शिंगणापूर घाटात वाहन चालकास आडवून दरोडा टाकणाऱ्या टोळीस नातेपुते पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शिंगणापूर घाटात वाहन चालकास आडवून दरोडा टाकणाऱ्या टोळीस नातेपुते पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)-फिर्यादी प्रकाश शामराव बोंद्रे राहणार निमसाखर बोंद्रे वस्ती तालुका इंदापूर जिल्हा पुणे हे त्यांचा दुधाचा टँकर यामध्ये दूध घेऊन कर्नाटक येथे येऊन परत दहिवडी शिंगणापूर मार्गे नातेपुते कडे येत असताना अज्ञात इसमांनी एक निळ्या रंगाची बिगर नंबरची कार आडवी लावून फिर्यादीला चाकु मारून जखमी केले व रोख रक्कम दहा हजार रुपये व एक मोबाईल जबरदस्तीने करून घेऊन गेले होते. त्याबाबत फिर्यादीने नातेपुते पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गु.र.न 277/ 2020 भादवि कलम 394,341,34 प्रमाणे गुन्हा दाखल होता.सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे करीत होते सदर गुन्ह्यातील तपास करीत असताना अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे सोलापूर ग्रामीण, उपविभागीय पोलिस अधिकारी अकलूज नीरज राजगुरू, पोलीस निरीक्षक अरुण सावंत स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देवून तपासासाठी अनुषंगाने महत्वाची सूचना दिल्या होत्या त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे यांनी नातेपुते पोलीस ठाणे कडील दोन तपास पथके नेमून गुन्ह्याचा तपास करीत होते गुन्ह्याचा तपास करत असताना वापरलेली निळ्या रंगाची मारुती कार संशईत रित्या फिरत असताना दिसून आल्याने ती कार ताब्यात घेऊन कारमधील इसमाला नाव विचारले असता त्यांनी आपले नाव गदर अशोक भोसले,शिवाजी रामदास मदने, समीर भारत जाधव, राहणार तावशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे असलेले वाहना बाबत चौकशी केली असता सदर वरील गुन्हा केल्याची कबुली देऊन इतर आरोपी महावीर सुखदेव खोमणे, रणजीत उर्फ पप्पू कुंडलिक बोडरे,दोघे राहणार चंद्रपुरी तांबेवाडी तालुका माळशिरस येथील प्रदीप उर्फ सोन्या मदने,रोहित बाबू भोसले दोघे राहणार तावशी तालुका इंदापूर सर्वांनी गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे सदर गुन्ह्यातील आरोपी पाच जणांना अटक करण्यात आली असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे व हा गुन्हा सात आरोपीने केल्याने भादवि कलम 395 कलम वाढवून अटक आरोपींना न्यायालयात पी सी आर करीता हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे हे करीत आहे सदरचा गुन्हा अप्पर पोलीस अधीक्षक श्री अतुल झेंडे सोलापूर ग्रामीण, उपविभागीय पोलिस अधिकारी अकलूज नीरज राजगुरू, पोलीस निरीक्षक अरुण सावंत स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली युवराज खाडे, पो.हे.कॉ अनिल गडदे,रामलिंग कदम,अजित कदम, असलम काझी, पोलीस नाईक महेश पाटील,पो.कॉ.राकेश लोहार, अमित जाधव, तानाजी मुटकुळे, विशाल घाडगे, शाहू
काळदाते, दत्ता काटे सायबर शाखेचे रवी हातकिले यांनी तपास करून गुन्हा उघडकीस आणला आहे.

You may have missed