प्रमोद शिंदे

नारायण दास रामदास प्राथमिक विद्यामंदिर इंदापूर येथे दीपावलीनिमित्त विविध उपक्रम

इंदापूर ( प्रतिनिधि )💐🏨🌹🏨👭👬👭👬आज दिनांक १९/१०/१९ श्री . नारायणदास रामदास प्राथमिकविद्यामंदिर प्रशालेत बालवाडी विभाग आणि इ. १ली ते ४थी विद्यार्थ्यांनी दिपावालीनिमित्त आयोजित विविध उपक्रमामध्ये सहभाग घेतला . बालवाडी मधील मुलांनी रांगोळी काढणे, रंगीत कागदाचे आकाशकंदिल 🏮बनविणे यात सहभाग घेतला . पहिलीच्या विद्यार्थ्यांनी विविध 🌷🌹🌸🌺फुलांचे हार स्वतः बनविले तर दुसरीच्या मुलांनी टाकाऊ📿 लेस,🎨 रंगीत खडे, डाळी अशा साहित्याचा वापर करत भेटकार्ड🧧 बनविण्याचा आनंद घेतला. इयत्ता तिसरी च्या विद्यार्थी वर्गाने जुन्या पणत्या रंगवून विविध साहित्य वापरून सजावट करुन त्या पणत्या नविन बनविल्या तसेच हार बनविण्याचा आनंद घेतला . इयत्ता ४ थी मुलींनी फुलांची रांगोळी रेखाटली आणि रंगीत आकाशकंदिल 🏮🏮स्वतः गोटीव कागदापासून तयार केले . अशाप्रकारे आज मुले विविध उपक्रमात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सहभागी झाले . शालेय सर्व सहकारी स्टाफने सहकार्य केले . सदर उपक्रमास मुख्याध्यपिका आगरखेड मॕडम यांनी मार्गदर्शन केले . 💐🏨👭👬🙏🏻🙏🏻

फोंडशिरस येथे पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या पेट्रोल टँकर च्या डिक्स टायर ची धाडशी चोरी

फोंडशिरस येथे पेट्रोल टँकर च्या डिक्स टायर ची धाडशी चोरी
नातेपुते (प्रमोद शिंदे) फोंडशिरस  तालुका माळशिरस येथे इंडियन ऑइल च्या बाणलिंग पेट्रोल पंप येथील पेट्रोल टँकरच्या डिक्स टायरची धाडसी चोरी करण्यात आली हकिकत आशिकी दिनांक 19 /10 /2019 रोजी रात्री बारा ते पहाटे सहा दरम्यान MH -AF45-1000 या पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या टँकरचे सात डिक्स सह टायर तसेच दोन बॅटऱ्या केबिन मधील इंजिन कव्हर जवळपास 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मुद्दामून लबाडीने चोरून त्याची तक्रार फिर्यादी महादेव सुखदेव बनकर राहणार फोंडशिरस यांनी नातेपुते पोलिसात फिर्याद दिली आहे. या घटनेचा तपास पोलीस नाईक राऊत करत आहेत. या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सद्या निवडणुकीचे वातावरण असून सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त तसेच ठिकठिकाणी पोलीस चौकी व सीसीटीव्ही कॅमेरे फोंडशिरस व नातेपुते परिसरात असून सुद्धा आशा धाडसी चोरी प्रकार होत आहे. याअगोदर दोन दिवसापूर्वी नातेपुते येथेही दोन घरफोड्या झाल्याचे उघड झाले आहे. सध्या निवडणूक तसेच दिवाळी जवळ आल्याने चोरांचं चांगलं फावत आहे. नेहमीच नातेपुते व परिसरात चोऱ्या होतात. तसेच चोऱ्यांचे प्रमाण ही वाढत आहे या चोरांवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे.

