पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल च्या संपर्कामुळे युवकाचे हरवलेली कागदपत्रे त्याला मिळाली 24 तासात.
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे –पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल च्या संपर्कामुळे युवकाचे हरवलेली कागदपत्रे त्याला मिळाली 24 तासात.


दिनांक 26 सप्टेंबर रोजी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल चे प्रतिनिधी राजहंस बोकेफोडे यास जेजुरी येथील विकास कुंभार या युवकाचे कागदपत्रांसह वॉलेट पुणे येथील वाकड या ठिकाणी सापडले होते त्या पॉकेट मध्ये पॅन कार्ड आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स यासारखे महत्त्वाची कागदपत्रे होती. राजहंस बोकेफोडे याने वॉलेट सापडल्यानंतर लगेच पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल च्या ऑफिसला संपर्क साधला व याची माहिती दिली यावर पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे संपादक प्रमोद शिंदे यांनी महाराष्ट्रभर पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे नेटवर्क असल्याकारणाने आपल्या फेसबुक पेजवर या वॉलेट सापडले आहे या संदर्भात पोस्ट टाकली होती यावर अजित महाराज यांनी जेजुरी येथील ग्रुप वर ती पोस्ट शेअर केली व तेथील राऊत नावाच्या युवकाचा फोन दिलेल्या वरील नंबर वर सकाळी सात वाजता आला व त्याने माहिती सांगितली की मी ह्या व्यक्तीला ओळखतो ते माझ्या शेजारी राहतात तेव्हा त्यांनी विकास बाळासाहेब कुंभार यांना याची माहिती देऊन संपादक प्रमोद शिंदे यांचा नंबर दिला यावर विकास कुंभार यांचा फोन पुरोगामी महाराष्ट्र यांच्या ऑफिसला आल्यानंतर वॉलेट त्यांचेच आहे ही खात्री करून त्यांना आमचे प्रतिनिधी राजहंस बोकेफोडे यांचा नंबर दिला व राजहंसने मित्राच्या सहाय्याने सुखरूपपणे हरवलेले वॉलेट विकास कुंभार यांच्या स्वाधीन केले वॉलेट्स मिळाल्यामुळे विकास बाळासाहेब कुंभार या युवकाचा आनंद गगनात मावेना व त्याने पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चे आभार व्यक्त केले.
