तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांची धडक कारवाई नियम मोडणाऱ्यांकडुन हजारोंचा दंड वसुल
तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांची धडक कारवाई नियम मोडणाऱ्यांकडुन हजारोंचा दंड वसुल
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -आजिनाथ राऊत उस्मानाबाद जवळा नि प्रतिनिधी
जवळा नि येथे कोरोना विषाणूस प्रतिबंध करण्यासाठी तालुका दंडाधिकारी अनिलकुमार हेळकर, गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर, पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद, तालुका आरोग्य अधिकारी सय्यद साहेब, या परांडा तालुक्यातील सर्व विभागातील अधिकारी यांनी जवळ्याचे तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांना सक्त सुचना देत सोबत घेऊन धडक मोहीम राबविली.
तालुक्यातील सर्व विभागातील अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली व सहकार्याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने ग्रामविकास अधिकारी पोपट खटकाळे सरपंच नवजीवन चौधरी, उपसरपंच अशोक गवारे यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत नियम मोडणाऱ्या शेकडो नागरीकांकडुन दंड वसुल केला.
त्यामुळे अनेक दुचाकीस्वारांचे धाबे दणाणले आहेत. संचारबंदीच्या काळात गरज नसतानाही बाजारात व चौकाचौकात फिरणाऱ्यांवर वरील सर्व अधिकारी यांनी संयुक्तरीत्या कारवाईचा बडगा उगारला असून, अनेक ठिकाणी धडक मोहीम हाती घेतली आहे. जवळा नि गावातील बाजार चौकासह विविध ठिकाणी पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद यांचेसह तालुका विभागातील अधिकारी यांनी चौकाचौकात बिनकामाचे बसण्यास बंदी घातल जवळा भांडगाव मार्गे बार्शीला जानारा रस्ता बंद करीत कारवाई केली.
अनेकजण गरज नसताना बाजारात फिरत होते. तर काही जण मास्क शिवाय फिरताना आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई तालुका प्रशासनातील पोलीस निरीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी या पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने व सहकार्याने ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली. या कारवाईत विना मास्क प्रत्येकी २०० रुपये तर चार चाकी नियम मोडून फिरणाऱ्यांकडुन प्रत्यकी ५०० रुपये असा दंड वसूल करण्यात आला. पोलीस आणि इतर प्रशासनाच्या वतीने दिवसभर हि कारवाई सुरू होती.

