आंतरराष्ट्रीय

बाबाराजे देशमुख यांच्या एकसष्टी निमित्त ५०० जणांना मोफत लस दिली जाणार-मालोजीराजे

बाबाराजे देशमुख यांच्या एकसष्टी निमित्त 500 जणांना मोफत लस दिली जाणार-मालोजीराजे
      पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

नातेपुतेत 500 जणांना दिले जाणार मोफत लस
ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बाविस्कर यांची विद्युत वितरण ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मालोजीराजे देशमुख मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला
सामाजिक बांधिलकी ठेवून सामाजिक उपक्रम घेतल्याबद्दल पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवार व महाराष्ट्र पत्रकार संघ तसेच नातेपुते पत्रकारांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते मालोजीराजे देशमुख यांचा सत्कार करण्यात आला
बाबाराजे देशमुख यांचे चिरंजीव एस एन डी टी संस्थेचे चेअरमन मालोजीराजे देशमुख
लसीकरण संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते मालोजीराजे देशमुख

:-नातेपुते येथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष.शहाजीराव मुधोजीराव तथा बाबाराजे (दादा) देशमुख  यांचा १४ ऑगस्ट रोजी ६१ वा वाढदिवस असून त्या निमित्ताने ज्या गरीब व गरजू  व्यक्तींना लस मिळाली नाही अशा ५०० व्यक्तींना लस देवून हा सामाजिक उपक्रम पार पडणार आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते मालोजीराजे देशमुख यांनी एक बैठक घेऊन यासंदर्भात माहिती दिली. बोलताना ते म्हणाले की ज्या लोकांना अजून लस दिली नाही आशा ५००लोकांना दादा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण स्वखर्चाने ५०० लोकांना मोफत लसीचा पहिला डोस देणार आहोत त्या लसीची किंमत ७०० रु असून या लसीकरण या पाठीमागचा उद्देश एकच आहे की गरीब लोकांपर्यंत लस पोहोचली पाहिजे तसेच कोरणा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत महत्त्वाच्या आहेत.त्यासाठी अनेक ठिकाणी अशा प्रकारे स्वयंप्रेरणेने लसीकरण व्हावे इतर संस्था संघटनांनी सुद्धा अशा प्रकारचे लसीकरण घ्यावेत तसेच ते पुढे म्हणाले ज्यांना लसीकरणाला लसीकरण केंद्रावर आजारामुळे येतायेतनही अशांना घरी जाऊन सुद्धा लस दिली जाणार आहे. हा सामाजिक उपक्रम दाते प्रशाला, नातेपुते येथे १० ते ०३ या वेळेत होणार आहे. लसीकरणासाठी वयोमार्यादा १८ वर्षे ते ६० वर्षे अशी राहणार आहे.लस देताना पुरुष व महिला यांना स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था केलेली आहे. लसीकरणासाठी नाव देण्यासाठी मोबाइल नं. ७९७२००९०९० प्रवीण राऊत व ९३०७६८१०९६ संदीप ननवरे यांच्याकडे नाव नोंदणीसाठी संपर्क करावी. १३ तारखेपासून संचारबंदी लागू होणार असल्यामुळे इतर कोणतेही उपक्रम गर्दीमुळे होणार नाहीत.नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड असणे गरजेचे आहे. लस घेण्यापूर्वी प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्यात येणार आसून याचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे आवाहन मालोजीराजे देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन केले. तसेच समाज हितासाठी सामाजिक उपक्रम घेतल्याबद्दल पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवार व महाराष्ट्र पत्रकार संघ तसेच नातेपुते पत्रकारांच्या वतीने मालोजीराजे देशमुख यांचा सत्कार करण्यात आला तसेच मालोजीराजे देशमुख मित्र परिवाराच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बाविस्कर यांची महाराष्ट्र विद्युत वितरण ग्राहक निवारण आयोग समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी मालोजीराजे देशमुख मित्र मंडळाचे मालोजीराजे देशमुख, धनाजीराजे देशमुख, विश्वजीत पिसाळ, प्रवीण राऊत, संजय पवार ,संदीप ननावरे, सिकंदर मुलानी केतन पलंगे,रवींद्र ननवरे सचिन उराडे रेणुका पतसंस्थेचे सचिव नारायणराव बोराटे व पत्रकार बांधव उपस्थित होते. 

