पुणे येथे एन.डी.एम.जे च्या वतीने राज्यस्तरीय महिला नेतृत्व विकास व कायदेविषयक कार्यशाळा संपन्न

पुणे येथे एन.डी.एम.जे च्या वतीने राज्यस्तरीय महिला नेतृत्व विकास कार्यशाळा संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( पुणे )नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस एन.डी.एम.जे यांच्या वतीने, राज्य महासचिव ऍड.केवलजी उके व राज्य सचिव वैभवजी गिते यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रांतवाडी पुणे येथे राज्यस्तरीय महिला नेतृत्व विकास व महिलांसाठी कायदेविषयक प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या शिबिराचे आयोजन राज्य महिला संघटक पंचशीला ताई कुंभारकर यांनी केले होते.या शिबिरात अनेक दिग्गज वकील व सामाजिक कार्यकर्ते यांनी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. तसेच ऍड.विद्याताई लोखंडे यांनी कोरोना प्रादुर्भाव काळात महिलांवर कशाप्रकारे अत्याचार झाले आहेत व महिलांवर होणारे कौटुंबिक हिंसाचार यावर मार्गदर्शन केले.तर ऍड.असुंता ताई पारधे यांनी कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी च्या तरतुदी प्रशिक्षणादरम्यान सांगितल्या, प्राध्यापिका सौ महानंदा डाळिंबी ताई यांनी कोरोना काळात वाढलेले जातीय अत्याचाराचे प्रमाण व त्याचे कारणे याविषयी मार्गदर्शन केले. राज्य प्रसिद्धी प्रमुख संपादक प्रमोद शिंदे यांनी ॲट्रॉसिटी ॲक्ट व एफ.आय.आर मधील त्रूटी विषयी विषयी मार्गदर्शन केले.ऍड.हर्षद भोसले यांनी भारतीय समाज व्यवस्थेमधील सद्यस्थिती चालू असलेल्या घडामोडी व दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शनकेले. या कार्यक्रमास स सचिन वाघमारे,महानंदाताई डाळिंबे,सुनंदाताई साळवे, मंदाकिनी भोसले, संजीवनी सिरसाठ, शकील सावंत,रश्मी रंगारी,
तुकाराम जेटीथोर, मधुकर हरिभक्त,
अमोल माने, रक्षा तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचशीला ताई कुंभारकर यांनी केले.सदर कार्यक्रम सोशल डिस्टन्स नियम पालन करण्यात अले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सम्यक बुद्ध विहार येथील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

.ऍड.आसमंत ताई पारधे महिलांना महिलांच्या कायद्यातील तरतुदी सांगताना
एडवोकेट विद्याताई लोखंडे प्रशिक्षणादरम्यान महिलांना कायदेविषयक माहिती देताना
एन डी एम जे प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे एफ आय आर मधील त्रुटी विषय मार्गदर्शन करताना
एन डी एम जे च्या महिला राज्य संघटक पंचशीला ताई कुंभारकर महिलांना मार्गदर्शन करताना
प्राध्यापिका महानंदा ताई डाळिंबे कोरणा प्रादुर्भाव काळामध्ये महिलांवर झालेल्या अन्याय अत्याचार या संदर्भात मार्गदर्शन करताना
प्रशिक्षणादरम्यान मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते