प्रमोद शिंदे

ऍड.जितेंद्र मन्द्रे साहेब यांचा आज कोरोना प्रादुर्भावामुळे दुःखद निधन, दुःखद निधनापूर्वी यापूर्वी पत्रकार प्रमोद शिंदे यांना केला होता व्हिडिओ कॉल

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ( प्रमोद शिंदे )दुःखद बातमी ऍड.जितेंद्र मन्द्रे साहेब यांचा आज कोरोना प्रादुर्भावामुळे दुःखद निधन झाले.ॲड.जितेंद्र मन्द्रे साहेब अत्यंत मनमिळावू व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती होते.माझे जवळचे निकटवर्ती मित्र होते.अनेक गरीब लोकांना त्यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली आहे व पीडितांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्याबाबत काल एक खूप खूप वाईट किस्सा घडला काल दिनांक 11 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 12:42 मिनिटांनी त्यांचा मला व्हिडिओ कॉल आला होता त्यावेळेस मी अश्विनी हॉस्पिटल नातेपुते डॉक्टर माधव लवटे यांच्या हॉस्पिटल ला होतो. त्यावेळेस मंद्रे साहेबांचा मला अचानक व्हिडिओ कॉल आला व्हिडिओ कॉल मध्ये त्यांच्या तोंडाला व्हेंटिलेटर लावलेला दिसत होता. त्यांना श्वास नाला व बोलायला त्रास होत होता.तरीदेखील त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉल करून ,त्यांना मला काहीतरी बोलायचे होते. परंतु त्यांचा आवाज व्हेंटिलेटर लावल्यामुळे येत नव्हता त्यांचा आवाज ऐकण्याचा मी खूप प्रयत्न केला.त्यांना मी विचारलं साहेब काय अडचण आहे.तुमच्या सोबत कोण आहे त्यांना फोन द्या मंद्रे साहेब फक्त माझं बोलणं ऐकत होते व मला बोलण्याचा प्रयत्न करत होते.परंतु नेटवर्कमुळे आमच्या दोघांचं संभाषण एकमेकांना कळू शकले नाही.त्यांना मला काहीतरी सांगायचं होतं त्यावेळेस मी अचानकपणे मोबाईल वरती हात फिरवला त्याचा स्क्रीन शॉट निघाला मी आणखीन एक स्क्रीन शॉट घेतला व त्यांना म्हणालो साहेब तुमच्याजवळ कोण असेल तर त्यांना मला फोन करायला सांगा परंतु हॉस्पिटलमध्ये नेटवर्क नसल्याने मी ही त्यांना बोलू शकलो नाही थोड्या वेळाने फोन करण्याचा प्रयत्न केला त्यांचा फोन लागला नाही. त्यानंतर माझे परममित्र दैनिक लोकमतचे वार्ताहर श्रीकांत उर्फ बापू बाविस्कर यांचा फोन झाला की पीडब्ल्यूडी चे कर्मचारी नातेपुते येथील रहिवाशी आमचे मित्र कन्हेरकर साहेब यांचं कोरोना ने दुःखद निधन झालं त्यांचाही नेहमी आमचं बसणे उठणे होते. त्यांची बातम्या ऐकताच वाईट वाटलं. बाविस्कर यांना त्यावेळी मी मंद्रे साहेबांचा हा किस्सा सांगितला व त्यांना म्हणालो मंद्रे साहेबांचा मला व्हिडिओ कॉल आला आहे.त्यांच्याजवळील कोण नातेवाईक असतील तर त्यांच्याशी संपर्क साधा व त्यांची काय अडचण आहे ते जाणून घ्या त्यांचा नंबर मेळावा आपण त्यांना संपर्क साधून ते हो म्हणाले व त्या नातेवाईकांना बापूंनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही.अखेर शेवटी आज सकाळी बातमी ऐकायला मिळाली मंद्रेसाहेब यांचे दुःखद निधन झाले.अत्यंत दुःख वाटले व डोळ्यात पाणी आले. शेवटच्या क्षणी आपल्याला व्हिडिओ कॉल केला ते काय सांगणार होते ते नेटवर्कमुळे कळालं नाही. त्यांना शेवटी मदत करू शकलो नाही हीच मोठी खंत मनाला लागून राहिली. साहेब तुम्ही शेवटपर्यंत आठवणीत राहाल.

ॲडव्होकेट मद्रे साहेब व कन्हेरकर साहेब यांना पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली- पत्रकार प्रमोद शिंदे*

टीप- नातेपुते व परिसरातील सर्व हितचिंतक मित्र परिवार तसेच नागरिकांना विनंती आहे की आता तरी जागे व्हा कोरोना ला सहज घेऊ नका स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या सुरक्षतेसाठी प्रशासन ज्या काही सूचना देत आहे त्या सूचनांचे पालन करा स्वतःची टेस्ट करून घ्या वेळीच योग्य तो उपचार घ्या मृत्यूच्या पुढे काहीच नाही आपण जगला तर काहीही करू शकतो आपली समाजाला व परिवाराला गरज आहे* -पत्रकार प्रमोद शिंदे पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवार *

एडवोकेट जितेंद्र मंद्रे साहेब यांचा शेवटचा पत्रकार प्रमोद शिंदे व्हिडिओ कॉल
मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व एडवोकेट जितेंद्र मंद्रे साहेब
पीडब्ल्यूडी चे कर्मचारी माननीय कै.कन्हेरकर साहेब यांना पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली

हिंगोली जिल्ह्यातिल क्वारंटाइन सेंटर मधिल रुग्णांच्या जेवणा मध्ये निघल्या आळ्या

हिंगोली जिल्ह्यातिल क्वारंटाइन सेंटर मधिल रुग्णांच्या जेवणा मध्ये निघल्या आळ्या…

राज्यातिल प्रत्येक क्वारंटाईन सेंटरमध्ये आन्नपरिक्षन समिती गठित करा…

नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस संघटनेचा आंदोलनाचा इशारा.
राज्यातिल प्रत्येक क्वारंटाईन सेंटरमध्ये आन्नपरिक्षन समिती गठित करा…

नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस संघटनेचा आंदोलनाचा इशारा.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क हिंगोली (मोहन दिपके) हिंगोली जिल्ह्यातिल क्वारंटाइन सेंटर मध्ये रुग्नांना देन्यात येनार्या जेवनामध्ये पांढर्या रंगाच्या मोठ्या अकाराच्या आळ्या निघाल्या सदर बाब ही गंभिर स्वरूपाची असुन रूग्नांच्या जिवनावर बेतनारी आहे, एकिकडे शासन प्रशासन स्तरावर कोरोना ग्रस्तांसाठी करोडो रूपये निधी खर्च केला जात आहे परंतु आसे आसतांना हिंगोली जिल्ह्यातिल रूगनांच्या जिवनाशी खेळल्या जात आहे, क्वारंटाईन सेंटरमध्ये देन्यात येनारे जेवन कंत्राटदारामार्फत आत्यंत निकृष्ट दर्जाचे देन्यात येत असुन सदर जेवनामध्ये आळ्या निघल्या आहेत म्हनुन सम्बंधित कंत्राटदारावर कठोर कार्यवाही करून गुन्हे नोंद करन्यात यावेत जेने करून इत्तर क्वारंटाईन सेंटर मध्ये जेवनाचा पुरवठा करनार्या कंत्राटदारांवर कायद्याचा धाक राहील व आशा प्रकारच्या अप्रिय घटना महाराष्ट्रामध्ये घडनार नाहित म्हनुन तात्काळ सम्बंधित कंत्राटदाराला पाठिशी न घालता त्यांच्यावर कठोर कार्यवाही व महाराष्ट्रातिल प्रत्येक क्वारंटाईन सेटरवर रूग्नांना देन्यात येनार्या जेवनावर आन्नपरिक्षन समिती गठित करावी आन्यथा महाराष्ट्रभर एन डि एम जे चर्या वतिने आंदोलन छेडन्यात येईल आशी मागनी नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस या सामाजिक संघटनेच्या वतिने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तहसिलदार औंढा नागनाथ यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली आहे सदरिल निवेदनावर नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस या सामाजिक संघटनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदिप वसंतराव दिपके जिल्हाध्यक्ष मोहन मदन दिपके जिल्हानिरिक्षक अ.हाफिज अ. हादी प्रसिद्धी प्रमुख उग्रसेन भिवसेन नवले युवाजिल्हाध्यक्ष पवनकुमार चंद्रभान ठोके जिल्हासंघटक विजय अनंता दिपके कचरू बळीराम चव्हान औंढा नागनाथ चे तालुकाध्यक्ष राजरत्न भगत, यशवंत पंडित, राहुल पुंडगे, करन ईंगोले, अनिल राउत, ईत्यादी पदाधिकार्यांच्या सह्या आहेत.