दलित अत्याचारा विरोधात कॉँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे संसद घेराव महमोर्चा आंदोलन

दलित अत्याचारा विरोधात कॉँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे संसद घेराव महमोर्चा आंदोलन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संदेश भालेराव भारतातील अनुसूचित जाती-जमाती या जातिभेदाने ग्रसीत आहेत. नुकतेच घडलेले दिल्ली येथील ९ वर्षीय दलित मुलीचे सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरण असेल किंवा उत्तर प्रदेश – हाथरस येथील १९ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार आणि देशात दररोज घडत असलेल्या हत्या, बलात्कार, जाळपोळ किंवा सामूहिक हल्ले. यावरून देशात अनुसूचित जाती-जमाती या मोदी सरकारच्या काळात सुरक्षित नसून या विरुद्ध एकजूट होण्या करिता तसेच अॅट्रॉसिटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी करीता दिनांक १२ ऑगस्ट २०२१ रोजी अखिल भारतीय कॉँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री ना.डॉ. नितीन राऊत यांच्या नेतृत्वात दिली येथील जन्तर मंतर येथे संसद घेराव महमोर्चा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चाला संबोधित करण्याकरीत अखिल भारतीय कॉँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस ना. प्रियंका गांधी या उपस्थित राहणार आहेत.

अखिल भारतीय कॉँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मा.मनोज बागरी यांनी राष्ट्रीय आकडेवारीवर प्रकाश टाकत असे म्हटले की, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग अहवाल २०१४-१५ पान क्र.१५६/१५७ नुसार अनुसूचित जाती जमातीवरील अत्त्याचाराची राष्ट्रीय स्थिती जर बघितली तर वर्ष २०१४ मध्ये भांदवी सह अॅट्रॉसिटी अंतर्गत दोष सिद्धीचे एकूण प्रमाण २८.२ टक्के, निर्दोष सुटकेचे प्रमाण ७१.२ टक्के, प्रलंबित खटले १,२५,९५२, वर्ष २०१३ च्या तुलनेत ५० टक्के वाढ झाल्याचे दिसते. यामध्ये वर्ष २०१९ मध्ये ४५९३५ यावढे गुन्हे दाखल असून भारतीय जनता पक्षाचे सरकार असलेले राजस्थान, मध्यप्रदेश आणि बिहार हे अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत असे त्यांनी सांगितले.

अनुसूचित जाती जमातीवरील अत्याचारांचे मागील दहा वर्षातील प्रमाण हे वाढत असल्याचे अॅट्रॉसिटी कायद्याचे तज्ञ तथा पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संचालक एड. डॉ. केवल उके यांनी म्हटले आहे. हे सांगत असताना महाराष्ट्र राज्यातील अन्याय-अत्याचारच्या प्रकरणाची त्यांनी दिलेल्या आकडेवारी नुसार मे २०२१ पर्यंत तपासावर प्रलंबित एकूण गुन्हे ८२१, न्यायालयत प्रलंबित खटले १३०८७ आणि वर्ष २०२१ मध्ये मे अखेर पर्यंत एकूण दाखल गुन्हे २५७४ आहेत. मागील पाच वर्षात वर्ष निहाय दाखल गुन्हे जर बघितले तर , वर्ष २०१६ मध्ये एकूण दाखल गुन्हे २१५९, २०१७-२१५४, २०१८-२५०१, २०१९-२७१५, २०२०-३२५० एवढे आहेत. मागील ५ वर्षा मध्ये भांदवी सह अॅट्रॉसिटी कायदया अंतर्गत दोष सिद्धी चे एकूण प्रमाण ७ टक्के आहे. निर्दोष सुटकेचे प्रमाण ९३ टक्के तर ८७ टक्के खटले प्रलंबित आहेत. राज्याच्या गृह मंत्रालया नुसार वर्ष २०१५ मध्ये दलित महिलावरील बलात्काराच्या ३३१ घटना आणि खुनाच्या ९७ घटना नोंद आहे. वर्ष २०११-२०१६ मध्ये तेरा जिल्ह्यात एकूण ८६९८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे तर दलित मानवाधिकार कार्याकार्त्यावरील हल्ल्या मध्ये वाढ होत असल्याचे सांगितले.
अखिल भारतीय कॉँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र राज्यअध्यक्ष मा. विजय अंभोरे यांनी या हल्ला बोल मोर्च्यात राज्यातून अनुसूचित जाती विभागाचे हजारो पदाधिकारी जात असल्याचे सांगितले. राज्यातील संपूर्ण दलित समाज अन्याय अत्याचारच्या प्रश्नावर एकजूट असल्याचे दाखवून देण्याकरिता दलित समाजाच्या सामाजिक, उद्योजक, डॉक्टर, वकील, विद्यार्थी आणि कामगार अशा सर्व संस्था-संघटना यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देवून जास्तीत जास्त संखेने हजर राहण्याचे आव्हाहण केले.

