प्रमोद शिंदे

डोर्लेवाडी येथे २५ वे राज्यस्तरीय शिबीर, नामाची दिवाळी ,

चैतन्य जप प्रकल्प हा आध्यात्मि क प्रकल्प सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी ब्रह्मलीन श्रीपाद गोविंद जोशी (महाराजांचे पोस्टमन) यांचे मार्फत उभा केला आहे. चैतन्य जप प्रकल्पाची यापूर्वीची वेगवेगळ्या ठिकाणी २४ राज्यस्तरीय शिबिरे झाली आहेत. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर म हाराज यांच्या प्रेरणेने २५ वे शिबीर हे मौजे डोर्लेवाडी ता. बारामती जि. पुणे येथे दिनांक २५, २६ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत होणार आसल्याची माहिती चैतन्य जप प्रकल्प (महाराष्ट्र राज्य) कार्याध्यक्ष व शिबीर विभाग प्रमुख धैर्यशिलभाऊ देशमुख यांनी दिली आहे. पुढे माहिती देत असताना ते म्हणाले की, ‘माणूस नामाला लावावा’ हाश्री महाराजांचा सांगावा संपूर्ण महाराष्ट्राम ध्ये पोहोचविण्याचे काम या प्रकल्पाच्या माध्यमातून सुरु आहे. २५ तासांचा अखंड रामनाम जप हजारो जपकारांच्या घरी सुरु असून प्रकल्पाच्या अखंड वर्षभर (३६५ दिवस) चालणाऱ्या एका माळेचे एक संकुल याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एकूण ११ माळा अर्थातच ११ जप संकुले उभी राहिली आहेत. पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे धावताना माणुसकीलाही पायदळी तुडविणा-या माणसाच्या आजच्या जगातील ही एक आध्यात्मिक क्रांतीच आहे. नामाला नीतीची, सदाचरणाची व कर्तव्याची जोड द्यावी. श्री महाराजांच्या विचारांनी हजारो लोक नामसाधनेत असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

फलटण येथील महिला डॉक्टर यांच्या आत्महत्या प्रकरणी सर्व आरोपींना तात्काळ अटक करून तपास सीबीआय कडे वर्ग करावा- वैभव गीते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

फलटण येथील महिला डॉक्टर डॉ.आत्महत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून तपास निष्पक्षपाती होण्यासाठी CBI कडे वर्ग करण्यात यावा याबद्दल अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याशी एन डी एम जे चे राज्य सचिव वैभव गीते व पदाधिकारी यांनी भेट घेऊन चर्चा केली.