वंचित बहुजन आघाडीला पिरळे येथे प्रतिसाद

नातेपुते (प्रमोद शिंदे)- वंचित बहुजन आघाडी ला पिरळे येथे चांगला प्रतिसाद मिळाला असून तिसरा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजकुमार यांना पसंती देण्यात आली आहे. गाव भेटीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजकुमार यांनी पिरळे, कळंबोली ,पळस मंडळ येथे मतदारांच्या भेटी घेतल्या या भेटीदरम्यान पिरळे येथील दलित वस्ती तसेच इतर ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या त्यावेळेस मातंग समाज बौद्ध समाज तसेच मराठा समाज नाभिक समाज तसेच बहुजन समाजातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या या भेटीदरम्यान बहुजन आघाडी ला मतदान करण्याचे आव्हान राजकुमार यांनी केले यावेळेस सर्व समाजाने वंचित बहुजन आघाडी ला तिसरा पर्याय समजून पाठिंबा देण्याचं जाहीर केले आहे तसेच उमेदवार राजकुमार यांनी लोकांचा अडी-अडचणी जाणून घेतल्या व भविष्यात मी निवडून येऊ अथवा नयेऊ निश्चितच आपल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन दिले आहे. तसेच ते पुढे म्हणाले मी चळवळीचा कार्यकर्ता आहे व या तालुक्यातील नातेपुते परिसरात माझं शिक्षण झाला आहे आर एस एस च्या जातीवादी भीमा कोरेगाव दंगल सहभाग असणाऱ्या बाहेरचे उमेदवाराला मतदान करण्यापेक्षा माझ्यासारख्या गरीब कुटुंबातील उमेदवाराला मतदान द्या असे ते बोलत होते यावेळी उमेदवार राजकुमार सोनवणे, वंचित चे गायकवाड, आरपीआयचे राजेंद्र बल्लाळ, रामोशी समाज संघटनेचे अंकुश बुधावले ,मराठा समाज ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत जाधव ,माजी सरपंच माजी सरपंच सुनील माने ,नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते विष्णू भाऊ खंडागळे, मातंग समाज संघटनेचे राजेंद्र खिलारे ,तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

40 वर्ष सत्ता तुमच्याकडे होती तुम्ही गवत उपटले का ?अशी टीका शरद पवार यांनी मोहिते-पाटील यांच्यावर केली

40 वर्ष सत्ता तुमच्याकडे होती तुम्ही गवत उपटले का अशी टीका शरद पवार यांनी मोहिते-पाटील यांच्यावर केली
नातेपुते (प्रमोद शिंदे )-चाळीस वर्ष सत्ता तुमच्याकडे होती मग तुम्ही काय चाळीस वर्ष गवत उपटले का अशाप्रकारे शरद पवारांनी मोहिते-पाटलांना वरती हल्लाबोल केला माळशिरस विधानसभा निवडणूक उत्तम जानकर यांच्या प्रचार सभे निमित्त शरद पवार ची सभा अकलूज येथे आयोजित करण्यात आली होती या सभेत त्यांनी भाजप व मोहिते पाटील यांच्यावर हल्लाबोल केला ते म्हणाले की मला कुस्ती शिकू नका मी कुस्ती बोर्डाचा अध्यक्ष होतो हे लक्षात असू द्या हे लोक रात्री झोपेत सुद्धा शरद पवार, शरद पवार म्हणत असतील, मी जोपर्यंत कृषिमंत्री होतो तोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाची किंमत कमी होऊ दिली नाही पुढे होऊ देणार नाही हे लोक चार वर्षांपूर्वी समुद्रात शिवस्मारक व इंदू मिल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक करतो म्हणाले होते त्याचे भूमिपूजन हे केलं परंतु एक वीट सुद्धा लावली नाही. हे लोक किल्ल्यावरती छम छम करणार की काय किल्ल्यांना पर्यटन स्थळ करून हॉटेल उभारून शिवाजी महाराजांचा अपमान करत आहेत. एका फटक्यात आम्ही सरसकट कर्जमाफी केली होती अजूनही 70 टक्के लोकांच्या डोक्यावर कर्ज आहे. कर्जामुळे  शेतकरी आत्महत्या करताहेत. कारखाने उद्योगधंदे बंद पडून लोक बेरोजगार होत आहेत कोणाला टिकीट द्यायचं याचा केंद्रबिंदू अकलूज होतं आता ते राहिलेल नाही यावेळचा उमेदवार मी कधीही ऐकला नव्हता हनुमंत डोळस यांच्या मुलाला संधी होती परंतु त्याला संधी दिली नाही ही निवडणूक महत्त्वाची आहे ज्याला शेतकऱ्याचा दुःख कळत नाही त्यांना सत्तेवर ठेवायचं नाही अशा प्रकारची टीका त्यांनी केली यावेळी आमदार रामहरी रुपनवर म्हणाले पूजन केले राफेल हे विमान अफगाणिस्तानचे होते आपलं विमान एक वर्षांनी येणार आहे भाजपला एक ही योजना व्यवस्थित करता आली नाही. धवलसिंह मोहिते-पाटील म्हणाले की ज्यांनी आम्हाला कृष्णा भीमा स्थिरीकरणाचे गाजर दाखवले त्यांना आम्ही आता मुळा दाखवल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्याच्या पोराला बदाम घालून आपलं पोरगं पैलवान होणार आहे का? आमच्या तालुक्यात सुद्धा ऊसतोड कामगार आहेत .शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर पवार साहेबांन शिवाय पर्याय नाही अशी  टीका त्यांनी केली, तसेच बबनदादा शिंदे, उमेदवार उत्तम जानकर, सुभाष देशमुख, अविनाश काळे, बाळासाहेब धाइंजे ,किरण साठे ,आप्पा कर्चे यांनीसुद्धा भाजपवर हल्लाबोल केला यावेळी अजय सकट श्रीकांत शिंदे अण्णा शिंदे पंचक्रोशीतील राष्ट्रवादीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