कल्याण येथे कवी मधुकरजी घुसळे यांच्या स्मृति निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संदेश भालेराव –कल्याण येथे महाकवी कालकथित मधुकरजी घुसळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन..

“सोनियाची उगवली सकाळ…” या भिमगीताचे गीतकार महाकवी कालकथित मधुकरजी घुसळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित वालधुनी- कल्यान येथे आयोजित ‘निखळला तारा..’ या कार्यक्रमा निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांना “महाकवी मधुकरजी घुसळे समाजभूषण” पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. मुख्य आयोजक आयु.संदीप घुसळे यांनी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आयु.सुरेश घोडेराव यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन केले होते.
याकार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना एन.डी.एम.जे. संघटनेचे राज्यमहासचिव डॉ. केवलजी उके साहेब् यांनी “दिवंगत मधुकरजी घुसळे यांनी लिहिलेली अनेक सांस्कृतिक व बुद्ध-भीमगीते ही महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वामनदादा कर्डक, प्रल्हाद शिंदे आणि आनंद शिंदे यांनी गाईली आहेत. या गीतांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सांस्कृतिक चळवळीचा वारसा जपण्याचे कार्य त्यांनी केले आहे, त्यांचे नाव हे नक्कीच आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल” असे म्हटले.

यावेळी एन.डी.एम.जे. संघटनेचे मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष आयु.बंदेश सोनावणे व प्रदेश सचिव आयु.शशिकांत खंडागळे, ठाणे जिल्हा अध्यक्ष आयु.विजय कांबळे, जिल्हा सचिव आयु.विनोद रोकडे, जिल्हा सहसचिव आयु.सुनील ठेंगे, जिल्हा उपाध्यक्ष आयु.संतोष बनसोडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आयु.संदेश भालेराव, कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष एड. प्रविण बोदडे, कल्याण ग्रामीण अध्यक्ष आयु नितेश गायकवाड इत्यादी उपस्थित होते.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या सदस्यपदी श्रीकांत उत्तम बावीस्कर यांची नियुक्ती


         पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या सदस्यपदी श्रीकांत उत्तम बावीस्कर यांची निवड करण्यात आली.श्रीकांत बाविस्कर हे नातेपुते परिसरातील बापू म्हणून परिचित असून गेली वीस वर्ष ते ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेवर काम करीत आहेत.ते सध्या सोलापूर जिल्ह्याचे ग्राहक मंचाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत.तसेच त्यांनी सोलापूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद या शासकीय कमिटीवर सहा वर्षापासून व अशासकीय सदस्य म्हणून काम करत आहे.त्यांनी अनेक वर्ष दैनिक लोकमत, पुढारी या दैनिकात काम केलेआहे.सध्या ते दैनिक शिवनिर्णयचे पत्रकार म्हणून काम करीत आहेत. तसेच ते लक्षवेध न्यूज चॅनेलचे संपादक तसेच महाराष्ट्र पत्रकार संघ सोलापूर जिल्हा अध्यक्ष आहेत. त्यांची महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या सदस्यपदी  २८ जुलै रोजी नियुक्ती झाली असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.श्रीकांतबावीस्कर नियुक्ती झाल्यानंतर म्हणाले की ग्राहकांच्या तक्रारी ऐकून त्यांची सोडवणूक करणे तसेच आदेशाचे पालन न केल्यास संबंधिताला प्रति दिवशी ६०० रुपयांपासून १ लाख रुपये दंड करण्याचे अधिकार या पदावरील व्यक्तीला असतात या पदाचा लोकांच्या हितासाठी न्याय मिळवून देण्यासाठी वापर करीन.या मंचचे सदस्यपद हे शासकीय पद आहे. या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.त्यांच्या निवडीबद्दल एन.डी.एम जे चे राज्य महासचिव आंतरजातीय विवाह कायदा मसुदा समिती सदस्य  ऍड डॉ केवलजी उके, आमदार राम सातपुते, माजी आमदार रामहरी रुपनवर, धैर्यशील मोहिते-पाटील, एन.डी.एम.जे चे राज्य सचिव वैभव गिते, संपादक प्रमोद शिंदे,सरपंच सौ कांचनताई  लांडगे,उपसरपंच अतुल पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य,भाजपचे तालुकाध्यक्ष प्रवीण काळे.इत्यादींनी अभिनंदन करून सत्कार केला.

राज्यात कृषी विभागाच्या वतीने पिक स्पर्धेचे आयोजन, कृषीअधिकाऱ्यांकडून स्पर्धेत शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)-कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील खरीप हंगाम 2021 साठी जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी अर्ज सादर करून पीक स्पर्धेसाठी सहभागी व्हावे, पिकस्पर्धेसाठी पिकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल. खरीप हंगामासाठी स्पर्धेतील समाविष्ट पिके – भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल अशी एकूण 11 पिके समाविष्ट आहेत. प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या- सर्वसधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 आहे. पीकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे शेतावर त्या पिकाखाली किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पीकस्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील. तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या – सर्वसाधारण गटासाठी 5 व आदिवासी गटासाठी 4. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. प्रवेश शुल्क- सर्व गटासाठी पीकनिहाय प्रत्येकी 300 रूपये रक्कम. अर्ज दाखल करण्याची तारीख – मूग व उडिद पीक – 31 जुलै. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल – 31 ऑगस्ट 2021 पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहीत नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले शुल्क चलन, 7/12, 8 अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पूर्तता करून कृषी कार्यालयात द्यावे. तालुका पातळीवर पीकस्पर्धा विजेत्यांसाठी पहिले 5 हजार, दुसरे 3 हजार व तिसरे 2 हजार रूपये. जिल्हा पातळीवरील पहिले 10 हजार, दुसरे 7 हजार व तिसरे 5 हजार रूपये इतके तर विभाग पातळीवर पहिले 25 हजार, दुसरे 20 हजार व तिसरे 15 हजार रूपये त्याचबरोबर कृषी राज्य पातळीवरील 50 हजार, दुसरे 40 हजार व तिसरे 30 हजार रूपये इतके बक्षीस असेल. पीक स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडलकृषी आधिकारी नातेपुते श्री सतीश कचरे व कृषि पर्यवेक्षक  नातेपुते श्री उदयसिंह साळूंखे व श्री गोरख पांढरे व कार्यालयातर्फे करण्यात आले.

एन.डी.एम.जे.संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटून दिले विविध मागण्यांचे निवेदन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संदेश भालेराव मुंबई,- दिनांक २६ जुलै २०२१: नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे.) संघटनेच्या शिष्टमंडळाने आज रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम श्री.भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेवून राज्यामध्ये अनुसूचित जाती व जमाती यांच्यावर वाढत्या अत्याचारा संदर्भात प्रमुख १० मागण्यांचे निवेदन देऊन मुख्यमंत्री कार्यालय, ग्रुह विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, विधी व न्याय विभाग, नोडल अधिकारी इत्यादी संबंधित मंत्रालयाचे मंत्री व संबंधित विभागाचे अधिकारी यांना आपल्या स्तरावरून निर्देश देण्याची विनंती केली.
महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जाती व जमाती यांच्यावर होणाऱ्या अत्याचारात वाढ झालेली आहे, मात्र कोरोना आणि टाळेबंदी या परिस्थितीमध्ये अनुसूचित जाती व जमाती वर झालेल्या अत्याचाराच्या प्रश्नावर विशेष लक्ष देण्यात आलेले नाही, असे दिसते. सदर अनुषंगाने काही मूलभूत धोरणात्मक मुद्द्यावर शिष्टमंडळाने महामहिम राज्यपाल यांच्या सोबत चर्चा करून अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) सुधारित अधिनियम व नियम २०१५ याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच कायदया अंतर्गत मूलभूत धोरणात्मक १० मुद्द्यांवर सरकारने निर्णय घेण्या संदर्भात निवेदन दिले.

निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समिती स्थापन करणे, राज्य समन्वय अधिकारी (नोडल अधिकारी) नियुक्ती करणे, राज्यातील ऍट्रॉसिटी कायदया अंतर्गत दाखल सर्व खून प्रकरनातील मयत व्यक्तिच्या वारसांना शासकीय नोकरी, जमीन व पेन्शन देऊन तात्काळ संपूर्ण पुनर्वसन करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यातील ४३६६५ खेड्यां मध्ये दलित-आदिवासी याना सुरक्षा देण्याकरीता स्वतंत्र विशेष पोलिस पथकांची स्थापना करणे, राज्य आकस्मिकता योजना (कन्टीजेन्सी प्लान) यास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री महोदयांनी मान्यता देवून मंजूर करणे, राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांची तत्काळ नियुक्ती करणे, मा. सर्वोच्च न्यायालयाने “आरुमुगम सरवई वि. ”तामिळनाडू राज्य या खटल्यात दिलेल्या निर्देश तत्वांची प्रभावी अंमलबजावणी करणे, पीडिताच्या मागणीनुसार विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करणे तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक व आर्थिक विकासाच्या योजनाची अंमलबजावणी आणि दुरुस्त्या संदर्भात मागण्यांचा समावेश आहे.

ऑफर फक्त स्टॉक असेपर्यंतच तर चला मग साई गारमेंट ला आताच भेट द्या

यावेळी राज्य महासचिव ऍड.केवल उके यांनी दिंनाक १० फेब्रुवारी २०२० रोजी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या तिन सदस्यांच्या संवैधानिक खंडपीठाचे जस्टिस अरुण मिश्रा, जस्टिस विनीत सरन आणि जस्टिस एस.रविन्द्र भट यांनी दिलेल्या निकाला नुसार गुन्हा दाखल करण्यापूर्वी वरिष्ठ पोलिस अधिक्षक दर्जाचा अधिकाऱ्याने पूर्वचौकशी करण्याची काहीही गरज नाही. सरकारी अधिकाऱ्याला अटक करण्या आधी नियुक्ती अधिकारी किंवा इतर आरोपी करिता पोलिस अधिक्षकाची परवानगी घेणे आवश्यक नाही. तसेच एट्रोसिटी च्या गुन्ह्यात न्यायालय अटकपूर्व जामिन देवू शकत नाही असे निर्देश देण्यात आले आहेत तसेच केंद्र शासनाने संशोधित अधिनायम २०१८ पारित करून कलम १८-अ या कलमचा समावेश करून कुठल्याही न्यायलयाचा कोणताही निकाल असला तरीही अटकपूर्व जामीन देता येणार नाही असे म्हटले आहे. परंतु अजूनही न्यायालय हे सर्रास अटक पूर्व जामीन मंजूर करत आहे किंवा या तरतूदिला बगल देण्या करीता ततपुरता अन्तरिम जामीन देवून अर्ज अनेक महीने प्रलंबित ठेवला जातो. सदर बाब ही अत्यंत गंभीर असून राज्यातील न्यायालईन यंत्रणेस योग्य निर्देश देण्याची मागणी राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांच्या कडे केली असता त्यांनी सकारात्मक निर्देश देण्याचे आश्वासन दिले.

शिष्टमंडळाने महामहिम राज्यपाल यांना भारतीय संविधानाचे प्रास्ताविकेची प्रतिमा, बुद्ध आणि त्यांचा धम्म व डॉ.बाबासाहेब आंबेडकर याचे पुस्तक भेट दिले. सदर शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे एड.अनिल कांबळे, राज्यसचिव मा.वैभव तानाजी गिते, उद्योजक आयु. विनोद जाधव, मा. दिक्षा जगताप, मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष मा.बंदिश सोनावणे, राज्य सहसंघटक मा. शरद शेळके आणि ठाणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मा.संदेश भालेराव हे सर्व उपस्थित होते.

राज्यपालश्री भगतसिंग कोश्यारी यांना निवेदन देताना एनडीएचे शिष्टमंडळ
अन्याय अत्याचाराच्या बाबत राज्यपालांशी चर्चा करताना डॉक्टर एडवोकेट केवल उके साहेब
राज्यपाल सोबत चर्चा करताना एन डी एम जे चे शिष्टमंडळ

ॲड.डॉ.केवल उके यांची महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या “राज्य स्तरीय मार्गदर्शक समिती” सदस्यपदी निवड

ॲड.केवल उके यांची महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या “राज्य स्तरीय मार्गदर्शक समिती” सदस्यपदी निवड

ॲड.केवल उके यांची महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या “राज्य स्तरीय मार्गदर्शक समिती” सदस्यपदी निवड

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –मुंबई दिनांक २५ जुलै २०२१: महिला व बालविकास मंत्री माननीय ॲड.यशोमतीताई ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या “राज्य स्तरीय मार्गदर्शक समिती” मध्ये नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव ॲड.डॉ.केवलजी उके यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. समाजातील दुर्बल घटकांच्या विकासाचे प्रश्न, धोरण, कायदे, विकासाचे उपक्रम व सध्या सुरू असलेल्या योजनांचा सखोल अभ्यास करून त्याची अंमलबजावणी करण्याचे कार्य या समितीद्वारे करण्यात येणार आहे. दिनांक २३ जुलै २०२१ रोजी याबाबतचा शासननिर्णय महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने पारित केला आहे.

ॲड.डॉ.केवलजी उके यांची यापूर्वी सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने “आंतरजातीय विवाह कायदा मसुदा समिती” व अत्याचार पीडितांच्या पुनर्वसनासाठी असलेल्या “राज्य आकस्मिकता योजना समिती” या दोन समित्यांवर नियुक्ती केलेली आहे तसेच ते पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चे संचालक हे आहेत. ऍड.केवलजी उके यांच्या सखोल अभ्यासामुळे व अनुभवामुळे शासनास नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात आज पर्यंत बरीच मदत झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्रालयीन समितीवर त्यांची नियुक्ती झाल्याने राज्यातील दुर्बल,गोरगरीब, जनतेस मोठा दिलासा मिळाला आहे.