हिंगोली जिल्ह्यातिल क्वारंटाइन सेंटर मधिल रुग्णांच्या जेवणा मध्ये निघल्या आळ्या

हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथे अनोख्या पद्धतीने गाढव आंदोलन *

*हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथे अनोख्या पद्धतीने गाढव आंदोलन *

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क हिंगोली (मोहन दिपके) जवळा बाजार जिल्हा हिंगोली येथे भारतीय स्टेट बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँक व्यवस्थापक यांची खातेनिहाय चौकशीकरून निलंबित करा या मागणीसाठी
भीमशक्त संघटनेने अनोख्या पद्धतीने गाढव आंदोलन केले
गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय स्टेट बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील व्यवस्थापक हे दलालां कडून चिरीमिरी घेऊन व पुढार्यांच्या सांगण्यावरूनच विविध मागासवर्गीय महामंडळातील कर्ज प्रकरणे करत असून सामान्य माणसाना जाचक अटी लावून सतत टाळाटाळ करून दलालांच्या मार्फत अवैधरित्या मायपुंजी जमा करण्यात गुंग आहेत असा आरोप भीमशक्ती संघटना व नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस अध्यक्षांनी केली आहे. या आंदोलनात बँक व्यवस्थापक यांची खातेनिहाय सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे. बँक व्यवस्थापकांना त्यांनी चक्क गाढवाची उपमा देऊन “गाढव आंदोलन” जवळा बाजार एसबीआय बँक समोर करण्यात आले. सामान्य माणसाना अडथळा निर्माण व कामचुकारपणा केल्यास पुढील परिणामास बँक व्यवस्थापक जबाबदार राहतील याची असे भीम शक्ती युवा तालुका उपाध्यक्ष प्रमोद कुलदीपके यांनी सांगितले. मोर्चा त्यांच्या नेतृत्वात काढण्यात आला होता. या मोर्चास भीमशक्ती मराठवाडा उपाध्यक्ष मिलिंद मोरे, युवा जिल्हा अध्यक्ष विशाल इंगोले, , सागर दिपके, रवी दिपके,. नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस.NDMJ चे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष जगदीप दीपके, जिल्हा अध्यक्ष मोहन दिपके. व सर्व NDMJ टीम हिंगोली.सिद्धार्थ भारशंकर, सुमेध मुळे आशिष भैया परीहार, दिलीप भंडारे, अनिल भंडारे , संदीप कुलदीपके, , राहुल घोडके, अनुराधा किर्तन, राहुल वाळवंटे, विलास ठगे, बालाजी पवार, विवेक जमदाडे, जगन धबडगे, महेश कदम , संदीप सुर्यवंशी, काशिनाथ गायकवाड, आशाताई किर्तन, समीर शेख, अमोल सोनवणे, जगन धबडगे, भीमशक्ती सामाजिक संघटना ,नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस. संघटना व कार्यकर्ते करते उपस्थित होते

हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथे अनोख्या पद्धतीने गाढव आंदोलन *

सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याच्या मागणीसाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात चौत्यभूमी येथे रिपाइंने केली निदर्शने

सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याच्या मागणीसाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात चौत्यभूमी येथे रिपाइंने केली निदर्शने