नातेपुते-दहिगाव रस्ता देतोय मृत्यूला निमंत्रण* खड्ड्यांमुळे अपघातात मृत्यू झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार- एन डी एम जे*

नातेपुते दहिगाव रस्ता देतोय मृत्यूला निमंत्र
नातेपुते (प्रमोद शिंदे)- नातेपुते- दहिगाव हा रस्ता जणूकाही मृत्यूला निमंत्रण देत असल्याचं दिसून येत आहे कारण नातेपुते दहिगाव रस्त्यावरती खूप मोठे खड्डे पडले असून खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात होत आहेत. या अपघातात लोकांना मोठ्या प्रमाणात दुखापत होत आहे. या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होऊन एखाद्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो .रस्त्यामध्ये एक-एक दोन-दोन फुटाचे मोठे खड्डे पडले असून हे खड्डे व्यवस्थित बुजवले जात नाहीत वर्षातून दोन-तीन वेळा लाखो रुपयांचे टेंडर काढून या रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम तात्पुरत्या स्वरूपात केला जाते सध्या नातेपुते दहिगाव रस्त्याचं मोठ काम चालू आहे यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून काम पूर्ण होण्यास बराच कालावधी जाणार आहे परंतु सध्या रस्त्यामध्ये खड्डे पडले असल्याने सतत अपघात होत आहेत. या खाड्या संदर्भात संबंधित पीडब्ल्यूडी अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे तोंडी तक्रार केली असता तात्पुरते त्यांनी खड्डे भरण्याचे मोहीम हाती घेतली आहे. परंतु हे खड्डे मातीने भरले जातात त्यामुळे माती पाऊस पडल्यानंतर निघून जाणार आहे. पुन्हा  या ठिकाणी खड्डा पडून चिखल होऊन गाडीचा अपघात होऊ शकतो व त्या ठिकाणी एखादी व्यक्ती  प्राण गमवू शकते म्हणून हा रस्ता मृत्यूला निमंत्रण देत आहे जर या रस्त्यावरती अपघात होऊन एखाद्या व्यक्ती चा मृत्यू झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल जनतेतून होत आहे. तसेच लवकरात लवकर खडी आणि  डांबराने खड्डे भरले नाहीत तर पुरोगामी महाराष्ट्राचे प्रमोद शिंदे, प्रशांत खरात, एन.डी.एम.चे पश्चिम महाराष्ट्र सचिव  बाबासाहेब सोनवणे  व पदाधिकारी आंदोलन करून रस्त्यांमध्ये वृक्षारोपण करणार तसेच अपघात होऊन मृत्यू झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा  गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली

कार्यकर्त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचा माळशिरस पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात गेला पाहिजे…विकास दादा धाइंजे

कार्यकर्त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्याचा माळशिरस पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात गेला पाहिजे…विकास दादा धाइंजे