ॲड.केवलजी उके यांचा जनसंपर्क राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात असून क्रियशील व रचनात्मक काम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करते. अशावेळी गावागावातील सामान्य जनतेचे प्रश्न ॲड.केवलजी उके हे मंत्रालयीन बैठकांमध्ये मांडून जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी स्वतःचे सामाजिक कौशल्य पणाला लावतील व समाजातील महिला, बालके आणि दुर्बल घटकांन न्याय मिळवून देतील अशी माहिती नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे.) या संघटनेचे राज्य सचिव मा.वैभव तानाजी गिते यांनी दिली आहे.

करंजविहिरे दुहेरी हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश व एन.डी.एम.जे संघटना यांच्यात चर्चा

करंजविहिरे दुहेरी हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश व एन.डी.एम.जे संघटना यांच्यात चर्चा

करंजविहिरे आदिवासी ठाकर समाजातील युवकांचे दुहेरी हत्याकांडास पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी स्वतः भेट देऊन तपासाचा आढावा घ्यावा….वैभव गिते

करंजविहिरे दुहेरी हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश व एन.डी.एम.जे संघटना यांच्यात चर्चा करून निवेदन देण्यात आले
खेड तालुक्यात आदिवासी दुहेरी हत्याकांड कुटुंबास भेट न देणाऱ्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा वैभव गिते यांची मागणी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत साहेब यांच्याशी चर्चा करणार करताना शिष्टमंडळ