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई दि.10 – लॉकडाऊन नंतर आता अनलॉक सुरू झाले आहे. राज्यात सर्व गाड्या; दुकाने;मॉल सुद्धा सुरू झाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या नियमांचे पालन करीत;सुरक्षित अंतर राखून सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करावीत या मागणी साठी आज मुंबईत चैत्यभूमी येथे केंद्रियराज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. खुली करा खुली करा चैत्यभूमी खुली करा अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री अविनाश महातेकर हे उपस्थित होते.
सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्यासाठी राज्यभर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले ) यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. त्या अंतर्गत आज मुंबईत चैत्यभूमी येथे आंदोलन करण्यात आले. चैत्यभूमी हा आंबेडकरी जनतेचा आत्मीयतेचा श्रद्धास्थान आहे. असे न रामदास आठवले म्हणाले.

अभिनेत्री कंगना राणावत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करू नये.मुख्यमंत्री हे एका पक्षाचे प्रमुख नसून ते राज्याचे प्रमुखआहेत. कंगना या दुखावलेल्या आहेत. त्यांना भेटून मी समजूत काढणार आणि त्यांना पाठिंबा देणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.

सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याच्या मागणीसाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात चौत्यभूमी येथे रिपाइंने केली निदर्शने

*अभिनेत्री कंगना राणावतच्या रक्षणासाठी आज मुंबई विमानतळावर रिपाइं कार्यकर्ते सज्ज राहणार – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)- दि. 8- अभिनेत्री कंगना राणावत या उद्या बुधवार दि 9 सप्टेंबर रोजी मुंबईत येत आहेत. त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संरक्षण देण्यासाठी रिपाइं चे कार्यकर्ते निळे झेंडे घेऊन मुंबई विमानतळ येथे दुपारी 12 वाजल्यापासून सज्ज राहतील. तसेच कंगना राणावत यांच्या घराला ही रिपाइं कार्यकर्ते संरक्षण देतील.असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी जाहीर केले आहे. कंगना राणावत यांनी नुकताच ना रामदास आठवले यांना दूरध्वनी द्वारे संपर्क साधून आपण महाराष्ट्राची भक्त असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे कंगना ला महाराष्ट्रद्रोही म्हणण्याचा कांगावा शिवसेने ने आता करू नये. अभिनेत्री महिला असणाऱ्या कंगणाला मुंबईत राहण्याचा अधिकार आहे.भारतीय राज्य घटने ने सर्वांना विचारस्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे कंगना च्या संरक्षणासाठी उद्या दि. 9 सप्टेंबर रोजी रिपाइं चे  राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर;  जिल्हा अध्यक्ष विवेक पवार ; सिद्धार्थ कासारे; किशोर मासुम  यांच्या नेतृत्वात रिपाइं कार्यकर्ते मुंबई च्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सज्ज राहणार आहेत अशी माहिती रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष विवेक पवार यांनी दिली आहे. 

 * * *अभिनेत्री कंगना राणावतच्या रक्षणासाठी आज  मुंबई विमानतळावर रिपाइं कार्यकर्ते सज्ज राहणार – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले* 

श्रीनिवास कदम-पाटील यांना कुस्ती-मल्लविद्या महासंघ यांच्यावतीने आदर्श कुस्ती प्रसारक पुरस्काराने सन्मानित.

कुस्ती-मल्लविद्या महासंघाच्या वतीने श्रीनिवास कदम-पाटील यांना आदर्श कुस्ती प्रसारक पुरस्काराने सन्मानित.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क माळशिरस ( )
मळोली तालुका माळशिरस येथील बारामती झटका चे संपादक श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील यांना आदर्श कुस्ती प्रसारक 20 20 पुरस्कार देऊन कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्याचे संघटक पैलवान सोमनाथ चव्हाण व राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते पैलवान राहुल वाघमोडे मित्र परिवाराच्या वतीने माळशिरस येथील बारामती झटका विभागीय कार्यालय येथे प्रशस्तीपत्र, मेडल, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी कुस्ती-मल्लविद्या गे माय भू फेडीन तुझे पांग सारे, आणीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे या ब्रीद वाक्यवर देशांमध्ये आणि देशाच्या बाहेर सातासमुद्रापार कुस्ती पोहोचवण्याचे काम या कुस्ती मल्लविदेच्या माध्यमातून केले जात आहे अशा कुस्ती क्षेत्रांमध्ये अग्रगण्य असलेल्या कुस्ती मल्लविद्या महासंघाकडून श्रीनिवास कदम पाटील यांना आदर्श कुस्ती प्रसारक 20 20 पुरस्कार देऊन सन्मानित केलेली आहे आज पर्यंत कुस्ती क्षेत्रख मध्ये केलेल्या कार्याची दखल घेऊन सदरचा पुरस्कार कुस्ती मल्लविद्या महासंघाचे संस्थापक पैलवान गणेश मानगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेला आहे सदरचा पुरस्कार दिल्यानंतर बारामती झटका परिवार यांच्यावतीने कुस्ती मल्ल विद्येच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आलेले आहेत.

