शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन : अनंतलाल दादा दोशी

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन : अनंतलाल दादा दोशी

रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचा 12 वा वर्धापन दिन उत्स्फूर्तपणे साजरा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (मांडवे),प्टेंं रत्नत्रय शैक्षणिक संकुलात मंगलमय सूर, आकर्षक सजावट, लक्षवेधी रांगोळी, आशा चैतन्यदायी वातावरणात रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचा 12 वा वर्धापनदिन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित उत्स्फूर्तपणे पार पडला. संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दादा दोशी यांच्या अध्यक्षतेखाली व रत्नत्रय पतसंस्था चेअरमन विरकुमार दोशी,
रत्नत्रय इंग्लिश स्कूल, व कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन प्रमोद भैय्या दोशी, प्रशाला कमिटी सदस्य संतोष गुरव, बाहुबली दोशी, आनंद शेंडगे, ज्ञानेश राऊत, दत्ता भोसले, यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरवात भगवान महावीर व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून झाला. अध्यक्षीय भाषणात बोलताना दादा म्हणाले ” शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती होवू शकणार नाही. या ससंस्थेतील विद्यार्थी यशाची विविध शिखरे पादाक्रांत करेल आशा प्रकारचे काम सर्व शिक्षकानीं करावे ” त्या नंतर त्यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनच्या आठवणींना उजाळा दिला. चेअरमन प्रमोद दोशी म्हणाले ” रत्नत्रय ही विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून चालणारी शिक्षण संस्था आहे. म्हणूनच ही संस्था अल्पवधितच विश्वासास पात्र झाली आहे.
पुढे ते म्हणाले सर्व शिक्षकांनी पालकांच्या अपेक्षा पूर्ती साठी काम करावे. तसेच सर्व शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असल्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दैवत वाघमोडे सर, सूत्रसंचालन माधवी रणदिवे मॅडम तर आभार प्रदर्शन पिसाळ मॅडम यांनी केले.

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन : अनंतलाल दादा दोशी

You may have missed