फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी,महिला डॉक्टरचे चॅटिंगपोलिस तपासातून धक्कादायक खुलासे

या प्रकरणाच्या तपासा संदर्भामध्ये आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. गृह विभागाकडून हा तपास पूर्णपणे निष्पक्ष व्हावा, अशा सूचना आम्हाला मिळाल्या आहेत. त्या अनुषंगाने हा तपास पूर्णपणे निष्पक्षपणे सुरू आहे. सध्याचे सीडीआर आणि चॅटिंग समोर आले आहे. त्याच्यातून असं दिसत आहे की, मृत डॉक्टर आणि आरोपी यांच्यामधील वारंवार चॅटिंग सुरू होतं. डॉक्टर महिला ही आरोपींच्या संपर्कामध्ये होती, अशी माहितीही पोलिस अधीक्षकांनी दिली. फलटण उपजिल्हारुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्येने महाराष्ट्र हादरला असून राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. आपल्या हातावर पेनाने सुसाईड नोट लिहून डॉक्टर महिलेने आपले जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणांम ध्ये सुरू असलेल्या तपासाबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी आज महत्वाचे खुलासे केले आहेत. याप्रकरणी सुरू असलेल्या तपासाची माहिती देताना, मृत महिला डॉक्टर आणि आरोपीयांच्यात वारंवार चॅटिंग सुरू होते असा खळबळजनक दावा पोलिस अधिक्षकांनी केला आहे.फलटण शहर पोलिस ठाण्यात जो गुन्हा दाखल करण्यात आला, तो आत्महत्येचा गुन्हा आहे. या प्रकरणात दोन्ही आरोपी सध्या अटकेत आहेत, दोन्ही आरोपी सध्या पोलिस कस्टडीमध्ये असून त्यांचा डीवायएसपी यांच्यामार्फत तपास सुरू आहे. सीडीआर असेल किंवा इतर पुरावे, यामार्फत आरोपीविरुद्ध काय पुरावे मिळतात याचा तपास सध्या सुरू आहे. सध्या प्राथमिक पीएम रिपोर्ट मिळाले असून फायनल पीएमरिपोर्ट आज किंवा उद्या आम्हाला मिळतील. त्याचबरोबर काही फॉरेन्सिक रिपोर्ट देखील लवकरच हाती येतील. त्यानुसार मयत आणि आरोपी यांचे काही नक्की संबंध होते का हे तपासातून समोर येईल, असे पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांनी म्हटलं. मयत डॉक्टर या ज्यावेळेस हॉटेलमध्ये गेली, त्यावेळेस ती एकटी होती. हे सीसीटीव्हीम ध्ये दिसत असून हॉटेलमधील डीव्हीआर आम्ही जप्त केला आहे. डीव्हीआर तपासला असता, कोणतीही संशयास्पद गोष्ट आम्हाला आढळून आली नाही.

You may have missed