कुस्ती-मल्लविद्या महासंघाच्या वतीने श्रीनिवास कदम-पाटील यांना आदर्श कुस्ती प्रसारक पुरस्काराने सन्मानित.

मुस्लिम समाजास शैक्षणिक क्षेत्रात तसेच नोकरीत 10% आरक्षण द्या.. मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

*मुस्लिम समाजास शैक्षणिक क्षेत्रात तसेच नोकरीत 10% आरक्षण द्या.. मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे (नातेपुते)-

आज मुस्लिम आरक्षण या मुद्द्यावर मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य तर्फे तहसील कार्यालय माळशिरस याठिकाणी निवेदन देण्यात आले त्यामध्ये मुस्लिम समाजाला १०% आरक्षण मिळावे, निवेदनात असे म्हटले आहे की महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाची राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक स्थिती झालेली आहे. संविधानातील कलम 15  व 16 नुसार  शिक्षण आणि सरकारी नोकरी मध्ये  आरक्षण देण्याची तरतूद आहे त्या तरतूदीनुसार मुस्लिम समाजास नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात 10%  आरक्षण देण्यात यावे अशा प्रकारची मागणी निवेदनाद्वारे   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. हे निवेदन माळशिरस तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले यावेळी मुस्लिम आरक्षण संघर्ष  समन्वय समिती महाराष्ट्र राज्या चे संस्थापक अध्यक्ष अमीर शेख, प्रदेशाध्यक्ष रशीद शेख, महाराष्ट्र राज्य  मीडिया प्रमुख सलमान शेख, शाहाबाज शेख माळशिरस तालुका अध्यक्ष सलिम मुलाणी.आदि उपस्थित होते.

मुस्लिम समाजास शैक्षणिक क्षेत्रात तसेच नोकरीत 10% आरक्षण द्या.. मुस्लिम आरक्षण समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिरळे येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांना अभिवादन

पिरळे येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांना अभिवादन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)-पिरळे तालुका माळशिरस येथे पिरळे ग्रामस्थांच्यावतीने आद्य क्रांतिवीर नरवीर  उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी पिरळे गावचे सरपंच ज्ञानदेव शिंदे, पोलीस पाटील औदुंबर बुधावले, हनुमंत बुधावले, बापूराव बुधावले सुदाम बुधावले, अंकुश बुधावले, प्रकाश मसुगडे, तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिरळे येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांना अभिवादन

साई सेवा दल ग्रुपच्या वतीने अण्णाभाऊ साठे स्मारकास सिमेंटचे बेंचभेट

साई सेवा दल ग्रुपच्या वतीने अण्णाभाऊ साठे स्मारकास सिमेंटचे बेंचभेट
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे) नातेपुते तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून साई सेवा दल ग्रुप व मामाश्री प्रतिष्ठान गुरु कर्चे व सोमनाथ भोसले यांच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक नातेपुते येथे सिमेंटचे बेंच भेट देण्यात आले. साई सेवा दल ही सामाजिक सेवाभावी संस्था आहे या संस्थेच्या वतीने व नातेपुते परिसरात अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात कोरोना काळात या संस्थेच्या वतीने गरजू लोकांना अन्नदानाचे सुद्धा वाटप करण्यात आले होते.तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास उत्कृष्ट दर्जाचा माइक डेक्स भेट देण्यात आला होता. साई सेवा दलाच्या वतीने नातेपुते परिसरात विद्यार्थी,रुग्ण यांनासुद्धा विविध प्रकारची मदत केली जाते ताई सेवादलाचे अध्यक्ष गुरु कर्चे व सोमनाथ भोसले यांनी सामाजिक बांधिलकी जपत अशा प्रकारचे उपक्रम हाती घेतले आहे व भविष्यात समाजातील गरजा ओळखून यापुढेही मदत करणार असल्याचे सांगितले यामुळे परिसरात या सामाजिक संस्थेचे कौतुक होत आहे.