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील महीला वैद्यकीय अधिकारी डॉ.संपदा मुंडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याने राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहेत. याबद्दल नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने राज्य महासचिव ऍड.डॉ.केवलजी उके यांच्या मार्गदर्शनात राज्य सचिव वैभव गिते व ॲड.अमोल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्ष भेट देऊन निवेदन देण्यात आले. या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या.1) पी.एस.आय गोपाळ बदणे
2) प्रशांत बनकर सर्व आरोपींना तात्काळ अटक करा आरोपींना फरार करण्यासाठी पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्यांना सह आरोपी करा. आरोपी अटक झाल्यानंतर पळून जाण्याच्या मार्गाचा व अटक केले पर्यंतचा सर्व प्रवास तपास दोन शासकीय पंचनामा करून करावा.2) हा तपास निष्पक्षपाती होण्यासाठी सीबीआय कडे वर्ग करावा. या गुन्ह्यातील आरोपी स्वतः फलटण शहर पोलीस स्टेशन मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर अधिकारी असल्याने तपासामध्ये हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा तपास CBI कडे वर्ग करण्याचा प्रस्ताव तात्काळ पोलीस अधीक्षक यांनी राज्य शासनाकडे सादर करावा.3) घटनास्थळाचे निरीक्षण फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून करण्यात यावे. घटनास्थळ पंचनामा हा व्हिडिओ रेकॉर्डिंग द्वारे करण्यात यावा. सर्व प्रकारचे परिस्थितीजन्य पुरावे तात्काळ घेण्यात यावेत.4) या गुन्ह्यामध्ये फक्त आत्महत्येचा कलम लावण्यात आलेला आहे. मयत डॉक्टर संपदा मुंडे यांनी हातावरती लिहिलेल्या मजकुराप्रमाणे आरोपी ने चार वेळा त्यांच्यावर बलात्कार केला आहे असे नमूद आहे त्या अनुषंगाने बलात्काराचे कलम देखील तात्काळ वाढविण्यात यावे. बदणे यांनी महिला वैद्यकीय अधिकारी यांच्यावरती कुठे बलात्कार केले होते.कितीवेळा बलात्कार केले होते. बलात्कार करताना पीएसआय बदने यास कुणी मदत केली होती. याबाबतची सखोल चौकशी करण्यात यावी.अन्यथा आरोपींना अटक झाली तरी देखील लागलीच जामीन मिळेल आणि गुन्ह्याची संवेदनशीलता व तीव्रता कमी होईल त्या अनुषंगाने तात्काळ बलात्काराची कलमे वाढविण्यात यावीत. पीएसआय बदने व ईतर आरोपींच्या नार्को टेस्ट,ब्रेन मॅपिंग टेस्ट व इतर टेस्ट करण्यात याव्यात. जेणेकरून सर्व सत्य समोर येईल.5) मयत आरोपी संबंधित संशयित यांचे घटना घडण्याचे अगोदर सहा महिन्यांचे सी डी आर ए एस डी आर ए व व्हाट्सअप चॅट सोशल मीडिया चॅट काढावेत आरोपींनी सर्व पुरावे नष्ट करण्याचे अनुषंगाने मल्टीमीडिया व मोबाईल मधील पुरावे नष्ट केल्या असावेत त्या अनुषंगाने त्यांचे मोबाईल जप्त करून डिलीट केलेले सर्व पुरावे विहित मार्गाने घ्यावेत तसेच मयताच्या मोबाईल मधील देखील सर्व पुरावे विहित मार्गाने तात्काळ घेण्यात यावेत.6) मयत डॉक्टर मुंडे यांनी यापूर्वी त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल केलेले सर्व अर्ज तपासात घ्यावीत या अर्जांची योग्य दखल न घेणाऱ्यांवर कारवाई करावी. व त्या अर्जांमधील उल्लेखित केलेल्या इसमांना सह आरोपी करण्यात यावे व अटक करून पुढील तपास करण्यात यावा.7) मयत डॉक्टर मुंडे यांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील व सिव्हिल सर्जन सातारा यांच्याकडे त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराबाबत तोंडी लेखी तक्रार दिली होती का याबाबत तपासामध्ये चौकशी करण्यात यावी तपास टिपणे घेण्यात यावीत व तपासामध्ये सर्व कागदपत्र समाविष्ट करण्यात यावीत.8) आरोपी पीएसआय मदने व त्याचे सहकारी हे महिला वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे यांचे वर शवविच्छेदन करतेवेळी दबाव आणत असत. आणि हवा असा रिपोर्ट व अहवालामध्ये त्यांना हवे असलेले बदल करून घेण्यासाठी दबाव टाकत होते याबाबत मयत डॉक्टर संपदा मुंडे यांनी आजपर्यंत उपजिल्हा फलटण रुग्णालयामध्ये केलेले सर्व शवविच्छेदन अहवाल तपासावेत. तसेच त्यांनी एमएलसी आल्यानंतर रुग्णांवर व अत्याचार पिढीतांवर केलेले उपचार व दिलेली एम.एल.सी रिपोर्ट मेडिकल रिपोर्ट ची सखोल चौकशी करण्यात यावी. कारण या मधून सर्व महत्वपूर्ण पुरावे उलगडणार आहेत. किती व कोणते गुन्हे दाबण्यासाठी आरोपी पीएसआय बदने व त्याचे सहकारी कुणाच्या सांगण्यावरून महिला वैद्यकीय अधिकारी श्री संपदा मुंडे यांच्यावर दबाव आणत होते हे सर्व स्पष्ट होईल.9)या गुन्ह्यासाठी सर्व प्रकारच्या पंचनाम्यानमधील पंच हे फक्त शासकीयच घेण्यात यावेत तसेच निमशासकीय व मानधनतत्त्वावरील पंच घेण्यात येऊ नयेत. शक्यतो हे सर्व पंच देखील फलटण तालुक्याच्या बाहेरील शासकीय सेवेतील घेण्यात यावेत.10) या गुन्ह्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांसह
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी दोषी असल्यास कारवाई करण्यात यावी.11) हा गुन्हा फास्टट्रॅक जलदगती न्यायालयात (कोर्टात) चालवण्याचे आदेश तात्काळ मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी द्यावेत.12) या गुन्ह्यात तात्काळ विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी. विशेष सरकारी वकिलांच्या मदतीकरितादेखील सहाय्यक विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी. याबाबतचे आदेश मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तात्काळ द्यावेत.13) या गुन्ह्यात तपासाच्या प्रगतीबाबत तपासी अधिकारी व पोलीस अधीक्षक सातारा यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व अपडेट माहिती वेळोवेळी प्रसार माध्यमांना व महाराष्ट्रातील जनतेला दिली पाहिजे यावर कार्यवाही करावी.14) फलटण तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी राजकीय दबावात काम करत असून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांवर राजकीय वजनदार व्यक्तींचा प्रचंड दबाव असल्याचे दिसत आहे. त्या अनुषंगाने
मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना भयमुक्त वातावरणामध्ये विना दबावांमध्ये काम करण्याकरिता प्रोत्साहन दिले पाहिजे.
अशा मागण्यांचे निवेदन नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने देण्यात आले.
अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर मॅडम यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निवेदनावर योग्य कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी वैभव तानाजी गितेअमोल बाळासो सोनवणे
विशेष सरकारी वकील बारामती
सदस्य जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती पुणे
अनिकेत राजेंद्र मोहिते
सदस्य जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती पुणे
गोविंद अरुण मोरे
केंद्रीय नामनिर्देशित सदस्य उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती फलटण,आप्पा महादेव गायकवाड
सदस्य नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस,
जय हनुमंत माने सदस्य नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस, प्रणव भागवत, मंगेश भागवत हे उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे झालेले पाहायला मिळत आहेत. दोन पोलीस अधिकाऱ्यांनी तिचा मानसिक छळ केल्याचा आरोप तिने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये केला आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे झालेले पाहायला मिळत आहेत. दोन पोलीस अधिकाऱ्यांनी तिचा मानसिक छळ केल्याचा आरोप तिने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये केला आहे.शिवाय, PSI गोपाल बदने याने 5 महिने सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचंही तिने याच नोटमध्ये नमूद केलंय. दरम्यान, या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कारवाई करत दोघांना निलंबित केलं आहे. शिवाय या प्रकरणातील आरोपी असलेल्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दोन पोलीस अधिकाऱ्यांकडून आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचा छळनोटमध्ये डॉक्टरने लिहिले आहे की, PSI गोपाल बदनेनी तिचं पाच महिन्यांपासून वारंवार लैंगिक शोषण केले, तसेच पोलीस अधिकारी प्रशांत बनकर यांनी तिला मानसिक छळ केला.दोघांच्या त्रासाला कंटाळून तिने हॉटेलमध्ये जाऊन सुसाईड केली. आता पोस्टमॉर्टेम होईल, त्यात आणखी गोष्टी समोर येतीलच, मात्र तिनं हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटची फॉरेन्सिक तपासणी सुरू केली आहे. आता ही घटना समोर आल्यानंतर यासंदर्भातील अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टर या गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. एका वैद्यकीय तपासणीच्या प्रकरणात पोलिसांशी त्यांचा वाद झाला होता, त्यानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती.पुणे हादरलं, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीला पत्नीने गळा आवळून संपवलं, मुलं घरात असतानाच घडला प्रकारचौकशीदरम्यान त्यांनी आपल्या वरिष्ठांना आणि सोबतच डीवायएसपींना लेखी स्वरूपात तक्रार देत म्हटले होते की, “माझ्यावर अन्याय होत आहे. मी आत्महत्या करेन.” त्यांच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याचं सांगण्यात येत आहे. आता या प्रकरणाची नोंद फलटण पोलीस ठाण्यात झाली असून, त्यांच्या आत्महत्येमागे नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू आहे. पोलिस मात्र यावर काही बोलायला तयार नाहीत. आत्महत्येपूर्वी या तिच्यावर फलटण पोलिसांकडून सातत्याने दबाव आणला जात होता, असा आरोप नातेवाईकांनी केलाय. तिच्या तक्रारीनंतरही पोलीस यंत्रणेने कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असा गंभीर आरोप नातेवाईक करत आहेत. आता चौकशीचे आदेश दिले जातील, राजकारण होईल, मात्र गेलेला जीव परत येणार नाही. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.इतर महत्त्वाच्या बातम्याPSI कडून 5 महिने अत्याचार, नातेवाईकांकडूनही गंभीर आरोप, महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे

भाऊबीजेला सोने-चांदी स्वस्त ! किंमती धडाधड कोसळल्या;

 सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये (Gold Silver Price) सध्या मोठी घसरण सुरू आहे. गुरुवारी, भाऊबीजेच्या (Bhai Dooj) शुभमुहूर्तावर दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली.गुरुवारी सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे ५५३ रुपये आणि चांदीच्या दरात प्रति किलोमागे १००० रुपयांहून अधिकची कपात नोंदवली गेली. मात्र, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर थोडीशी रिकव्हरी दिसल्याचे वृत्त आहे.सोन्याचे नवे दर:इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅममागे १,२३,९०७ रुपयांवरून घसरून १,२३,३५४ रुपयांवर आला आहे.तसेच, २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅममागे १,१३,४९९ रुपयांवरून कमी होऊन १,१२,९९२ रुपये झाला आहे. १८ कॅरेट सोन्याचा दरही ९२,९३० रुपयांवरून कमी होऊन ९२,५१६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.यापूर्वी बुधवारी २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे ३,७०० रुपयांहून अधिक आणि चांदीच्या दरात प्रति किलोमागे सुमारे १०,६०० रुपयांची मोठी घसरण झाली होती.चांदीत किती घसरण?गुरुवारी चांदीच्या किंमतीत प्रति किलोमागे १०५१ रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचा भाव १,५२,५०१ रुपयांवरून कमी होऊन १,५१,४५० रुपये प्रति किलो झाला आहे.एमसीएक्सवर रिकव्हरी:हाजिर बाजारातील घसरणीच्या विपरीत, वायदा बाजारात मात्र तेजी दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ५ डिसेंबर २०२५ साठी सोन्याचा कॉन्ट्रॅक्ट १.५७ टक्क्यांनी वाढून १,२३,७६५ रुपये तर चांदीचा ५ डिसेंबर २०२५ चा कॉन्ट्रॅक्ट २.३१ टक्क्यांनी वाढून १,४८,९२३ रुपयांवर होता.रिकव्हरीचे कारण:तज्ञांनी सांगितले की, एमसीएक्सवर गुरुवारी सोन्याच्या किंमतीत रिकव्हरी दिसून आली. अलीकडच्या दिवसांत झालेल्या मोठ्या घसरणीमुळे नफावसुली आणि अमेरिका, भारत आणि चीन यांच्यातील व्यापार करारावर सुरू असलेल्या चर्चेमुळे ही घसरण झाली होती. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या धोरणात्मक विचारांमधील बदलांमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे आणि गुंतवणूकदारांनी पुन्हा कमी दरात गुंतवणूक केल्यामुळे किरकोळ तेजी आली आहे.

