स्वतःच्या घासातील घास गरिबांना काढून देणे हे आंबेडकरी चळवळीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे….वैभव गिते
स्वतःच्या घासातील घास गरिबांना काढून देणे हे आंबेडकरी चळवळीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे….वैभव गितेन्यूज पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)-
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात प्रधानमंत्री व मुख्यमंत्री महोदयांनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन घोषीत केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात मोलमजुरी करण्यासाठी ऊसतोड मजूर,झाडे झुडपे तोडून कोळसा पाडणारे आदिवासी महिला पुरुष लहान मुलाबाळांसह परजिल्ह्यातुन यापूर्वीच आलेले आहेत.त्यांची उपासमार होऊ नये भुकेने हाल होऊ नयेत म्हणून नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांनी कार्यकर्त्यांना स्वतःला मिळालेल्या रेशनपैकी अर्धे रेशन (धान्य) गरीब व गरजूंना द्यावे अशी घोषणा केली होती वैभव गीतेंनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवपुरी गावच्या कुसुम अड्याप्पा कांबळे,महालुंग गावच्या सिंधू विक्रम सोनवणे,संगीता युवराज भोसले मिरे गावच्या कल्पना अरुण नावगिरे,करोळे गावच्या बाळाबाई मच्छिंद्र नवगिरे,गिरवी गावच्या शेसाबाई मच्छिंद्र सावंत,लोणंद गावच्या सुमन भीमराव झेंडे,कुरबावी गावच्या रत्नप्रभा तानाजी गिते,धर्मपुरी गावच्या नीला नारायण झेंडे,कारूंडे गावच्या ताई बाजीराव गायकवाड,अंजना नंदकुमार गायकवाड,कोथळे गावच्या हिराबाई संभाजी भोसले,
फोंडशीरस गावच्या मंगल जगन्नाथ खरात या सर्व महिलांनी स्वतःच्या कुटुंबास रेशनचे मिळालेले प्रत्येकी 25 किलो धान्य गोरगरीब गरजू ऊसतोड मजुरांसाठी झाडे झुडपे तोडून कोळसा पडायला आलेल्या आदिवासींना दिले.विशेषतः ज्या महिलांनी हे धान्य मजुरांसाठी दिले त्या सर्व महिला सुद्धा गरीब घरातीलच आहेत परंतु त्यांची नाळ फुले शाहू आंबेडकरी चळवळीशी जोडली गेली असल्याने गरिबीचे चटके व भुकेच्या यातना काय असतात हे या महिलांना माहीत आहे म्हणूनच आपल्या घरात दिवा लावण्याअगोदर शेजारची चूल पेटली आहे का हे पाहणे खूप गरजेचे असते.या महिलांनी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन अडचणीत सापडलेल्या मजुरांना केलेल्या मदतीचे जगातील कोणत्याही मापाने मोल होऊ शकत नाही.
वैभव गिते या लोकप्रिय नेत्याने केलेल्या आवाहणास जनतेने भरभरून दिलेला प्रतीसाद पाहता गोरगरीब जनतेला मदत करण्याचा माळशिरस तालुक्याचा पॅटर्न महाराष्ट्रभर झाल्यास एकही गरीब मजूर उपाशी राहणार नाही असे नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव डॉ.केवलजी उके यांनी म्हंटले तसेच गरिबांनी गरिबांना केलेली मदत पाहून डोळे पाणावले असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीचे जेष्ट नेते विकास दादा धाइंजे यांनी केले
जनतेने दिलेला प्रतिसाद पाहून स्वतःच्या घासातील घास गरीब मजुरांना देणे हे आंबेडकरी चळवळीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे असे वैभव गिते यांनी सांगितले.