* दत्ता कांबळे यांनी वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून60 गरजूंना केली मदत*
* दत्ता कांबळे यांनी वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून60 गरजूंना केली मदत*
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- शिवपुरी तालुका माळशिरस येथील सामाजिक कार्यकर्ते एन डी एम जे तालुकाध्यक्ष दत्ता कांबळे यांनी वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून गरजूंना केली मदतलॉकडाउनच्या काळात मजुरांच्या हाताला काम नाही त्यामुळे मजुरांवरती उपासमारीची वेळ आली आहे हे लक्षात घेता शिवपुर येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे यांनी विकास दादा धाइंजे व एन.डी.एम.जे राज्य सचिव वैभवजी गीते यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू आणि गरीब साठ शेती महामंडळातील कामगारांना जीवनावश्यक वस्तू चे वाटप करून एक सामाजिक बांधिलकी जपली आहे स्वतःच्या वाढदिवसाचा होणारा वायफळ खर्च टाळून गरजूंना मदत केल्यामुळे परिसरात दत्ता कांबळे यांच्या कामाचे कौतुक होत आहे. तसेच कोरोना पार्श्वभूमीवर काम करणाऱ्या पत्रकार बांधवांचा मास्क सानेटायझर जीवनावश्यक वस्तूंचे कीट देऊन सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग नियम पाळणे करण्यात आला. यावेळी माळशिरस चे माजी सरपंच विकास दादा धाईंजे,एन.डी.एम.जे राज्य सचिव वैभव गीते, पत्रकार प्रमोद शिंदे, श्रीकांत बाविस्कर, सुनील गजाकस, विलास भोसले, प्रशांत खरात, शहाजी धायगुडे. कार्यकर्ते उपस्थित होते.






