नातेपुते येथील समर्थ लॅबोरेटरीला कोविड -19 रॅपिड ऑंटीजन टेस्टसाठी अधिकृत मान्यता
नातेपुते येथील समर्थ लॅबोरेटरीला कोविड -19 रॅपिड ऑंटीजन टेस्ट साठी शासनाची अधिकृत मान्यता उद्घाटन प्रसंगी पत्रकार व मान्यवर*
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क(प्रमोद शिंदे )-ज्ञादीप पॅरामेडिकल कॉलेज मधील समर्थ क्लिनिकल लॅबोरेटरी नातेपुते यास कोविड -19 रॅपिड अँटीजन टेस्ट प्रयोगशाळा म्हणून अधिकृत मान्यता मिळालेली आहे, या प्रयोगशाळेचे उद्घाटन पत्रकारांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते रि.पा.ई चे पश्चिम महाराष्ट्र सचिव एन. के. साळवे , ज्येष्ठ पत्रकार सुनील राऊत, श्रीकांत बावीसकर,आनंद लोंढे सर,प्रमोद शिंदे,मनोज राऊत,प्रशांत खरात संस्थेचे अध्यक्ष प्रा. ढोबळे एम. डी, प्रयोग शाळेचे संचालक डॉ.हनुमंत माने, आप्पा शेंडगे, इंजिनीअर कोडलकर साहेब आदी उपस्थित होते, यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. ढोबळे व प्रयोग शाळेचे संचालक डॉ. हनुमंत माने म्हणाले की, आपल्या ग्रामीण भागातील गर्भवती महिला व इमर्जन्सी पेशंट यांना कोविड -19 रॅपिड अँटीजन टेस्ट करणेस बऱ्याचदा अडचणी निर्माण होऊ लागल्यामुळे एक सामाजिक बांधिलकी व समाजसेवा या उदात्त भावनेने रॅपिड ऑंटीजन टेस्ट अधिकृत प्रयोग शाळेसाठी प्रस्ताव दाखल केला व त्याची अधिकृतपणे मान्यता मिळाले आहे माळशिरस तालुक्यातील ही पहिलीच अधिकृत प्रयोगशाळा आहे, तसेच शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार प्रयोगशाळा सुरू राहणार असल्याची माहिती दिली .