ऐन दिवाळीत धुंवाधार पाऊस, पुढील 72 तास धोक्याचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

महाराष्ट्रात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. त्यातच आता सणासुदीच्या दिवसात हवामानात बदल होताना दिसत आहे. पुढील तीन दिवस पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील स्थानिक हवामान स्थितीमुळे ऐन दिवाळीत अनेक ठिकाणी धुंवाधार पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.ज्यामुळे नागरिकांनी छत्री-रेनकोट सोबत ठेवा असे आवाहन करण्यात आले आहे.अनेक भागात ढगांची गर्दीकाही दिवसांपूर्वी वातावरणात ऑक्टोबर हीटचा जाणवत होता. तर रात्रीच्या वेळी हलका गारवा अनुभवता येत होता. मात्र गेल्या २४ तासांत अचानक झालेल्या हवामान बदलामुळे दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीच्या अनेक भागात ढगांची गर्दी दिसत आहे. तसेच अनेक शहर आणि परिसरासह राज्यातील काही भागात जोरदार सरी कोसळल्या आहेत.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. या स्थितीमुळे ऐन दिवाळीत सण साजरा करताना नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवसांसाठी २३ ते २५ ऑक्टोबर रोजी हवामानात मोठा बदल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या काळात राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.यलो अलर्ट जारी झालेले जिल्हे२३ ऑक्टोबर : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग; पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि मराठवाडा-विदर्भातील धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली.२४ ऑक्टोबर : कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांसह आता खान्देशातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर या विदर्भातील जिल्ह्यांचाही समावेश.२५ ऑक्टोबर : प्रामुख्याने कोकण, रायगड, रत्नागिरी, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर आणि मराठवाडा, संभाजीनगर, बीड, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज.घराबाहेर पडताना रेनकोट किंवा छत्री सोबत ठेवाऐन काढणीच्या काळात आलेल्या या परतीच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर पाहता नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी. तसेच आवश्यक असल्यास घराबाहेर पडताना रेनकोट किंवा छत्री सोबत ठेवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दिवाळीच्या संध्याकाळी चारित्र्यावरून वाद, रात्री पत्नीने तिच्या ओढणीनेच..

ती-पत्नीचं नातं हे जन्मजन्मांतरीचं असतं अस म्हणतात. लग्नात सप्तपदी घेताना पती-पत्नी हे एकमेकांची साथ देण्याचं, सात जन्म एकत्र राहण्याच वचन देतात. या नात्यात प्रेम, आदर आणि सगळ्यात महत्वाचा असतो तो एकमेकांवरचा विश्वास..पती-पत्नीच्या नात्यात विश्वास असेल तर कितीही वादळं आली तरी संसाराचा पाय डगमगत नाही. मात्र जर याच नात्यात संशयाचं भूत शिरलं तर मग अख्खा संसार उद्ध्वस्त होतो. एकमेकांवर संशय नसल्याने किती तरी जोडप्यांच्या संसाराची राखरांगोळी होते, कोणी वेगळं होतं तर कोणी अजून काही करतं .पण याच संशयातून कोणी कोणाचा जीव घेतला तर ? एका शुल्लक वादावरून पत्नीने तिच्याच, जोडीदाराची, पतीची दिवाळीच्या दिवशीच हत्या केल्याची धक्कादायक घटना ही पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. चारित्र्यावर वारंवार संशय घेतल्याने पती-पत्नीत सारखा वाद व्हायचा. कालच दिवाळीचा शेवटचा दिवस होता, तरी त्यांच्यात आधी संध्याकाळी आणि मग रात्री पुन्हा वाद झाला. आणि त्याच वादानंतर रागाच्या भरात पत्नीने तिचीच ओढणाी वापरत पतीचा यगळा दाबला आणि त्याची निर्घृणपणे ह्त्या केल्याचा अत्यंत संतापजनक आणि तितकाच क्रूर गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपी पत्नीला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.नेमकं काय घडलं ?मिळालेल्या माहितीनुसार, नकुल भोईर असे मृत इसमाचे नाव आहे. तो सामजिक कार्यकर्ता होता, तर आरोपी पत्नी ही आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक होती. नकुल आणि आरोपी महिलेचा काही काळापूर्वी विवाह झाला होता. मात्र नुकल भोईर हाँ त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर खूप संशय घ्यायचा, त्यामुळे त्यांच्यात सारखे खटके उडायचे, वादही व्हायचा.काल दिवाळीच्या दिवशी देखील याच संशयावरून नकुल व त्याच्या पत्नीचे संध्याकाळी भांडण झालं. तो वाद मिटतो ना मिटोत तोच पुन्हा त्याच कारणावरून रात्रीही ते एकमेकांशी पुन्हा भांडेल. आणि त्याच वादात पत्नीने तिचीच ओढणी वापरत पती नुकलाचा गळा दाबला आणि त्याची निर्घृणपणे हत्या केली. हा प्रकार उघडकीस येताच एकच खळबळ माजली.गुन्ह्याची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तसेच आरोपी पत्नीला बेड्या ठोकून ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांना आता ‘हे’ तृणधान्ये मोफत दिले जाणार !

रेशनमहाराष्ट्रातील रेशन धारकांसाठी आत्ताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट समोर आले आहे. आता राज्य शासनाच्या पुरवठा विभागाकडून महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांना एक नवीन तृणधान्य मोफत देण्यात येणार कार्ड धारकांना गहू आणि तांदूळ सोबतच आता ज्वारी सुद्धा मोफत मिळणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार गव्हाचे प्रमाण कमी करून आता रेशन कार्ड धारकांना ज्वारी हे तृणधान्य सुद्धा वितरित करण्यात येणार आहे. नक्कीच या निर्णयामुळे राज्यातील रेशन कार्डधारकांना दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील काही निवडक जिल्ह्यांमध्ये ज्वारीचे वाटप करण्यात येणार आहे.गेल्यावर्षी ज्वारीचे विक्रमी उत्पादन झाले होते आणि राज्य शासनाने देखील मोठ्या प्रमाणात हमीभावात ज्वारीची खरेदी केली. दरम्यान आता याच ज्वारीचे राज्य शासनाच्या अन्न नागरी व पुरवठा विभागाच्या माध्यमातून रेशन कार्डधारकांना वाटप करण्यात येणार आहे.नोव्हेंबर महिन्यापासून रेशन कार्ड धारकांना गहू तांदूळ सोबत ज्वारीचे वाटप करण्यात येणार असून जवळपास पुढील दोन महिने रेशन कार्डधारकांना ज्वारी दिली जाईल अशी माहिती पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडून यावेळी समोर आली आहे.केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत म्हणजेच एमएसपी अंतर्गत राज्यात भरड धान्य खरेदीच्या सूचना मिळाल्या होत्या. यानुसार राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात एमएसपीवर ज्वारीची खरेदी केली आणि आता याच ज्वारीचे रेशन कार्ड धारकांना वाटप करण्यात येईल.प्रत्येक पात्र कुटुंबातील सदस्यांना प्रत्येकी एक किलो ज्वारी देण्यात येणार आहे. ज्वारीचे वाटप फक्त दोन महिन्यांच्या कालावधीसाठी होणार आहे. अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या रेशन कार्ड धारकांना ज्वारीचे वाटप करण्यात येणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.अन्न व नागरी पुरवठा विभागाने जिल्हानिहाय ज्वारीचे वाटप आणि उचल प्रक्रिया सुद्धा निश्चित केली असल्याची माहिती पुरवठा विभागाच्या माध्यमातून समोर आली आहे.तसेच सरकारने पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच नोव्हेंबर पासून पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण ज्वारीचे वितरण पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळाल्या आहेत.कोणत्या जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार ज्वारी?

एसआयटी चौकशीत मतचोरीच्या रेटकार्डचा पर्दाफाश, 80 रुपयांत एक मत खाल्ले! डेटा ऑपरेटरने तब्बल 6018 नावे कापली!!

