कोरोना संदर्भात नागरिकांनी गाफील न राहता सतर्क रहावे- सामाजिक कार्यकर्ते वैभव शहा
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)- covid-19 कोरोना संदर्भात नातेपुते व परिसरातील लोकांनी गाफील न राहता सतर्क राहावे असे आव्हान रत्नत्रय इंग्लिश मीडियम व ज्युनियर कॉलेज संचालक, महावीर इलेक्ट्रिक चे मालक, सामाजिक कार्यकर्ते वैभव शहा यांनी केले आहे.कारण नातेपुते आणि परिसरात कोरणा प्रादुर्भाव हा झपाट्याने वाढत आहे नातेपुते ही मोठी बाजारपेठ असल्यामुळे नातेपुते आणि परिसरात लोकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते एकमेकांचा संपर्कही मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव पसरण्यासाठी वेळ लागणार नाही. तसेच नातेपुते आणि परिसरात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे तसेच मृत्यूची संख्या ही वाढत आहे.त्यामुळे नातेपुते बाजारपेठेत येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांनी फिजिकल डिस्टंसिंग, मास्क, सँनीटायझर वापर हा नियमित करावा नाही तर येणारा काळ हा अतिशय भयंकर असेल. प्रत्येक घरांमध्ये कोविंड रुग्ण सापडू शकतो. सध्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन बेड शिल्लक नाही ऑक्सीजन बेड मिळत नसल्याने रुग्ण दगावण्याची संख्याही वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनीच काळजी स्वतः घ्यायला हवी तसेच नातेपुते येथे शासकीय ऑक्सीजन बेड सह कोविड सेंटर लवकरात लवकर उभारण्यात यावे अशी मागणीदेखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
