भुजबळ साहेब यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त नंदुरबार च्या युवकमित्र परिवारास 73 महापुरुषांचे ग्रंथ भेट

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्कपुणे-फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन तर्फे महाराष्ट्र राज्याचे अन्न पुरवठा नागरी व संरक्षण मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद चे अध्यक्ष मा.नामदार छगन भुजबळसाहेब यांच्या 73 व्या(निर्भय दिन व वाचन दिन) वाढदिवसानिमित भारतीय संविधान , शेकऱ्याचा आसूड , सम्राट बळीराजा,गौतम बुद्ध,जिजाऊ मांसाहेब , छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,छत्रपती शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे ते काकासाहेब गाडगीळ,बहुजनांचे कैवारी छगन भुजबळ व इतर महापुरुषांचे जीवनावरील तसेच सामाजिक ,स्त्री, पुरुष समानता विषयाचे 15000रुपयांचे एकूण 73 ग्रंथ नंदुरबार च्या युवकमित्र परिवारास ग्रामीण व दुर्गम भागात वाचन चळवळ गाव तेथे ग्रंथालय मोहीम यशस्वी राबविण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण महाजन ,जिल्हा परिषद, बांधकाम विभाग,पुणे चे कर्मचारी यांना विजयादशमी दिनी म्हणजे दि.25 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 2 वाजता बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्र, राजयोग प्लाझा , धायरी ,पुणे येथे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते भेट देण्यात आले.
या प्रसंगी सुरवातीला थोरसमाजसुधारक महात्मा फुले व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास सत्यशोधिका आशा व सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तर प्रवीण महाजन यांचे हस्ते ग्रंथ पूजन करण्यात आले.यावेळी प्रवीण महाजन म्हणाले की ग्रामीण व दुर्गम भागात समाजपरिवर्तनासाठी प्रत्येक गावी ग्रंथालय असणे जरुरीचे आहे म्हणून आमचे संस्थेच्या माध्यमातून वाचनीय ग्रंथ, पुस्तके गोळा करून गावोगावी मोफत वाचनालय चालू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. याबाबतीत पुणेकर मंडळीनी खूप मदत केली असून कृतिशील ग्रंथ मित्र व ग्रंथपाल प्रसाद भडसावळे यांनी मोठी मदत केल्याचे आवर्जून सांगितले आणि आता सत्यशोधक मित्र रघुनाथ ढोक यांनी आजच्या दसरादिनी भुजबळ साहेबांनचे वाढदिवसानिमित्त महत्त्वपूर्ण 73 ग्रंथ भेट देऊन आमचे संस्थेच्या कार्याची दखल घेतली त्याबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी रघुनाथ ढोक म्हणाले की भुजबळ साहेब यांचे 71 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने हरियाणा, कुरुक्षेत्र येथील सावित्री जोतिबा ग्रंथालयास 71 ग्रंथ व महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे 3 पुटी अर्धं पुतळे तिकडे जाऊन 2 वर्षांपूर्वी 10 नोव्हेंबर 2018 रोजी भेट दिले होते आणि आज वाचन चळवळी साठी 73 ग्रंथ भेट दिले. पुढे ढोक असे ही म्हणाले की नुकतेच एप्रिल ,मे,जून महिन्यात देशात व परदेशात कोरोना चा धुमाकूळ चालला असताना या महापुरुषांचे ग्रंथानेच भारतीयांचे मनोबल वाढविले हे देखील विसरून चालणार नाही. ग्रामीण व दुर्गम भागातील मुलांचे व समाजाचे चांगल्या वाचनाने ज्ञान ,मनोधर्य , शिक्षणाची आवड कायम निर्माण व्हावी म्हणून युवकमित्र परिवारास ग्रंथ भेट देऊन गावोगावी वाचन संस्कृती जिवंत ठेवण्याचे कार्य करावे असे आवाहन देखील यावेळी केले.
कार्यक्रमाचे शेवटी महात्मा फुले रचित सत्याचा अखंड आशा ढोक यांनी म्हंटला तर ग्रंथ भेटीचे नियोजन आकाश ढोक व आभारप्रदर्शन क्षितिज ढोक यांनी मानले तर मोलाचे सहकार्य राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे लाभले.

You may have missed