अत्याचार पिडित कुटुंबांना एन.डी.एम.जे यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तुंचे वाटप*


अत्याचार पिडित कुटुंबांना एन.डी.एम.जे यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तुंचे वाटप*


नातेपुते (प्रमोद शिंदे)- महाळुंग तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे  कोरोना आपात्कालीन परिस्थितीत लॉकडाउनमुळे अडचणीत आलेल्या   अनेक जातीय अत्याचार पिडित गरजू कुटुंबाना नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (एन.डी.एम.जे.) यांच्या वतीने
संघटनेचे राज्य महासचिव एड.डॉ.केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विकास दादा धाईंजे यांच्या उपस्थितीत  व राज्य सचिव वैभव गीते यांच्या नेतृत्वात जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. सध्या लॉक डाऊन मुळे लोकांच्या हाताला काम नाही  त्यामुळे उपासमारीची वेळ लोकांवर येत आहे  हे लक्षात घेता एन.डी.एम.जे. संघटनेने अत्याचार पिडित कुटुंबांना दहा किलो गव्हाचे पीठ, दहा किलो तांदूळ, दोन किलो साखर, दोन किलो गोडेतेल, दोन किलो तुर डाळ, उडिद डाळ, आंघोळीची व धुण्याची साबन, मीठ, मिरची, हळद, 12 बिस्कीट पूड़े, सॅनिटरी पॅड आदी पंधराशे रुपये वस्तूंची एकत्रित किट तयार करून सदर किट पिडित कुटुंबांना मदत म्हणून देण्यात आली. माळशिरस तालुक्यात जवळपास 50 त्‍याचार पिडीतांना अशा प्रकारची मदत देण्यात आली. विकास दादा धाइंजे बोलताना म्हणाले की माळशिरस तालुक्यात जीजी लोका अडचणी आहेत ज्यांच्या हाताला काम नाही त्या गरजू लोकांना होईल तितकी मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करू गेले अडीच महिन्यांपासून आम्ही गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि इथून पुढेही करत राहू यावेळी राज्य सचिव वैभवजी गिते, पत्रकार प्रमोद शिंदे, प्रशांत खरात,बाबासाहेब सोनवणे,धनाजी शिवपालक, दत्ता कांबळे, रणजित धाईंजे ,कल्याण लांडगे, बाबर साहेब भगवान भोसले, गेजगे,नवगिरे कार्यकर्ते व पीडित कुटुंब प्रमुख उपस्थित होते.