अकलूज उपजिल्हा रुग्णालयात पालकमंत्री भरणे मामा यांच्या प्रयत्नातून महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू – अजय सकट
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या प्रयत्नातून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोलापूर जिल्ह्यात 3 ठिकाणी महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केल्या आहेत त्याचप्रमाणे माळशिरस तालुक्यातील अकलूज उपजिल्हा रुग्णालयात ही योजना सुरू केली असल्याची माहिती पंचायत समितीचे सदस्य अजय सकट यांनी दिली
माळशिरस तालुक्याचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज व नातेपुते येथे महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू करण्याबाबत पंचायत समितीचे सदस्य अजय सकट व रणजितसिह जाधव यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (मामा)यांची भेट घेऊन मागणी केली होती व त्यासाठी ते सतत पाठपुरावा करीत होते तसेच अजय सकट हे गेल्या दोन वर्षांपासून आरोग्य विभागाच्या अडचणी सोडवत आहेत तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू करावी म्हणून ते सतत प्रयत्नशील होते तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख व आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता कोव्हीड परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अनेक आरोग्य विभागाचे प्रश्न मार्गी लावले आहेत असाच चांगला निर्णय ही योजना राज्यभर शासकीय रुग्णालयात राबवून सर्वसामान्य लोकांना आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या असून या योजनेत गरीब व गरजू रुग्णांना फायदा होणार असल्याचे अजय सकट यांनी सांगितले