साई सेवा दल ग्रुपच्या वतीने अण्णाभाऊ साठे स्मारकास सिमेंटचे बेंचभेट

निरोगी मानवी आरोग्या साठी सेंद्रीय शेती उपयुक्त — कृषीकन्या शुभांगी पोटफोडे

निरोगी मानवी आरोग्या साठी सेंद्रीय शेती उपयुक्त — कृषीकन्या शुभांगी पोटफोडे
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे) बांगार्डे येथील माळशिरस तालुक्यातील कु. शुभांगी गजानन पोटफोडे या कृषीकन्येने सेंद्रिय शेती हि काळाची गरज आहे याचे महत्व प्रात्यक्षिका द्वारे परिसरातील शेतकऱ्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय कराडच्या कु. शुभांगी गजानन पोटफोडे या विध्यार्थीनीने बांगार्डे येथील शेतकऱ्यांना पटवून दिले.त्याच प्रमाणे सेंद्रिय शेतीचे फायदे पुढील प्रमाणे सांगितले सेंद्रिय शेती ही काळजी गरज आहे..आजच्या काळात सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यामुळे माणसाच्या शरीराला लागणारी पोषक तत्वे मिळू शकतील. जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होऊ शकते. केमिकल युक्त शेतीने मानवाचे आरोग्य धोक्यात आले आहे. सेंद्रिय शेतीमधील पिकांमध्ये शरीराला आवश्यक असणारे घटक उपलब्ध होऊ लागले आहेत. सध्याच्या वाढत्या कोरोनामुळे आरोग्याचे महत्त्व मानवास पटू लागले आहे.शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असल्यास सेंद्रिय शेतीमध्ये पिकवलेल्या भाजीपाला, धान्य व फळांचा वापर होणे गरजेचे आहे.. रासायनिक ( केमिकल युक्त ) खते वापरून माणसाने मधुमेह,( शुगर), रक्तदाब,.थायरॉईड, हृदयविकार, पोटाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीचे क्षेत्र कमी झाल्याने शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर करून शेतीचे व मानवी जीवनाचे नुकसान केले आहे.. शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे जमिनीचा कस निघून गेला आहे. यासाठी सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. तसेच उपस्थित शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधानकारक निवारण केले.त्याच बरोबर शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया, चारा प्रक्रिया, खत व्यवस्थापन, जनावरांचे लसीकरण आदींवर प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली.
या वेळी श्री.अण्णा लक्ष्मण बडे, सौ.संगीता अण्णा बडे, श्री.गजानन लक्ष्मण पोटफोडे, सौ.अनिता गजानन पोटफोडे, श्री.प्रशांत पंढरीनाथ मोहिते सौ.सुशीला कैलास मेटकरी इत्यादी शेतकरी उपस्थित होते. कु.शुभांगी गजानन पोटफोडे या कृषीकन्येने येणाऱ्या काळात सेंद्रिय शेती विषयी जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला. परिसरातील शेतकऱ्यांनी हा उपक्रम राबवल्या बद्धल या कृषी कृषीकन्येचे भरभरून कौतुक केले. यावेळी या विद्यार्थिनीला शासकीय महाविद्यालय कराड चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. आर. सूर्यवंशी कार्यक्रम अधिकारी इंजि. एम. एस. पाटील! आणि कार्यक्रम समन्वयक डॉ. डि. एस. नावडकर डॉ. एस. एस. कोळपे आणि डॉ. ए.एम. चवई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

You may have missed