गणेश गायकवाड (तात्या) मौजे कारुंडे ता.माळशिरस जि. सोलापूर यांना शासनाच्या वतीने मिनी ट्रॅक्टर मिळाला याचे पूजन dr. कुमार लोंढे,संतोष माने,दादा जाधव,सचिन लोंढे यांच्या हस्ते संपन्न झाले
यावेळी प्रास्ताविक विशाल साळवे यांनी तर ऍडओकेट सुमित सावंत,धनाजी शिवपालक, एन डी एम जे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांनी मनोगत व्यक्त केले
यावेळी प्रमुख भाषणात बोलताना विकास दादा धाइंजे म्हणाले की माळशिरस तालुक्यात 127 ट्रक्टर बौद्ध, मातंग,चर्मकार, यांच्यासह विविध जातींच्या समूहांना मिनी ट्रॅक्टर ची योजना मिळवून देऊन कार्यकर्ते स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत आज त्यांची कुटुंब चांगल्या प्रकारे रोजगार मिळवत आहेत हा माळशिरस तालुका पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात घेऊन जाणे काळाची गरज आहे
यावेळी डॉक्टर कुमार लोंढे केेेेे रिपाई जिल्हा युवक संघटक महेंद्र गायकवाड सर, विशाल साळवे, ऍड .सुमित सावंत संपादक प्रमोद शिंदे ,उपसंपादक प्रशांत खरात, एन डी एम जे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय झेंडे, रंजीत कसबे दत्ता कांबळे ,विषाल झेंडे , सचिन झेंडे धनाजी ,शिव पालक संजय नवगिरे ,गोरख गायकवाड रवी झेंडे ,महादेव गायकवाड, गणेश गायकवाड , विशाल गायकवाड, शिवाजी साळे बाळासाहेब सावंत, धीरज सावंत, माळशिरस तालुक्यासह विविध तालुक्यातील फुले शाहू,आंबेडकर, अण्णाभाऊ यांच्या चळवळीतील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नातेपुते येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महा जनादेश सभा संपन्न *

 *नातेपुते येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महा जनादेश सभा संपन्न *

नातेपुते (प्रमोद शिंदे) माळशिरस विधानसभा उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ नातेपुते येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते .या सभेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की महाराष्ट्रात आमचे पैलवान तेल लावून आखाड्यात तयार आहेत परंतु समोर विरोधात पैलवान लढायला तयार नाहीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी निवडणूक चालू असताना बँकॉक ला फिरायला गेलेत राष्ट्रवादीची परिस्थिती अशी झाली आहे की आधे इधर जावो आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे अशी झाली आहे .सध्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक होण्याअगोदर हार मानली आहे त्यांनी जाहीरनाम्यात अवास्तव आश्वासने दिली आहेत परंतु वीस ते पंचवीस वर्ष मोदी ना कोणीही  हरवू शकत नाही. पंधरा वर्ष  काँग्रेस आणि राष्ट्रवादी  यांनी जनतेची दिशाभूल केली आहे पंधरा वर्षात त्यांनी केलेले काम  आणि आम्ही केलेल्या कामाची तुलना करा पाच वर्षात आमच्या वरती एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही  अशा प्रकारची टीका राष्ट्रवादी व काँग्रेस वरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच सिंह मोहिते पाटील बोलताना म्हणाले की आम्ही नातेपुते  महाळुंग अकलूज  नगरपंचायत झाली पाहिजे  याची मागणी केली होती  त्याचा मन दूर झाले आहे माळशिरस तालुक्यात विकासासाठी फडणवीस साहेबांनी भरपूर निधी दिला आहे तसेच कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना झाली पाहिजे  याचा पाठपुरावा  अनेक दिवसांपासून दादा करीत आहे  ते झाले पाहिजे पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या आहेत . उमेदवार राम सातपुते  म्हणाली की  विजय दादांचे विकास रेषा  पुढे नेण्याचा मी प्रयत्न करेन तसेच राष्ट्रवादीचे आभाळ फाटले आहे ठिगळ कुठे कुठे लावायचे याकडे त्यांनी लक्ष द्यावे असे ते बोलत होते. या सभेसाठी माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील,रणजितसिंह मोहिते पाटील आर पी आय चे  महात्मा फुले विकास महामंडळ अध्यक्ष  राजाभाऊ सरवदे, मदनसिंह मोहिते पाटील, खासदार रणाजितसिंह निंबाळकर, शिवामृत चे  चेअरमन धैर्यशील भैया मोहिते-पाटील, सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, बाबाराजे देशमुख ,सरपंच भानुदास राऊत ,हनुमंत सुळ किशोर सुळ ,मामासाहेब पांढरे, माऊली पाटील, पांडुरंग देशमुख ,तसेच भाजप व महायुतीतील अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब सरगर यांनी केले.