खेड तालुक्यात आदिवासी दुहेरी हत्याकांड कुटुंबास भेट न देणाऱ्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा वैभव गिते यांची मागणी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-बाळू सीताराम गावडे व राहुल दत्तात्रय गावडे या तरुनांची प्रेमप्रकरनातून अतिशय क्रूरपणे हत्या केली आहे.ही घटना माणुसकीला काळिंबा फासणारी असून या आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी पिंपरी चिंचवड चे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त श्री.कृष्णप्रकाश यांची नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली 14 कायदेशीर मागण्यांचे निवेदन दिले.पोलीस आयुक्त श्री.कृष्णप्रकाश यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस विभागास दिले.
दत्तात्रय दशरथ गावडे ठाकरवस्ती आसखेड खुर्द ता.खेड जि पुणे यांच्या फिर्यादीवरून चाकण जि पुणे पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 17 जुलै 2021 रोजी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची फिर्याद नोंदवली असून त्यानुसार चाकण पोलीस स्टेशन गुन्हा रजी नंबर 843/2021 भा.द.वि.302,307,341,143,147,148,149,अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नियम 1995 संशोधित अधिनियम 2015 मधील कलम 3 (1)आर,एस, 3(2)5 नुसार गुन्हा दाखल आहे.तपास सहाय्यक पोलीस आयुक्त चाकण विभाग चाकण, हे तपास करीत आहेत.
बाळू सीताराम गावडे व राहुल दत्तात्रय गावडे या तरुनांची अतिशय क्रूरपणेव हत्या केली आहे.ही घटना माणुसकीला काळिंबा फासणारी असून या आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी खालील कायदेशीर मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करावी.
1)पोलीस आयुक्त श्री कृष्णप्रकाश यांनी घटनास्थळी स्वतः भेट देऊन सर्व परिस्थितीजन्य पुरावे हस्तगत करून सर्व प्रकारच्या पंचनाम्यांचे पंच गृह विभागाच्या शासन निर्णया नुसार शासकीय घ्यावेत.
2)गुन्ह्याचा सर्व तपास विशेष पोलीस महानिरीक्षक (नागरी हक्क संरक्षण)महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या परिपत्रकानुसार व एट्रॉसिटी कायद्यातील तरतुदीनुसार व्हिडीओ रेकॉर्डिंग करून करावा
3)आरोपींना मदत करणाऱ्याना सहआरोपी करावे.
4)आरोपींना कट करून दोन युवकांची हत्या केली असल्याने कट करण्याचे 120 ब आणि हे कलम वाढवण्यात यावे.
5)आरोपींची ब्रेन मॅपिंग चाचणी,नार्को टेस्ट,व इतर चाचण्या कराव्यात व तांत्रिक पुरावा पुढे आणावा.
6)फिर्यादी व महत्वाचे साक्षीदार यांचे crpc 164 नुसार प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्याकडे जबाब घ्यावेत.
7)फिर्यादी व साक्षीदार यांच्याबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करून प्रत्येकास खटला संपेपर्यंत पोलीस संरक्षण देण्यात यावे.
8)अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नियम 1995 च्या कलम 7 (2) नुसार सर्व आरोपींची स्थावर जंगम मालमत्ता जप्त करण्यात यावी.
9)ही घटना गंभीर असल्याने अनुसूचित जाती आयोग पुणे निगडी प्राधिकरण व दिल्ली यांना अहवाल पाठवण्यात यावा.
10)पोलीस महासंचालक यांच्या 1 सप्टेंबर 2018 च्या परिपत्रकानुसार दोषारोपपत्र मे.विशेष न्यायालयात दाखल करण्यापूर्वी परिक्षेत्रीय पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण यांच्याकडे दोषारोप पत्राची गुणवत्ता तपासण्यासाठी पाठवून त्यांनी सांगितलेल्या त्रुटींची पूर्तता करूनच दोषारोपपत्र मे.विशेष न्यायालयात दाखल करावे.
11)गुन्हा दाखल झाल्यानंतर मा.पोलीस अधीक्षक/पोलीस आयुक्त यांचा तपासाबाबतचा आदेश दोषारोप पत्रात समाविष्ट करावा.
12) व मयत बाळू सीताराम गावडे व पूजा बाळू मरगर यांना 16 जुलै रोजी आरोपींनी मुरबाड जि.ठाणे येथील घरातून जबरदस्तीने चार चाकी गाडीमध्ये टाकून आणले होते.हे आमच्या ओळखीच्या नातेवाईकांनी व इतरांनी पाहिले आहे.त्यांचे जबाब तात्काळ घेऊन आरोपींचे मोबाईल cdra व sdra टावर लोकेशन घेऊन मुरबाड ला जाताना व येताना आरोपींच्या सोबत कोण कोण होते.आरोपी त्यावेळी कोणाच्या सोबत होते याचा तपास होणे खूप महत्त्वाचा आहे.यानुसार आरोपींनी केलेला कट व अपहरण हे दोन्ही गुन्हे सिद्ध होतील.यावर कार्यवाही करावी.
12)किरण अशोक सप्रे यास आरोपींनी मयत बाळू गावडे व पूजा बाळू मरगज यांना मुरबाड वरून आणण्यासाठी घेऊन गेले होते. त्यानंतर किरण सप्रे हा आजअखेर पर्यंत मिळून आलेला नाही याचाही तपास करावा.किरण सप्रेचा जबाब घ्यावा.व त्याचेही मोबाईल टावर लोकेशन घ्यावे.इत्यादी मागण्यांचे निवेदन नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे)संघटनेच्या वतीने देण्यात आले. यावेळी राज्य सचिव वैभव तानाजी गिते ,रिपाइंचे राज्य सचिव हरेषभाई देखणे,फिर्यादी दत्तात्रय दशरथ गावडे एन.डी.एम.जे राज्य महिला संघटक पंचशीला ताई कुंभारकर,राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे,पश्चिम महाराष्ट्रात निरीक्षक दादासाहेब जाधव,सोलापूर उपाध्यक्ष रविंद्र झेंडे,माणिक कर्णे, प्रकाश पारदासनी,नवनाथ भागवत,प्रणव भागवत,नितिन गायकवाड, आसिफ शेख,ऍड. सोनवणे, मधुकर हरिभक्त हे उपस्थित होते.

चाकण वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत त्यांना निवेदन सादर करताना राज्य सचिव वैभव गिते हरी पाहिजे सचिव हा हरीशभाई देखणे यांच्यासह एन डी एम जे टीम

दहावीच्या बोर्ड परीक्षेत कु. जिकरा सिकंदर मुलाणी हिचे घवघवीत यश

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)-माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संलग्राने 2020-21 दहावी शालांत परीक्षा नुकतेच लागलेल्या निकालात पुणे बोर्डात श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील प्रशाला नातेपुते कु. जिकरा सिकंदर मुलाणी नातेपुते हिने 93% टक्के गुण मिळवून विद्यालयातील गुणवंत यादी प्रथम क्रमांकाचा मान पटकावला आहे याबाबत शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेच्या वतीने व राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब व राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य महासचिव माजी राज्यमंत्री मा.बाळासाहेब दोडतले यांनी यांनी फोन वरून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या  तसेच या यशाबद्दल नातेपुते परिसरातील अनेक सामाजिक राजकीय शैक्षणिक वर्गातून व मुलाणी परिवारासह सर्व नातेवाईक कडून शुभेच्छा व कौतुक होत आहे

