पालक मंत्री दत्ता मामा भरणे यांना लाडका भाचा सुरज वनसाळे यांचे सोशल मीडियाद्वारे पत्र

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
प्रिय दत्तामामा भरणे
सविनय जयभीम
पुन्हा काही दिवसांसाठी वाढत्या कोरोनाचे कारण देत आपल्या प्रशासनाने तालुका लाॅकडाऊन केला.
मामा,
या लाडक्या भाच्याची विनंती आहे की,
१) काही महिलांना(तालुक्यातील आपल्या काही बहीनींना) शेतात कामाला जावे लागते. कारण नवरा कामाला जाताना पोलीस कार्यवाही ला सामोरे जावे लागते.प्रसंगी मारही खावा लागतो किंवा आर्थिक झळही सोसावी लागते. लहान लहान मुले, लग्नाला आलेली मुलगी,अचानक उद्भवणारा दवाखाना ,शेती महामंडळाच्या पडक्या घरांची डागडुजी यासाठी फक्त २०० रुपये मध्ये रोजंदारीवर कामाला जावे लागते आहे. तुमच्या लाॅकडाऊन चे त्यांना घेणे देणे नाही. कधीतरी मरायचेच आहे असे महिलांचे म्हणणे आहे. कृपया त्यांची दि. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:३३ वाजता शेळगाव येथे गाडी अडवून पोलीसांनी पावती केली आहे मोठा भाऊ म्हणून आपण त्यांना पैसे परत करा.(उद्या पुन्हा पावती होणार आहे! वालचंदनगरला तसा दम मिळाला आहे.)
२) कोरोना वाढण्यास गोरगरीब, सामान्य कार्यकर्ते, गवंडी, मजुर, यांचा काहीच संबंध नाही. सुशिक्षित बेरोजगार यांचाही संबंध नाही त्यांची लग्न मोडत आहेत. कुठे काम नाही, त्यामुळे व्यसनाधीनता वाढत आहे….वय वाढत आहे.त्यांचा आत्महत्या करण्याचा विचार आहे. त्यांना कोरोनाने मेल्यामुळे काही फरक पडणार नाही असे बेरोजगार मुलांचे म्हणने आहे. कृपया काम बघा, जमत नसेल तर मुलगी बघा. त्यांचे काही महिन्यांपासून आलेले नैराश्य जाईल.
काही गोष्टी अपवाद असतात. योग्य कामात आम्ही कधीच हस्तक्षेप केला नाही.काही बाबींमध्ये आम्ही दुर्लक्ष करतोच ना?…… तसेच आपल्या कार्यकर्ते यांनी गावागावात अडीचशे रुपयाचे दिलेले कीट दोन महिन्यापूर्वीच दोन दिवसात संपले. शासनाने दिलेले पाचशे रुपये कुठे गेले ते आता सांगणार नाही. पावसाने चांगलेच झोडपले आहे किरकोळ आजारांनी व त्याला आलेल्या खर्चांनी सामान्य माणूस खचून गेला आहे. त्यामुळेच राबराब राबणाऱ्या महिलांना १ रुपया महत्त्वाचा आहे.मामा आपले,शासनाचे, पोलीस यंत्रणेचे काम खुप चांगले चालले आहे. निश्चितच आपल्या प्रयत्नांना यश येवून कोरोना आटोक्यात येईल आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. तसेच मामा, काही खाजगी डाॅक्टरांनी औषधे चोरली ते खरे आहे का ? त्यांच्यावर गुन्हे दाखल केलीत का ?
असो, निश्चित या भाच्याला आपण नाखुश करणार नाही.तसेच कोरोनापासुन तब्ब्येतीची काळजी घ्या. पोलिस बांधवांना या आजारापासून तब्बेत जपण्यास सांगा. अन् तेवढे पैसे द्या. त्या सर्व १८ महिलांना आपल्या घरी फाडलेल्या पावतीचे पैसे नेण्यास पाठवु का ?
कळावे

आपला लाडका भाचा
सुरज वनसाळे
लाडका भाचा सुरज वनसाळे अध्यक्ष मी आंबेडकरवादी सामाजिक संघटना

You may have missed