र्नाटक सरकारने नेमलेल्या एसआयटी चौकशीतून मतचोरीच्या रेटकार्डचा पर्दाफाश झाला आहे. 2023 च्या निवडणुकीआधी येथील आळंद विधानसभा मतदारसंघात तब्बल 6018 मतदारांची नावे कापण्यात आली. एका डेटा सेंटरमध्ये बसून काही डेटा ऑपेरटर्सनी हे कांड केले.अवघ्या 80 रुपयांच्या बदल्यात त्यांनी एक मत खाल्ले. त्यातून डेटा ऑपरेटर्सना एकूण 4 लाख 80 हजार रुपये मिळाले. मतांच्या ‘सेल’चा हा झोल चव्हाटय़ावर आल्यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर पुन्हा संशयाचे मळभ दाटले आहे.भाजप व निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप करताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आळंद मतदारसंघाचा दाखला दिला होता. त्यानंतर तपासाची चक्रे फिरू लागली. आळंद येथील मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या 6018 मतदारांच्या नावांची चौकशी करण्यात आली. त्यातील केवळ 24 मतदारांचे अर्ज योग्य असल्याचे आढळले. दुसरीकडे वास्तव्यास गेल्यामुळे त्यांनी नाव वगळण्यासाठी अर्ज केले होते, मात्र, इतर नावांचा घोळ कायम होता.n एसआयटीने तपास हाती घेतल्यानंतर कलाबुरागी जिह्याच्या मुख्यालयातील डेटा सेंटरवर लक्ष केंद्रित केले. याच सेंटरमधून मतदारांची नावे वगळण्यासाठी अर्ज करण्यात आले होते. या प्रकरणात मोहम्मद अश्फाक, मोहम्मद अक्रम व इतर तिघे असल्याचे समोर आले. अश्फाक व अक्रम हे दोघे डेटा सेंटर चालवत होते व अन्य तिघे ऑपरेटर्स म्हणून काम करत होते. पोलिसांनी या सर्वांचे संगणक व इतर वस्तू ताब्यात घेतल्या. नावे वगळण्याचे अर्ज करण्यासाठी वापरण्यात आलेला लॅपटॉपही जप्त करण्यात आला.धागेदोरेभाजपनेत्यापर्यंतलॅपटॉप आणि इतर रेकॉर्डस्च्या तपासानंतर भाजपचे नेते सुभाष गुत्तेदार यांच्याविषयी पोलिसांचा संशय बळावला. त्यानुसार 17 ऑक्टोबर रोजी एसआयटीने गुत्तेदार, त्यांची दोन मुले हर्षनंदा व संतोष आणि त्यांच्या सीएचे घर आणि कार्यालयांवर छापे टाकले. या छाप्यातून पोलिसांनी 7 लॅपटॉप, मोबाइल फोन जप्त केले आहेत. डेटा ऑपरेटर्सना देण्यात आलेल्या पैशांचा स्रोत काय याचा शोध आता एसआयटी घेत आहे.75 वेगवेगळय़ामोबाइलनंबर्सचावापरमतदार यादीतून नाव वगळण्याचा अर्ज करण्यासाठी तब्बल 75 वेगवेगळय़ा मोबाइल नंबर्सचा वापर करण्यात आला. हे नंबर निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर रजिस्टर करण्यात आले. पोल्ट्री फार्ममधील कामगारांपासून ते पोलिसांच्या नातेवाईकांच्या नावावर हे मोबाइल नंबर आहेत, अशी धक्कादायक माहितीही समोर आली आहे. ओळखपत्रे बनावट असताना आयोगाच्या पोर्टलवर मोबाइल क्रमांक कसे स्वीकारले गेले, याचाही तपास सुरू आहे.एन एसआयटीला भाजपचे माजी आमदार सुभाष गुत्तेदार यांच्या घराजवळ मतदारयाद्यांची कागदपत्रे जळालेली आढळली. पुरावे नष्ट करण्यासाठीच ही कागदपत्रे जाळली गेली असावीत, असा एसआयटीला संशय आहे. गुत्तेदार यांनी मात्र साफसफाई करताना नोकरांनी ही कागदपत्रे जाळली. याचा यादीतील घोळाशी संबंध नाही, असा दावा केला.