पँथर किरण बनसोडे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या वाढदिवसा निमित्त कोरोना योद्धा पुरस्कार व सन्मान चिन्हं प्रदान करण्यात आले

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क माण, दि.१८पॅंथर मा.किरण विठ्ठल बनसोडे(सातारा जिल्हा कार्याध्यक्ष) यांच्या वाढदिवसानिमित्त भालवडी ता.माण येथील आयोजित कार्यक्रमात माण तालुका अध्यक्ष पॅंथर मा.प्रमोद लोखंडे, सातारा जिल्हा संघटक पॅंथर मा.अनिरूध्द खरात, माण तालुका उपाध्यक्ष पॅंथर मा.दिपक बनसोडे, मा.सरपंच स्वप्निल सावंत युवा कार्यकर्ते पॅंथर मा.देवा बनसोडे, म्हसवड शहर उपाध्यक्ष पॅंथर मा.विक्रम लोखंडे व सर्व सातारा जिल्हा, माण तालुका कार्यकर्ते यांच्या नियोजनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय अध्यक्ष पॅंथर मा.बाळासाहेब पडवळ साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पॅंथर मा.डाॅ.घनश्याम भोसले, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पॅंथर मा.महेश गायकवाड, मा.विश्वास मोरे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष, सातारा जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण काकडे, सातारा जिल्हा संपर्कप्रमुख पॅंथर मा.विराज भोसले व महाराष्ट्रातील सर्व केंद्रीय व राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी कोरोना काळात ज्या ज्या कोरोना योध्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता लोकांचे प्राण वाचवण्यासाठी असामान्य कार्य केले त्यांना “कोरोनायोध्दा पुरस्कार” व “सन्मान चिन्ह” देउन सन्मानित केले. त्यावेळी पॅंथर मा.विक्रम चव्हाण यांना सातारा जिल्हा युवक सहअध्यक्ष, पॅंथर मा.गणेश देवकुळे यांना माण तालुका सल्लागार, पॅंथर महादेव अवघडे यांना माण तालुका कार्याध्यक्ष, पॅंथर मा.स्वप्निल भोकरे यांना माण तालुका युवक अध्यक्ष, पॅंथर मा.सुनील माने यांना माण तालुका उपसंघटक पदी नियुक्ती करण्यात आले. दलीत पॅंथर संघटनेचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रासह देशात उसळला आहे त्यामुळे सर्वसामान्य व गोरगरीब जनतेवर जिथे जिथे अण्याय होईल तिथे तिथे दलीत पॅंथर संघटना पोहचेल व अन्याय मोडून काढून जनतेला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही” असे प्रतिपादन दलीत पॅंथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.डाॅ.घनश्याम भोसले यांनी केले तर आम्ही एकटे आलो नसून पॅंथर पद्मश्री मा.नामदेव ढसाळ साहेबांचा वारसा व समाजकार्याचा विचार सोबत घेऊन आलो आहोत त्यामुळे जिथे अन्याय होईल तिथे दलित पॅंथर संघटना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य दलीत पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.बाळासाहेब पडवळ यांनी केले. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मा.कविता बोंडे (प्रदेश अध्यक्षा महिला), मा.अंकुश आवाडे (पुणे जिल्हा अध्यक्ष), मा.आकाश डबकरे ( पुणे जिल्हा उपाध्यक्ष ),
मा.अमित बगाडे (संघटक पुणे जिल्हा),मा.सुनिता गायकवाड (पुणे जिल्हा अध्यक्षा महिला)
मा.डाॅ.रूपाली भोसले, मा.गौरव अहिवळे (बारामती तालुका अध्यक्ष), मा.शांतनू साळवे (बारामती तालुका कार्याध्यक्ष),
मा.शिवदास जगताप (सरचिटणीस बारामती तालुका),
मा.शुभम गायकवाड (बारामती शहर अध्यक्ष), सुरेश कांबळे( सामाजिक कार्यकर्ते) तसेच सातारा जिल्हा आणि माण तालुका कार्यकर्ते व जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वच मान्यवरांनी तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व जनसमुदाय यांनी सातारा जिल्हा कार्याध्यक्ष पॅंथर मा.किरण बनसोडे यांना वाढदिवसाच्या व उदंड आयुष्याच्या भरघोस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची धुरा युवा कार्यकर्ते प्रदिप तुपे यांनी सांभाळली तसेच आभार प्रदर्शन सातारा जिल्हा संघटक पॅंथर मा.अनिरूध्द खरात खुटबावचे मा.सरपंच स्वप्निल सावंत यांनी केले.