सोलापूर

नातेपुते ग्रामपंचायतीने 15 टक्के निधीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले

पँथर संघर्ष सोरटे यांनी गरिबांच्या चुली पेटवल्या

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –कोरोना कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी शासनाने लॉकडाऊन ची घोषणा करून अंमलबजावणी सुरू केल्याने महाराष्ट्रतील गरीब,होतकरू,कष्ट करी मागासवर्गीय कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.येणाऱ्या काळात लोक कोरोना ने कमी पण उपासमारीने जास्त मरतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
परंतु आंबेडकरी चळवळीचे जेष्ट नेते माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास (दादा) धाइंजे व नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभवजी गिते साहेब यांनी परिस्थिचे गांभीर्य ओळखून तात्काळ माळशिरस तालुक्याचे गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीचा 15 टक्के निधी हा मागासवर्गीयांना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यासाठी वापरावा अशी मागणी केली गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी मान्यता देऊन सर्व ग्रामपंचतीस 15%निधी जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मागासवर्गीय कुटुंबाना वाटावा असे आदेश काढले, परंतु नातेपुते ग्रामपंचायतीने जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपात कोणतेही पाऊल उचलत नाही असे पँथर संघर्ष सोरटे यांच्या निदर्शनास येताच रिपाइंचे शहर अध्यक्ष संघर्ष सोरटे यांनी ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडे पाठपुरावा करून निवेदन देऊन सामाजिक कौशल्य वापरून जीवनावश्यक वस्तू चे किट प्रत्येक मागासवर्गीय गरीब कुटुंबांपर्यंत पोहचवले.
हा पाठपुरावा करत असताना पँथर संघर्ष सोरटे यांना
रिपाइंचे नेते एन.के साळवे यांचे मार्गदर्शन मिळाले त्याचबरोबर विशाल साळवे, विनोद रणदिवे,समित सोरटे,वैभव सोरटे,राकेश सोरटे,राहुल सोरटे,विशाल सोरटे यांची साथ मिळाली यावेळी पाचशे कुटुंबीयांना लुंबिनी बुद्ध विहार येथे किट वाटप करण्यात आले यावेळी नातेपुते गावचे सरपंच ऍड.डी.वाय राऊत, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मामासाहेब पांढरे उपसरपंच सुनंदाताई दादासाहेब उराडे ,ग्रामपंचायत सदस्य अण्णा पांढरे, भारत सोरटे, महावीर साळवे, इत्यादी उपस्थित होते.
जनतेवर उपासमारीची वेळ येताच संघर्ष सोरटे यांनी दाखवलेले धाडस केलेला पाठपुरावा पाहून नातेपुते शहरातील व पंचक्रोशीतील जनता संघर्ष सोरटे यांचे कौतुक करून आभार मानत आहेत.
संघर्ष सोरटे यांनी गरिबांच्या चुली पेटविल्या अशी चर्चा घराघरात सुरू आहे.

पिंपरीत 15 टक्के निधीतून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ….

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -मौजे पिंपरी ता.माळशिरस जि.सोलापूर येथे ग्रामपंचायतिच्या 15 टक्के निधीतून मागासवर्गीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप झाले.एकूण 42 कुटुंबांना बाराशे रुपयांचे एक महिना पुरेल एवढे एक किट देण्यात आले.
आंबेडकरी चळवळीचे जेष्ट नेते माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे,वैभव तानाजी गिते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी मनसेचे जिल्ह्याचे नेते आप्पासाहेब करचे,भटक्या विमुक्त संघटनेचे अर्जुन सरगर,ग्रामसेवक करे भाऊसाहेब,पोलीस पाटील,संजय झेंडे,रणजित कसबे,गणेश गायकवाड,विशाल झेंडे,विशाल गायकवाड, संभाजी साळे,नवनाथ भागवत उपस्थित होते.

गुरसाळे येथील कोरनटाईन केलेल्या युवकांनी निर्माण केला आदर्श

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे) गुरसाळे ता. माळशिरस येथील कोरनटाईन केलेल्या युवकांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.गुरसाळे जी.प.प्राथमिक शाळा या ठिकाणी कोरनटाईन केलेल्या गुरसाळे गावच्या रविंद्र महादेव झेंडे, नितीन भिमदेव चव्हाण, प्रवीण कुमार झेंडे, दत्तात्रय मल्हारी रणदिवे हे पेंटिंग चे काम करतात कोरन टाईन केल्यानंतर करायचं काय?वेळ कसा?घालवायचा हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा होता त्यांनी शाळेच्या इमारतीकडे पाहिले व शाळेचे इमारत खराब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी शाळेला रंग देण्याचे ठरवले यांनी त्यांच्या कलर कामातील अनुभव शाळेच्या रंग रंगोटी साठी स्वतःहून उपयोगात आणला.ग्रापंचायत गुरसाळे,शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक स्टाफ,ग्रामस्तरिय कृती समिती आणि गावातील दानशूर लोकांनी वर्गणी करून रंग व इतर साहित्य दिले आणि या चार युवकांनी रंगकाम सुरू केले. त्यांच्या या स्वयंस्फूर्तीने कामाचे सर्वत्र स्तरातून कौतुक होत आहे.

