसस्थानक, बारामती नगरपरिषद तसेच विविध ठिकाणी मतदार जागृतीबाबत पथनाट्याचे सादरीकरण केले.

यावेळी ‘पद्धतशीर मतदार शिक्षण आणि निवडणूक मतदान सहभाग’ अर्थात ‘स्वीप’च्या समन्वयक सविता खारतोडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ. विलास कर्डीले यांच्यासह कु. सोहम वाघ, चंद्रहास धुमाळ, सिद्धार्थ काळे, साक्षी फाळके, गायत्री केद्रे, शर्वरी बाचल, प्रतिभा बोराटे आदी उपस्थित होते.

बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणुकीत मतदानाचा टक्क्यात वाढ होण्याकरीता मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती बसस्थानक येथे आयोजित मतदार जागृती कार्यक्रमात ‘मतदार राजा जागा हो… लोकशाहीचा धागा हो…. आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी प्रवाशी व एसटी कर्मचाऱ्यांचा कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विधानसभा निवडणुकीत सहभागी होत येत्या 20 नोव्हेंबर रोजी सर्व मतदारांनी मतदान करावे, असे त्यांनी आवाहन करण्यात आले.

आपल्या दादांना झापूक झुपूक होऊन मतदान करा; बारामती प्रचारसभेत सूरज चव्हाणचं बारामतीकराना आवाहन..

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बारामती-

बारामती मतदारसंघातून दि.28 ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी कण्हेरी येथून प्रचाराचा शुभारंभ झाला. जोरदार शक्तिप्रदर्शन करत अजित पवार यांनी अर्ज दाखल केला.त्यानंतर प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेसाठी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणने खास उपस्थिती लावली होती. एवढंच नव्हे तर त्याने भाषण करत अजित पवारांना मतं देण्यासाठी जनतेला आवाहन केलं.
‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सूरज चव्हाणची खास भेट घेतली होती. त्याला शाबासकीची थाप देऊन अजित पवारांनी कौतुक केलं होतं. यावेळी अजित पवारांनी सूरजला त्याच्या गावात चांगलं घर बांधून देण्याबाबत सूचना दिल्या होत्या. नुकताच सूरजच्या गावातल्या नव्या घराचा भूमीपूजन सोहळा पार पडला. यावेळी सूरजने अजित पवारांचे आभार व्यक्त केले होते. त्यानंतर 28 ऑक्टोबर ला सूरज तोंड लपवत अजित पवारांच्या बारामती सभेत उपस्थित राहिला.
अजित पवारांच्या सभेत सूरज चव्हाण आल्याचं समजाताच जनता ओरडू लागली. त्यानंतर अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन सूरजचं स्वागत केलं. पुढे सूरज एका मिनिटांचं भाषण करत हात जोडून म्हणाला, “नमस्कार मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सूरज चव्हाण. आई मरीमाता… ओम नमः शिवाय… शिव शंभो… हर हर महादेव… ऐका बाप्पा मोरया… माझं स्वप्न दादांनी पूर्ण केलंय आणि गरिबांना दादांनी मदत केली. तर मनापासून दादांचे आभार मानतो. आपल्या दादांना झापूक झुपूक होऊन मतदान करा.” असे आपल्या स्टाईलमध्ये बारामतीकरांना आवाहन केले व उपस्थिताचे पुन्हा एकदा मन जिंकले.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 18 जणांनी 24 अर्ज केलेला दाखल

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क-प्रमोद शिंदे –

उत्तम शिवदास जानकर(अपक्ष)विकास संदिपान धाईजे(अपक्ष),राम सातपुते, रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष एन के साळवे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईजे, यांच्यासह अनेकांनी भरले उमेदवारी अर्ज
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 18 जणांनी 24 अर्ज‌ दाखल केले यामध्ये ,अनिल गौतम नवगिरे
(अपक्ष),नागेश आबा जाधव (अपक्ष)सुधीर अर्जुन पोळ (अपक्ष)त्रिभुवन विनायक धाईजे(अपक्ष)
त्रिभुवन विनायक धाईंजे,प्रहार जनशक्ती (ए.बी. फॉर्म अप्राप्त)कुमार आनंदा लोंढे(अपक्ष)राम विठ्ठल सातपुते (भा.ज.पा)संस्कृती राम सातपुतेभा.ज.पा. (ए.बी. फॉर्म अप्राप्त),ज्ञानेश्वर मारूती काटे(अपक्ष)अतुल श्रीमंत सरतापे(अपक्ष)शरद गेना सावंत(अपक्ष)दादा विश्वनाथ लोखंडे(अपक्ष)नंदकुमार कृष्णाजी साळवे,आर. पी. आय. (अठवले गट) (ए.बी. फॉर्म अप्राप्त)

वंचित बहुजन अघाडीचे वतीने राज यशवंत कुमार प्रकाश वामन नवगिरे(अपक्ष)अनिल तानाजी साठे(अपक्ष)शैलेश जनार्धन कोतमिरे(अपक्ष)धनंजय तुकाराम साठे(अपक्ष)!लालासाहेब ज्ञानोबा आडगळे,नॅशनॅलिस्ट काँग्रस पार्टी (शरदचंद्र पवार) पर्यायी उमेदवार,प्रा.डॉ. सुनिल सुखदेव लोखंडे(रा.स.प.)किशोर शिवाजी सुळ(अपक्ष)किशोर शिवाजी सुळ,भा.ज.पा. (ए.बी. फॉर्म अप्राप्त) यांनी अर्ज भरले.माळशिरस (अ.जा) राखीव मतदार संघात शेवटच्या दिवसा अखेर 29 जणांचे एकुन 35 उमेदवारी अर्ज दाखल झाले,यामध्ये सहा जणांनी प्रत्येकी दोन अर्ज भरले आहेत.

You may have missed