राधानगरी-कोकण राज्य मार्गावर मोटार झाडावर आदळून दोन ठार, दोघा जखमींवर कोल्हापुरात उपचार सुरू

राधानगरी-कोकण राज्य मार्गावर मोटार झाडावर आदळून दोन ठार, दोघा जखमींवर कोल्हापुरात उपचार सुरू कोल्हापूर-राधानगरी-कोकण या राज्य मार्गावर मोटारीच्या अपघातात दोन जण ठार, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.बुधवारी मध्यरात्री अभयारण्यातील शेळप-बांबर या गावादरम्यान मोटार झाडावर जाऊन धडकल्याने हा भीषण अपघात झाला. यामध्ये अनुराग अनुप सोनी (वय ३३, रा. सह्याद्रीनगर, सांगली) व अभिजित बापू कुंभार (४२, रा. मगरमच्छ कॉलनी गवळी गल्ली, सांगली) अशी जागीच ठार झालेल्यांची नावे आहेत, तर दोघा जखमींवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. सुरेश पूनमचंद शर्मा (वय ३२, रा. दत्तशीलनगर, सांगली) हे व अन्य एक अनोळखी गंभीर जखमी आहेत. अपघातात जखमी वाहनचालकाचे शिवाजी गायकवाड (सांगली) असेनाव आहे.Weather Update : पुढील तीन दिवस नाशिकसह घाट परिसराला यलो अलर्ट; हवामान विभागाचा इशारापुढील तीन दिवस हवामान विभागाने पुन्हा एकदा नाशिक जिल्हा आणि घाट परिसराला यलो अलर्ट जाहीर केला आहे.CM Siddaramaiah : राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या बेळगाव दौऱ्यावरLatest Marathi Live Updates 24 October 2025 : पुढील तीन दिवस हवामान विभागाने पुन्हा एकदा नाशिक जिल्हा आणि घाट परिसराला यलो अलर्ट जाहीर केला आहे. तसेच आगामी २०२८ ची विधानसभा निवडणूक माझे वडील आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या लढवणार नाहीत. मात्र, काँग्रेसच्या सिध्दांतावर चालणारे राज्यात अनेक राजकारणी आहेत. त्यांनी सतीश जारकीहोळी यांना पुढे नेले पाहिजे. सिद्धरामय्यांनंतर त्यांच्या जागेवर काम करण्याची ताकद सतीश जारकीहोळींमध्ये आहे आणि सतीश जारकीहोळी हेच सिद्धरामय्या यांचे वारसदार आहेत, असे परखड मत विधान परिषद सदस्य डॉ. यतींद्र सिद्धरामय्या यांनी केले. राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या शनिवारी (ता.२५) बेळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. कित्तूर (जि. बेळगाव) येथे सुरू असलेल्या ‘कित्तूर उत्सवाच्या’ समारोप समारंभात ते सहभागी होणार आहेत. कोल्हापूर-राधानगरी-कोकण या राज्य मार्गावर मोटारीच्या अपघातात दोन जण ठार, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी मध्यरात्री अभयारण्यातील शेळप-बांबर या गावादरम्यान मोटार झाडावर जाऊन धडकल्याने हा भीषण अपघात झाला. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी,

महागाईत आणखी घट होण्याचे संकेत

वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) कपातीचा दृश्य परिणाम ऑक्टोबर महिन्यातील वस्तूंच्या किमतीवर दिसेल.त्यामुळे किरकोळ महागाई निर्देशांक अर्धा टक्क्‌याच्या खाली येईल, असा अंदाज युनियन बँक ऑफ इंडियाच्या ताज्याअहवालात वर्तविण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात खाद्यान्नाच्या किमतीत चांगली घट पाहायला मिळत आहे. आजच्या तारखेअखेरीस महागाई निर्देशांक अर्धा टक्क्‌याच्या खाली आहे.येत्या हिवाळी हंगामात खाद्यान्नाच्या किमती उणे पातळीवर जातील, असेअहवालात म्हटले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये महागाई निर्देशांक ३.१ वरून २.६ टक्क्‌यांवर येईल. सप्टेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा किमती खाली आल्या आहेत. ग्राहक खाद्यान्न किंमत निर्देशांक उणे २.२८ टक्क्‌यांवर आला आहे. जून २०२५ पासून खाद्यान्न महागाई निर्देशांक उणे पातळीवर आहे.

You may have missed