गुरसाळे येथील कोरन टाईन केलेले युवक जिल्हा परिषद शाळेत स्वयंस्फूर्तीने रंग देताना

उपविभागीय ( प्रांत) अधिकारी शमा पवार यांच्यावर कारवाई करा- ऍड सुमित सावंत

उपविभागीय ( प्रांत) अधिकारी शमा पवार यांच्यावर कारवाई करा- ऍड सुमित सावंत
नातेपुते (प्रमोद शिंदे): उपविभागीय अधिकारी शमा पवार यांनी मॉकड्रीलच्या नावाखाली मौजे कोळेगांव हद्दीतील दुपडेवस्ती येथे कोरोना संक्रमित रूग्ण आढळल्याचे पत्र काढून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याने त्यांचेसह संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते एड. सुमित राजू सावंत यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

दिनांक 06/05/2020 रोजी माळशिरस विभागाच्या उपविभागीय अधिकारी शमा पवार यांनी क्र.कार्या/अ-2/जबाबी/कावि/556/2020 या पत्रान्वये मौजे कोळेगांव हद्दीतील दुपडेवस्ती येथे एक कोरोना संक्रमित रूग्ण आढळला असून त्यास सोलापूरातील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्यामुळे तेथून 5 किमीचा परिसर बफर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याचा आदेश पारित केला होता. दरम्यान सदरचे व्हायरल झालेले पत्र कार्यालयाच्या लेटरपॅडवर प्रसिध्द झाले असून या पत्रावर उपविभागीय अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहे. त्यामुळेच संपूर्ण जिल्ह्याची धास्ती वाढली होती. मात्र सदरचा प्रकार दुपारनंतर डेमो असल्याचे समजले. परंतु जगभरातील कोरोनाचे वाढते रूग्ण व त्याचे बळी वाढत असताना व सर्वसामान्य माणसांमध्ये कोरोना बद्दल धास्ती असताना अशा प्रकारची अफवा प्रशासनाद्वारेच पसरवून सर्वसामान्य जनमाणसांत भीतीसह असुरक्षिततेची भावना वाढविल्याने लोक भयभीत झाले. वास्तविक पाहता असा आदेश काढून मॉकड्रील घेऊन सामान्य जनतेत भीती व अफवा पसरविण्यास योग्य वातावरण निर्माण करणे कितपत योग्य आहे? असा संतप्त सवाल सूज्ञ नागरिकांतून विचारला जात आहे. त्याचबरोबर सध्या कोरोना व इतर सारीसारख्या जीवघेण्या महाभयंकर रोगांची साथ सुरू असताना व केंद्रासह महाराष्ट्र शासनाचे कोरोनासह अशा रोगांवर चुकीची कमेंट करणे, अफवा पसरविणे हे गुन्हा आहे व हे करू नये असे सुस्पष्ट सक्तीचे आदेश असताना उपविभागीय अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणे सदर आदेशांना केराची टोपली दाखवली. त्याचबरोबर संदर्भीय आदेश सोशल मिडीयावर व्हायरल करून जनतेत असुरक्षिततेची भावना निर्माण करून त्यांच्यामध्ये दहशत निर्माण केल्याने एड. सुमित सावंत यांनी या प्रकाराचा, घटनेचा जाहीर निषेध केला. तसेच समाजात चुकीचा संदेश जाण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या संबंधित सर्वच अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची लवकरात लवकर सखोल चौकशी करून यामध्ये दोषी आढळणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी एड. सुमित सावंत यांनी केली आहे.

उपविभागीय प्रांत अधिकारी शमा पवार यांनी विषाणू संक्रमित पेशंट सापडले चे लेखी काढलेले पत्र
ऍड सुमित सावंत यांनी मा जिल्हाधिकारी यांना प्रांताधिकारी शमा पवार मॅडम यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात दिलेले निवेदन

*वाढत्या अत्याचराबाबत उपाययोजना करण्यासाठी वैभव गिते यांनी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांची भेट घेऊन निवेदन केले सादर*

*वाढत्या अत्याचराबाबत उपाययोजना करण्यासाठी वैभव गिते यांनी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे  यांची भेट घेऊन निवेदन केले सादर*


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -लॉकडाऊन असतानासुद्धा सोलापूर जिल्ह्यातील बौद्ध,मातंग यांच्यासह दलित समाजावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार वाढला आहे.सर्व आरोपींवर कारवाई करण्यासाठी आज माळशिरस येथे अप्पर पोलीस अधीक्षक (add.sp) मा.अतुल झेंडे यांची आंबेडकरी चळवळीचे जेष्ट नेते व माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे व नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांनी भेट घेतली व निवेदन देऊन चर्चा केली 
अतुल झेंडे यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज मा.नीरज राजगुरू यांना दिले.
कोणावरही अन्याय होऊ देणार नाही आरोपींवर कडक कारवाई केली जाईल अशी ग्वाही उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिली 
यावेळी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय झेंडे व माळशिरस तालुका अध्यक्ष दत्ता्ा कां उपस्थि होो.







