निरोगी मानवी आरोग्या साठी सेंद्रीय शेती उपयुक्त — कृषीकन्या शुभांगी पोटफोडे

निरोगी मानवी आरोग्या साठी सेंद्रीय शेती उपयुक्त — कृषीकन्या शुभांगी पोटफोडे
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे) बांगार्डे येथील माळशिरस तालुक्यातील कु. शुभांगी गजानन पोटफोडे या कृषीकन्येने सेंद्रिय शेती हि काळाची गरज आहे याचे महत्व प्रात्यक्षिका द्वारे परिसरातील शेतकऱ्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय कराडच्या कु. शुभांगी गजानन पोटफोडे या विध्यार्थीनीने बांगार्डे येथील शेतकऱ्यांना पटवून दिले.त्याच प्रमाणे सेंद्रिय शेतीचे फायदे पुढील प्रमाणे सांगितले सेंद्रिय शेती ही काळजी गरज आहे..आजच्या काळात सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यामुळे माणसाच्या शरीराला लागणारी पोषक तत्वे मिळू शकतील. जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होऊ शकते. केमिकल युक्त शेतीने मानवाचे आरोग्य धोक्यात आले आहे. सेंद्रिय शेतीमधील पिकांमध्ये शरीराला आवश्यक असणारे घटक उपलब्ध होऊ लागले आहेत. सध्याच्या वाढत्या कोरोनामुळे आरोग्याचे महत्त्व मानवास पटू लागले आहे.शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असल्यास सेंद्रिय शेतीमध्ये पिकवलेल्या भाजीपाला, धान्य व फळांचा वापर होणे गरजेचे आहे.. रासायनिक ( केमिकल युक्त ) खते वापरून माणसाने मधुमेह,( शुगर), रक्तदाब,.थायरॉईड, हृदयविकार, पोटाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीचे क्षेत्र कमी झाल्याने शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर करून शेतीचे व मानवी जीवनाचे नुकसान केले आहे.. शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे जमिनीचा कस निघून गेला आहे. यासाठी सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. तसेच उपस्थित शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधानकारक निवारण केले.त्याच बरोबर शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया, चारा प्रक्रिया, खत व्यवस्थापन, जनावरांचे लसीकरण आदींवर प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली.
या वेळी श्री.अण्णा लक्ष्मण बडे, सौ.संगीता अण्णा बडे, श्री.गजानन लक्ष्मण पोटफोडे, सौ.अनिता गजानन पोटफोडे, श्री.प्रशांत पंढरीनाथ मोहिते सौ.सुशीला कैलास मेटकरी इत्यादी शेतकरी उपस्थित होते. कु.शुभांगी गजानन पोटफोडे या कृषीकन्येने येणाऱ्या काळात सेंद्रिय शेती विषयी जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला. परिसरातील शेतकऱ्यांनी हा उपक्रम राबवल्या बद्धल या कृषी कृषीकन्येचे भरभरून कौतुक केले. यावेळी या विद्यार्थिनीला शासकीय महाविद्यालय कराड चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. आर. सूर्यवंशी कार्यक्रम अधिकारी इंजि. एम. एस. पाटील! आणि कार्यक्रम समन्वयक डॉ. डि. एस. नावडकर डॉ. एस. एस. कोळपे आणि डॉ. ए.एम. चवई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.