वाशीम येथे एन.डी.एम.जे ची कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क वाशिम – नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस च्या वतीने वाशिम जिल्ह्यातील एनडीएमजे कार्यकर्ता आढावा व नियोजन बैठक एनडीएमजे चे वाशिम जिल्हा अध्यक्ष समाधान सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य सहसचिव पी एस खंदारे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली मौजे झोडगा खुर्द येथे एनडीएमजे चे वाशिम जिल्हा उपाध्यक्ष भागवत गवई यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. या आढावा व नियोजन बैठकीत पुढील विषयावर चर्चा घडवून आणली गेली या मध्ये जिल्हा स्तरावर एनडीएमजे चे जनसंपर्क कार्यालय सुरू करणे, दर पंधरा दिवसांनी विविध कायदे विषयक एक कार्यशाळा प्रत्येक तालुक्यात आयोजित करणे,दर महिन्याच्या शेवटच्या रविवार ला मासिक बैठक/चर्चा सत्र/विचारविनिमय, आढावा बैठक आयोजित करणे,एनडीएमजे संघटनेत बौद्ध मंडळी सह इतरही अनेक जाती जमाती चा सहभाग वाढवणे व क्रियाशील सदस्य, पदाधिकारी यांची नेमणूक करणे, महिला व युवा सहभाग वाढवणे, अनुसूचित जाती आणि जमाती च्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी जिल्हा स्तरावर धरणे, मोर्चा अंदोलन निश्चित करणे, कोरोणा व्हायरस च्या प्रादुर्भावात प्रभावीत/संकटात सापडलेल्या व्यक्ती ला मानसिक व सामाजिक आधार व धिर देने,अनुसूचित जाती आणि जमाती च्या व्यक्तीवर होणारे अन्याय अत्याचारात न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणे आदी सह विविध विषयांवर सामुहिक चर्चा घडवून आणली गेली.
बैठकीला महादेव कांबळे, भीमराव खरात, रामदास वानखेडे, अनिल साळवे, बबन खरात, प्रकाश सरकटे, नारायण सरकटे, विश्वास कांबळे, साईनाथ कांबळे, स्वप्निल सरकटे, वसंतराव वानखेडे, चित्रलेखा सरकटे, शिंदुबाई सरकटे, शोभाताई सरकटे, संगिता वानखेडे, किरण गवई, भागवत गवई, संदिप खडसे, संदिप सावळे, सुमेध वानखेडे, ज्ञानबा सरकटे, मधुकर ताजणे, कुलदीप सरकटे, रामकिसन खिल्लारे, गौतम गवई आदी उपस्थित होते.
बैठकीचे सुत्रसंचालन महादेव कांबळे यांनी तर आभार रामदास वानखेडे यांनी मानले…
पुढील रविवार ला सकाळी अकरा वाजता जांब अढाव येथे विविध कायदे विषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याचे रिसोड तालुका अध्यक्ष बबन खरात यांनी जाहीर केले आहे.
उपस्थित सर्वांचे आभार मानुन आजची आढावा व नियोजन बैठक संपन्न झाली….
वृत संकलन नारायण सरकटे यांनी केले.

न्य्य

पी एस खंदारे साहेब यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता काढावा बैठक संपन्न

You may have missed