नातेपुते येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभेची ची जय्यत तयारी*

नातेपुते येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभेची ची जय्यत तयारी*
प्रमोद शिंदे ( नातेपुते )नातेपुते तालुका माळशिरस येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिनांक 10 ऑक्टोबर रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेचे जय्यत तयारी नातेपुते येथे सुरू करण्यात आली आहे. विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून राम सातपुते हे उमेदवार आहेत राम सातपुते यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या सभेचे नातेपुते येथील पालखी मैदान येथे पक्षाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे या तयारीसाठी स्वतः माजी खासदार रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी लक्ष घातले असून या तयारीसाठी शिवामृत संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील तसेच नातेपुते येथील सोलापूर जिल्हा माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख सरपंच भानुदास राऊत ,मामासाहेब पांढरे माऊली पाटील दादासाहेब उराडे ,व परिसरातील नेतेमंडळी स्वतः पालखी मैदान वरती सभेची तयारी करत असताना दिसून येत आहेत सभेच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे कमतरता भासू नये याची काळजी मोहिते पाटील कुटुंबीय व कार्यकर्ते घेत असल्याचे दिसत आहे. या सभेसाठी पोलीस प्रशासनाने सुद्धा बंदोबस्तासाठी कंबर कसली आहे या सभेसाठी बारामती एडिशनल एस.पी तसेच 2 डी.वाय.एसपी 12 अधिकारी व 170 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात असणार असल्याची सूत्रांकडून माहिती देण्यात आली

श्री शिवछत्रपती संस्थेने गरीब विद्यार्थिनीला दिला मदतीचा हात

श्री शिवछत्रपती संस्थेने गरीब विद्यार्थिनीला दिला मदतीचा
नातेपुते (वार्ताहर) : एकशिव येथील विद्यार्थिनी रूपाली दत्तात्रय खरात हे बारामती येथे एमएससी सेकंड ला इयरला शिकत असून घरी आर्थिक परिस्थिती नसल्याने व कॉलेजमध्ये शिकण्यासाठी लॅपटॉप ची गरज असल्याने ती अडचणीत होती हे अडचण श्री शिवछत्रपती सामाजिक बहुउद्देशीय संस्था गुरसाळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर या संस्थेच्या संचालकांनी सदर मुलीचे लॅपटॉप व इतर साहित्य तिला मदत म्हणून दिले व एक सामाजिक बांधिलकी जपली यावेळी संस्थेचे संचालक सचिन भोसले सुनील बोराटे दिपक झोडगे रवींद्र भोसले रोहित नवगिरे पांडुरंग केंगार राजेंद्र कोरटकर संजय डांगे इत्यादी उपस्थित होते

नातेपुते येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था यांच्यावतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात संपन्न

नातेपुते येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था यांच्यावतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात संपन्न
नातेपुते ( प्रमोद शिंदे )-नातेपुते तालुका माळशिरस येथे सालाबाद प्रमाणे याहीवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था  यांच्यावतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे ही आयोजन करण्‍यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत इतिहासकार सरुडकर सर होते सर बोलताना म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर अण्णा यांचा जवळचा संबंध होता. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण संस्था काढून बहुजनांचे मुले शिकवली तसेच कर्मवी भाऊराव पाटील, संत गाडगे महाराज ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,यांच्यात विचार सिंचन होते. तसेच यावेळी आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र सचिव एन के साळवे ,प्राध्यापक सुनील साळवेसर ,सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष विकास दादा धाईंजे, एन डी एम जे राज्य सचिव वैभव गिते, मिलिंद सरतापे, लतीफ भाई नदाफ, डॉक्टर कुमार लोंढे, आखाडे सर, आदित्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास पोपट साळवे ,मारुती सरगर, मारुती खांडेकर ,प्रकाश साळवे, विनोद रणदिवे, समीर सोरटे, गणेश गायकवाड, नरेंद्र भोसले, अरुण बोडरे, पत्रकार श्रीकांत बाविस्कर, बाळासाहेब बळवंतरावसर, अजित सातपुते, संघर्ष सोरटे, विशाल सोरटे, रंजीत कसबे नितीन मोरे ,प्रशांत खरात, गोरख साळवे ,प्रमोद भोसले ,वाळके सर, तसेच तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन आरपीआय युवकचे जिल्हा संघटक विशाल साळवे यांनी केले होते.

You may have missed