नातेपुते येथील एक हात मदतीचा घरपोच जेवण योजनेचा प्रांत व तहसीलदार यांच्याकडून कौतुक
नातेपुते येथील एक हात मदतीचा घरपोच जेवण योजनेचा प्रांत व तहसीलदार यांच्याकडून कौतुक*पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – (प्रमोद शिंदे) नातेपुते तालुका माळशिरस येथे अहिंसा सेवा समिती व माऊली पाटील मित्रपरिवार यांच्यावतीने एक हात मदतीचा घरपोच जेवण योजना सहा एप्रिल पासून सुरू आहे . सध्या covid-19 कोरोना मुळे संपूर्ण देशामध्ये लॉक डाउन असल्यामुळे गोरगरीब हातावरती पोट भरणाऱ्या मोल मजूर लोकांचे हाताला काम नसल्यामुळे उपासमार होत आहे हे लक्षात घेऊन माऊली पाटील मित्रपरिवार व अहिंसा सेवा समिती पंचायत समिती सदस्य माऊली पाटील व अविनाश दोशी यांच्या पुढाकाराने एक हात मदतीचा घरपोच जेवण ही योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत दररोज एक हजार ते बाराशे लोकांना घरपोच जेवण दिले जाते जो पर्यंत लॉक डाऊन संपत नाही तोपर्यंत हे घरपोच जेवण सुरू ठेवणार असल्याचं माऊली पाटील व अविनाश दोशी यांनी सांगितले तसेच नातेपुते येथील या उपक्रमाच्या ठिकाणी प्रांत अधिकारीसो शाम पवार मॅडम,व तहशीलदार अभिजीत पाटिल,यांनी भेट दिली त्यानी या उपक्रमचे कौतुक केले.व ते म्हणाले की नातेपुते येथील युवकांचे आदर्श इतरानी घेऊन गारजून मदत केली पाहिजे.या योजने साठी नातेपुते येथील व्यापारी वर्ग व दानशुर दाते मदत करतात.हे जेवन मिळण्य साठी एकदिवास अगोदर कॉल करवा लागतो यासाठी संदीप ठोम्बरे, महावीर दोशी, शुभम पलंगे,राहुल पांढरे, शब्बीर आर्ट्स, दत्ता सोरटे, माऊली शिंदे, बाबा काळे, यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तसेच या उपक्रमासाठी अहिंसा सेवा समिती, माऊली पाटील मित्र परिवार,साई सेवा दल,नातेपुते येथील युवक परिश्रम घेत आहेत.