एन डी एम जे राज्य सचिव वैभव गिते व विकास दादा म्हणजे उपाधिक्षक अतुल झेंडे यांना निवेदन देताना
योग्य तपास करून न्याय देण्याचे आश्वासन मा.डीवायएसपी नीरज राजगुरू यांनी दिले

पोलीस आणि नागरिक यांच्या अडचणी समजावून घेण्यासंदर्भात नातेपुते येथे उपधिक्षक अतुल झेंडे यांची भेट*

* पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नातेपुते (प्रमोद शिंदे )-सध्या सर्वत्र कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत या अनुषंगाने आज नातेपुते येथे पोलीस आणि नागरिक यांच्या अडचणी समजावून घेण्यास संदर्भात नातेपुते येथे सोलापूरचे ग्रामीण पोलीस उपधीक्षक अतुल झेंडे यांनी भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला बोलताना ते म्हणाले की माळशिरस तालुका हा कोरणा मुक्त आहे. नागरिकांनी जशी आत्तापर्यंत साथ दिली आहे इथून पुढे दिली तर निश्चितच आपण कोरोना थांबवू शकू तसेच माळशिरस तालुक्यातील जनतेचे त्यांनी अभिनंदन केले. पुढे बोलताना ते म्हणाले की पंचेचाळीस दिवसापासून पोलीस बांधव रस्त्यावर आहेत पोलिसांवर ताण वाढत आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये 2400 पोलीस व 150 अधिकारी मनुष्यबळ आहे. पोलिसांवर वाढत्या ताणाचा त्यांच्या शरीरावर परिणाम होत आहे हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी होमिओपॅथी औषध, क्लोरोक्वीन,मल्टीविटामिन च्या गोळ्या तसेच चवनप्राश,दिले जाणार आहे. सध्या 99 टक्के लोकांनी सहकार्य केले असून एक टक्का लोकांमुळे घटना घडत आहेत. अशांवर पोलीस कारवाई करत आहेत.सध्या बेशिस्तपणा व नियम तोडणाऱ्या वर बाराशे गुन्हे दाखल केले असून 12 ते 13 हजार गाड्या जप्त केल्या आहेत.पोलीस,आरोग्य कर्मचारी व इतर covid-वॉरिअर यांच काम चांगल्या प्रकारे सुरू आहे. सर्वांनी सोशल डिस्टन्स पाळले पाहिजे नवीन आदेशानुसार दुकाने सुरू होतील परंतु दुकानदाराने नियमांचे पालन केले नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच दुकान ही बंद केले जाईल. ते म्हणाले की दारूची दुकाने कोणत्याही परिस्थितीत सुरू होणार नाहीत.तसेच जनतेनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान त्यांनी केले आहे.यावेळी डी.वाय.एस.पी नीरज कुमार राजगुरू, नातेपुते पोलिस स्टेशनचे ए.पी.आय युवराज खाडे, पोलीस नाईक शिवकुमार मदभावी, विशाल घाडगे कर्मचारी वर्ग पत्रकार उपस्थित होते. तसेच नातेपुते पोलिसांच्या कडून माहिती देण्यात आली की लॉक डाऊन काळामध्ये नातेपुते पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण 15 गुन्हे दाखल केले असून त्यामध्ये 62 आरोपी आहेत व दहा वाहनांची जप्ती केली आहे विनाकारण खेळणाऱ्या लोकांवरती सुद्धा कारवाई करण्यात आली आहे त्यामध्ये 303 वाहने ताब्यात घेतले आहेत मु .पो .का 68,69 प्रमाणे दोनशे इसमानवर वर कारवाई करण्यात आली आहे. तर वाहतूक केसेस 661 आला असून दोन लाख 48 हजार सहाशे का दंड झाला असून. नातेपुते पोलीस स्टेशन हद्दीत शिंगणापूर पाटील येथे आंतरजिल्हा चेक पोस्ट असून सहा ठिकाणी नाका बंदी करण्यात आली आहे. कळंबोली पूल कुरबावी फुल तसेच शिंगणापूर निटवेवाडी खुटबाव हे रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. परजिल्ह्यातील नातेपुते पोलीस स्टेशन हद्दीत आतापर्यंत 4465 लोक परजिल्ह्यातून आले आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना पोलीस उपअधीक्षक अतुल झेंडे
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल ला मुलाखत देताना उपाध्यक्ष अतुल झेंडे
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज साठी मुलाखात घेतला पत्रकार प्रमोद शिंदे ,प्रशांत खरात
Covid-19 प्रादुर्भाव पोलीस आणि नागरिक यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी उपाधिक्षक यांची नातेपुते ला भेट यावेळी डी वाय एस पी नीरज कुमार राजगुरू, एपीआय युवराज खाडे
नातेपुते परिसरातील पत्रकार सुनील राऊत श्रीकांत बाविस्कर आनंद लोंढे प्रमोद शिंदे आनंद जाधव सुनील गजाकस प्रशांत खरात इत्यादीं समवेत संवाद करताना उपाधिक्षक अतुल झेंडे

You may have missed